https://www.dompsc.com

प्रयोग व प्रयोगाचे प्रकार (change the voice )-मराठी व्याकरण

प्रयोग व प्रयोगाचे प्रकार


प्रयोग व प्रयोगाचे प्रकार

✪ ❝ कर्ता ,कर्म ,क्रियापद यांच्या परस्पर सम्बंधाला ❞प्रयोग असे म्हणतात
● कर्त्या ची व् कर्माची क्रियापदाशी जी ठेवण असते त्याला प्रयोग असे म्हणतात .

मराठी व्याकरनामध्ये प्रयोगाचे प्रमुख तिन प्रकार आहेत

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणि प्रयोग
  3. भावे प्रयोग

प्रयोगाचे प्रकार


कर्तरी प्रयोग

वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग,वचनानुसार बदलते त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमा विभक्ति मध्ये असतो
  • सकर्मक कर्तरी:ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात..
    उदा.शुभम आंबा खातो
  • अकर्मक कर्तरी:ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
    उदा.शुभम पडला

कर्मणि प्रयोग

वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग,वचनानुसार बदलते त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
  • प्रधान कर्तुककर्मणि प्रयोग:क्रियापद हे कर्माच्या लिंग ,वचनानुसार बदलत असले तरी ,बहुतेक कर्ताच प्रधान असतो
    उदा.तिने गाणे म्हटले

  • शाक्य कर्मणि प्रयोग:ज्या वाकयातुन क्रियापद शक्यता दाखवतो त्याला शाक्य कर्मणी प्रयोग म्हणतात.
    उदा.रामाच्याने काम करवते

  • प्राचीन पुरुष कर्मणि प्रयोग:प्राचीन काव्यत सकर्मक धातुला ज हा प्रत्यय लावून करिजे ,बोलिजे असे शब्द बनतात त्याला प्राचीन पुरुष कर्मणि प्रयोग म्हणतात.
    उदा.नले इंद्रासी बोलिजे.

  • समापन कर्मणि प्रयोग:जेव्हा प्रयोगाच्या वाक्याचा क्रियाप्दाचा अर्थ क्रिया पूर्ण झाल्या सारखा वाटतो तेव्हा त्याला समापन कर्मणि प्रयोग म्हणतात.
    उदा.त्याचा पेरू खाऊन झाला

  • नवीन कर्मणी प्रयोग / कर्मकर्तरी:इंग्रजी तील passive Voice प्रमाने कर्म आधी लिहिल्या जाते.
    उदा.रामाकडून रावन मारल्या गेला

भावे प्रयोग

क्रियापदाचे रूप हे कर्त्या व् कर्मा च्या नुसार बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुष नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा त्याला भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा.मुलाने बैलास मारले.
  • कर्ता नेहमी तृतीय किंवा चतुर्थी असतो
  • कर्म नेहमी द्वितीया असते
  • सकर्मक भावे:वाक्यात कर्म असते.
    उदा.मुलानी चेंडू खेळावे
  • अकर्मक भावे:वाक्यात कर्म नसते.
    उदा.मुलानी खेळावे

काही वाक्यात एकाच वेळेस २ वेगळी प्रयोग येतात तेव्हा त्याना मिश्र किंवा संकर प्रयोग म्हणतात

  • कर्तु कर्म संकर
    उदा.तू मला पुस्तक दिलेस.
    (कर्तरी-कर्मणि )
  • कर्म -भाव संकर
    उदा.आईने मुलाना शाळेत घातले.
    (कर्मणि-भावे )
  • क्रतु भाव संकर
    उदा.तू घरी जायचे होतेस.
    (कर्ता-भावे प्रयोग )

Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf

->