https://www.dompsc.com


Page Updated On -1-October-2026

मराठी भाषेतील वर्ण व वर्णविचार

मराठी भाषेतील वर्ण व वर्णविचार

➤ MPSC राज्यसेवा आणि MPSC combine तसेच MPSC Technical परीक्षा मध्ये मुख्य परीक्षांच्या सत्रात Marathi Grammar चे विशेष महत्व आहे , त्या अनुषंगाने वर्ण हा पाठ परीक्षेस पूरक मार्क प्रदान करून जातो.

वर्ण ची व्याख्या

✪ व्यक्तीच्या तोंडावाटे निघणारया मुलध्वनीना वर्ण असे म्हणतात.
➤ उदा. शु ह्या अक्षरा ची फोड श+अ+उअशी करता येते.
● मराठी मध्ये सुरुवातील ४८ वर्ण मानले जात पण कालानुरूपे ह्या वर्णाचे रूप बदलत गेले व नवीन वरणे व नियम खालील प्रमाणे बदलत गेले.
सरकारी नियमाप्रमाणे वर्णातील बदल
  • ➤शासन निर्णय २००९ नुसार नवीन वर्ण-ऍ, ऑ
  • ➤शासन निर्णय २०२२ नुसार हिंदीतून मराठीत आलेली अक्षररुपं बदलण्यासाठी वर्णमालेत काही बदल करण्यात आलेत. त्यात श आणि ल ही दोन अक्षरं लिहिताना आता वेगळ्या पद्धतीनं लिहावी लागणार आहेत. देठयुक्त ल ऐवजी आता पाकळीयुक्त ल असं लिहावं लागणार आहे. तर गाठयुक्त श ऐवजी आता शेंडीयुक्त श असं लिहावं लागणार आहे.
  • ➤काही तज्ञांच्या मताप्रमाणे 'क्ष' व 'ज्ञ' हि ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत, त्यामुळे त्यांचा समावेश वर्णमालेत केला जात नाही..


मराठी भाषेतील वर्ण प्रकार

●मराठी भाषेमध्ये वर्णाच्या उच्चारावरून त्याचे मुख्य ३ प्रकार पडतात ज्याला स्वर ,स्वरादी,व्यंजने म्हणतात.हे प्रकार वर्ण कशा प्रकारे उचारल्या जातो त्याच्यावरून ठरत असतात.
उदा. अ , क ,ग ,अं अ:.

स्वर म्हणजे काय ?

  • स्वर म्हणजे मराठी भाषेतील अशी वर्णे जी स्वतंत्र उच्चारणे शक्य असते त्याला स्वर असे म्हणतात.
  • उदा.अ,आ,इ,ई,उ,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अ:.
  • स्वराचे उचारानुसार काही प्रकार पडतात जसे कि हृस्व स्वर ,मृदू स्वर ,दीर्घ स्वर ,स्वजातीय स्वर ,विजातीय स्वर.

स्वराचे उचारानुसार प्रमुख प्रकार

स्वर प्रकार संख्या उदाहरण
ह्रस्व स्वर ६ अ,इ,उ,ऋ,लृ,ऍ
दीर्घ स्वर ८ आ,ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ,ऑ
संयुक्त स्वर
  1. ए=अ+इ/ई
  2. ऐ=आ+इ/ई
  3. ओ=अ+उ/ऊ
  4. औ=आ+उ/ऊ
सजातीय स्वर सारख्याच उचाराच्या वर्णापासून बनलेले अ-आ,इ-ई,ए-ऐ,उ-ऊ,ओ=ओ
विजातीय स्वर वेगवेगळ्या उचारापासून तयार होणारे स्वर अ-इ,अ-उ,आ-ई


व्यंजने म्हणजे काय व व्यंजनाचे प्रकार

व्यंजन:व्यंजन म्हणजे अशी वर्णे जी स्वरा च्या मदती शिवाय उच्चारता येत नाहीत.अशा सर्व वर्णानांव्यंजन असे म्हणतात.
  • उदा.क=क्+अ.
  • म्हणूनच सर्व व्यंजने त्या व्यंजनाचा अर्धा पाय मोडून लिहितात कारण ती स्वरा शिवाय अपूर्ण असतात-क्, ख्, ग्, घ्, ङ, ह्
  • मराठी मध्ये असे एकूण ३४ व्यंजन आहेत
वर्ग
क् वर्ग क् ख् ग् घ् ङ
च् वर्ग च् छ् ज् झ ञ्
ट् वर्ग ट् द ड् ढ् ण्
त् वर्ग त् थ् द् ध् न्
प् वर्ग प् फ् ब् भ् म्

व्यंजनाचे उचारानुसार प्रकार

उचारानुसार काही प्रकार
अर्धस्वर व्यंजने उच्चारस्थाने इ, उ, ऋ, ल सारखे होते. य्, र्, ल्, व्
संयुक्त व्यंजने काही तज्ञ लोकाच्या मते हे सुधा व्यंजने आहेत
  • क्ष (क् +ष् + अ)
  • ज्ञ् (द् +न् + य् + अ )
महाप्राण व्यंजने(14) ह् युक्त उच्चार होणारे ख् - घ्, छ् - झ्, ठ- ढ, थ् - ध्, फ् - भ्, श्, ष्, स्, ह्
अल्पप्राण व्यंजने(20) 'ह' युक्त उच्चार न होणारे क्-ग , च्- ज्, ट् - ड्, त् - द्, प् - ब् + अर्धस्वर (४) + अनुनासिक (५)
स्वतंत्र व्यंजन मूर्धन्य वर्ण द्रविड भाषेतून आलेला आहे ळ


स्वरादी म्हणजे काय व स्वरादी चे प्रकार

  • स्वरादी म्हणजे आधी स्वर आहे असा वर्ण.
  • स्वराच्या आधी उचारल्या जातो म्हणून ह्याला स्वरादी म्हणतात.
  • उदा.मराठी मध्ये अं,अ: हे दोन स्वरादी आहेत

स्वरादी चे प्रकार

अं(अनुस्वार) उच्चार स्पष्ट असतो.उदा.निरंतर
अ:(विसर्ग) उच्चार अस्पष्ट असतो उदा.दु:ख

उचारानुसार वर्णांचे पडणारे प्रकार

अ, आ क्, ख्, ग्, घ्, ङ, ह्
  • पडजीभ आणि जिभेची मागील बाजू या दोन्हीच्या संयोगातून अथवा सहकार्याने निर्माण होणारे वर्ण म्हणजे कंठ्य वर्ण
इ, ई च्, छ्, ज्, झ, ञ्, य्, श्
  • जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात तेच म्हणजे तालव्य वर्ण
ऋ ट्, द, ड् ढ् ण्, र्, ष, ळ्
  • जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात.
लृ त्, थ्, द्, ध्, न्, ल्, स्
  • जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर जे वर्ण निर्माण होतात त्यांना दंत्य वर्ण म्हणतात.
उ, ऊ प् फ् ब् भ् म्
  • दोन्ही ओठांमधून निर्माण होणाऱ्या वर्णांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात
ए. ऐ --
- - ओ, औ, अॅ, ऑ
- - व्
- - च्, छ्, ज्, झ्

Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

FAQ:मराठी भाषेतील वर्ण व वर्णविचार

Q.1 मराठी भाषेमध्ये किती व्यंजने आहेत ?
➤ मराठी भाषेत एकूण ३४ व्यंजने आहेत.

Q.2 मराठी मध्ये किती स्वर आहेत ?
➤ मराठी मध्ये एकूण १४ स्वर आहेत.

Q.3 व्यंजने म्हणजे काय ?
➤जे वर्ण स्वरा शिवाय अपूर्ण असतात त्यांना व्यंजने म्हणतात

Q.4 महाप्राण व्यंजने कोणते आहेत?
➤ह युक्त उच्चार होणारे -ख घ भ श ष स ह हे महाप्राण चे उच्चार आहेत

Q.5 तालव्य वर्ण म्हणजे काय ?
➤ य युक्त उच्चार करणारे वर्ण म्हणजे तालव्य वर्ण .

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf