वाक्य व वाक्याचे प्रकार-मराठी व्याकरण Mpsc Marathi Grammar
वाक्य व वाक्याचे प्रकार
By Shubham Vyawahare
17-November-2024
अर्थानुरोधानुसार वाक्य प्रकार:वाक्यातील अर्थ काय निघतो त्या नुसार वाक्याचे प्रकार पाडले जातात
- विधानार्थी वाक्य:'एखादे वाक्य काही विधान करत असेल तर त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात '
➤ उदा. माझे पूर्ण नाव शुभम व्यवहारे आहे. - प्रश्नार्थी वाक्य:'एखादे वाक्य प्रश्न विचारत असेल तर त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.या वाक्याच्या शेवटी नेहमी प्रश्नार्थक चिन्ह असते.'
➤ उदा. ती सध्या काय करते ? - उद्गारार्थी वाक्य:'ज्या वाक्यातुन भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.'
➤ उदा. अबबब ! केवड़ा मोठा साप आहे हा. - होकारार्थी वाक्य:'एखादे वाक्य सकारात्मक अर्थ बोधित असेल तर त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात.'
➤ उदा. पाउस चांगला झाला म्हणजे चांगले पिक येइल. - नकारार्थी वाक्य:'एखादे वाक्य नकारार्थक अर्थ बोधत असेल तर त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात .'
➤ उदा. अभियांत्रिकी करुण नोकरी मिळत नाही.
क्रियापदाच्या रुपवारून वाक्याचे प्रकार :क्रियेतुन का्य अर्थ निघतो त्यानुसार वाक्य प्रकार पडतात
- स्वार्थी वाक्य:वाक्यातील क्रियापदानुसार काळ समजत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात '
➤ उदा. मी घरी जाइल , जाणार. - अज्ञार्थी वाक्य:वाक्यातील क्रियापदानुसार उपदेश ,प्राथना ,विनंती ,आदेश यांचा बोध होत असेल तर.'
➤ उदा. हे महाराजा याला सुखी ठेव. - विध्यर्थी वाक्य:वाक्यातील क्रियापदानुसार विधि म्हणजे कर्त्तव्य ,शक्यता ,योग्यता यांचा बोध होत असेल तर.'
➤ उदा. मी त्याला वाचवले पाहिजे.
वाक्य व वाक्यप्रकार ओळखायची सोपी पद्धत
वाक्यप्रकार | उद्देश | विधेय | अवलंबत्व |
---|---|---|---|
केवलवाक्य | एकच उद्देश | एकच विधेय | - |
मिश्र वाक्य | एकापेक्षा जास्त उद्देश | एकापेक्षा जास्त विधेय | उद्देश व विधेय एकमेकांवर अवलंबून |
संयुक्त वाक्य | एकापेक्षा जास्त उद्देश | एकापेक्षा जास्त विधेय | दोन वेगळी वाक्य असतात आणि विधेय पण वेगळा असतो |
वाक्यातील विधानावरून: वाक्यातील विधानातून का्य बोध होतो त्यावरून वाक्य प्रकार पडतात
- केवल वाक्य:वाक्यात एकच विधान,म्हणजे एकच उद्देश,एकच विधेय असेल तर त्याला शुध वाक्य किंवा केवल वाक्य म्हणतात. '
उद्देश म्हणजे वाक्य कुणाला उदेशून केले आहे हे ओळखणेउदा.आम्ही जातो अमुच्या गावा.
विधेय म्हणजे त्या वाक्यात साध्य काय झाले
ह्या वाक्यामध्ये 'जातो' हि क्रिया शक्य झाली म्हणून हे विधेय आणि वाक्यातील जाण्याचा उद्देश कुणाबद्दल आहे तर स्वत बद्दल आहे म्हणून आम्ही हा उद्देश झाला.
केवल वाक्य हे होकारार्थी ,विधानार्थी ,प्रश्नार्थी कोणतेही असू शकते. - मिश्र वाक्य:एक प्रधान वाक्य व् एक किंवा अधिक गौण वाक्य मिळून जे वाक्य तयार होते त्याला मिश्र वाक्य म्हणतात.'
- ➤ प्रधानवाक्य:जे वाक्य मुख्य अर्थ बोधित असते
- ➤ गौण वाक्य:जे वाक्य मुख्य वाक्याला धरून असते.
- ➤ उदा.जे चकाकते ते सोने असतेच असे नाही.
- संयुक्त वाक्य:'वाक्यात दोन केवलवाक्य असून ते दोन्ही उभयान्ववी अव्ययाने जोड्लेले असतात अश्या वाक्याना संयुक्त वाक्य म्हणतात. '
➤ उदा.मी दररोज पहाटे उठतो व पोहायला जातो.
वरील वाक्या मध्ये मी दररोज पहाटे हे एक केवलवाक्य असून पोहायला जातो हे एक केवलवाक्य आहे आणि व हा उभयान्ववी अव्यय आहे.
अश्या वाक्यांमध्ये दोन्ही वाक्य ही एकमेकांवर विसव्लेले नसतात तर स्वतंत्र अर्थ बोध करतात.
व्याकरणाचे नियम समजले की वाक्याचे आकलन होते व् त्यातील अर्थ उलघ्डायला लागतो ,व् अर्थ उलघडला की विचारांची देवाण घेवाण करने साध्य होते.
Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar
Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers
Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List
MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )
Others Blogs Related to Mpsc Marathi Grammar
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf