https://www.dompsc.com


Download MPSC Mains GS4 Syllabus In Marathi

Download MPSC Mains GS4 Syllabus In Marathi

Author

By Shubham Vyawahare

17-November-2024

➤महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही संस्था महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी राज्यसरकार ला नियुक्त करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात कार्य करते ,ही परीक्षा राज्यसेवा परीक्षा या नावाने घेतली जाते .MPSC ची ही परीक्षा ३ टप्प्यात नियोजित असून MPSC Mains Syllabus चा अभ्यास करूनच अभ्यासाला सुरुवात करता येते.
➤MPSC Mains paper मध्ये GS1, GS2,GS3,GS4 विषयाचे पेपर असून भाषा विषयासाठी इंग्रजी व मराठी भाषेचा लेखी स्वरूपाचा पेपर असतो.
➤MPSC Mains GS4 Syllabus हा अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषि या विषयाशी निगडित असून त्याचा MPSC Mains Syllabus खूप मोठा आहे, तसेच MPSC Mains Gs 4 हा विज्ञान व तंत्रज्ञान विकास दर्जा या संबंधित आहे तर याच्या MPSC Mains Syllabus मध्ये आता चालू घडामोडी सुद्धा वाचाव्या लागतील. Gs 4 मध्ये मुख्य भर हा अर्थशास्त्र आणि कृषी आधारित अर्थव्यवस्थेवर असतो.तर GS4 चा MPSC Mains Syllabus हा अर्थशास्त्राची ओळख करून देतो.

Read MPSC Mains GS 4 Syllabus:Economics and Planning

Point Topics
१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
१.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना - स्थूल देशांतर्गत उत्पादन - स्थूल राष्ट्रीय उत्पादन - स्थूल मूल्यवर्धन, घटक खर्चानुसार, बाजार किंमतीनुसार, स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, व्यापारचक्रे. रोजगार संकल्पना- बेरोजगारीचे मापक
१.२ वृद्धी आणि विकास विकासाचे निर्देशांक - विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशांक , समावेशक विकास, शाश्वत विकास - विकास आणि पर्यावरण, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन, शाश्वत विकास उद्दीष्ट्ये , आर्थिक विकासाचे घटक : नैसर्गिक साधने, पायाभूत सुविधा , तंत्रज्ञान, भांडवल, लोकसंख्या – मानवी भांडवल - लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, मानव विकास निर्देशांक, लिंगभाव दरी, लिंगभाव सबलीकरण उपाययोजना, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, शासन. दारिद्रयविषयीचे अंदाज व मापन - दारिद्रयरेषा, मानवी दारिद्रय निर्देशांक. उत्पन्न, दारिद्रय व रोजगार यांतील परस्पर संबंध- वितरण आणि सामाजिक न्यायाची समस्या, भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम.
१.३ सार्वजनिक वित्त बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची / आयव्ययाची भूमिका (बाजार अपयश व विकासानुकूलता) - सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू, सार्वजनिक प्राप्तीचे / महसुलाचे स्रोत – करभार/ कराघात व कराचा परिणाम, सार्वजनिक खर्चाचे प्रकार, अंदाजपत्रकीय तूट, राजकोषीय तूट- संकल्पना, तुटीचे नियंत्रण, सार्वजनिक कर्ज,कार्याधारित व शून्याधारित अर्थसंकल्प, लिंगभाव आधारित अर्थसंकल्प.
१.४ मुद्रा/ पैसा पैशाची कार्ये - आधारभूत पैसा - उच्च शक्ती पैसा - चलन संख्यामान सिद्धांत - मुद्रा गुणांक. भाववाढीचे मौद्रिक व मौद्रिकेतर सिद्धांत - भाववाढीची कारणे : मौद्रिक, राजकोषीय व थेट उपाययोजना.
१.५ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल वृद्धीचे इंजिन -स्वरुपात आंतरराष्ट्रीय व्यापार - आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत – अभिजात व आधुनिक सिद्धांत, वृद्धीतील परकिय भांडवल व तंत्रज्ञानाची भूमिका - बहुराष्ट्रीय कंपन्या. आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संस्था, आशियाई विकास बँक क्षेत्रीय व्यापार करार - सार्क, आसियान. जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक- व्यापारविषयक बौद्धिक संपदा आणि व्यापारविषयक गुंतवणूक उपाय

Read MPSC Mains GS 4 Syllabus:Agriculture and Development Economics

२ भारतीय अर्थव्यवस्था
२.१ भारतीय अर्थव्यवस्था - आढावा भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने - दारिद्रय , बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल – निर्मुलनाचे उपाय. नियोजन - प्रकार व तर्काधार, नियोजन आयोग, नीती आयोग. आर्थिक सुधारणा : पार्श्वभूमी , उदारीकरण , खाजगीकरण व जागतिकीकरण - संकल्पना , अर्थ, व्याप्ती व मर्यादा, केंद्र आणि राज्य पातळीवरील आर्थिक सुधारणा
२.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास आर्थिक विकासात शेतीची भूमिका - शेती, उद्योग व सेवा क्षेत्रांमधील आंतरसंबंध, भारतातील कृषि विकासातील प्रादेशिक असमानता. शेतीचे प्रकार –कंत्राटी शेती – उपग्रह शेती – कॉर्पोरेट शेती - सेंद्रिय शेती. कृषी उत्पादकता - हरित क्रांती व तंत्रज्ञान विषयक बदल, जनुकीय सुधारणा तंत्रज्ञान, कृषी किंमत निर्धारण, कृषी विपणन, शेती पतपुरवठा व नाबार्ड.)जलसिंचन आणि जलव्यवस्थापन पशुधन आणि त्याची उत्पादकता – भारत व महाराष्ट्रातील धवल क्रांती, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण, फलोत्पादन, पुष्पोत्पादन विकास. कृषी अनुदान - आधार किंमत आणि संस्थात्मक उपाय, सार्वजनिक वितरण व्यवस्था - अन्न सुरक्षा - कृषी विपणनावरील गॅट (GATT) कराराचे परिणाम.ग्रामविकास धोरणे - ग्रामीण पायाभूत संरचना (सामाजिक आणि आर्थिक)
२.३ सहकार संकल्पना, अर्थ, उद्दिष्टे, सहकाराची नवीन तत्वे. महाराष्ट्र आणि भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण, स्वयंसहाय्यता गट. राज्याचे धोरण आणि सहकार क्षेत्र - कायदे, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहाय्य.महाराष्ट्रातील सहकार समस्या. जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहकाराचे भवितव्य.
२.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र भारतीय वित्त व्यवस्था - संरचना, भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका, मौद्रिक व पत धोरण, संक्रमण यंत्रणा , भारतातील भाववाढ लक्ष्य, भारतातील बँकिंग आणि बँकेतर वित्तसंस्थांचा विकास, नाणे बाजार - 1991 नंतरच्या घडामोडी, भांडवल बाजार -1991 नंतरच्या घडामोडी , सेबीची भूमिका , वित्तीय क्षेत्रातील सुधारणा
२.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था महसुलाचे स्रोत- (केंद्रीय व राज्यस्तरीय), सार्वजनिक खर्च (केंद्रीय व राज्यस्तरीय) - वृद्धी व कारणे, सार्वजनिक खर्च सुधारणा - करसुधारणांचे समिक्षण - मूल्यवर्धित कर - वस्तू व सेवा कर, केंद्रीय व राज्यस्तरीय तूट आणि तूटीचा अर्थभरणा. सार्वजनिक कर्ज वृद्धी, घटक व भार, राज्यांच्या केंद्राकडून असलेल्या ऋणभाराची समस्या,भारतातील वित्त आयोग, भारतातील वित्तीय सुधारणा.
२.६ उद्योग व सेवा क्षेत्र आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्त्व व भूमिका, वृद्धीचे स्वरुप, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतातील मोठ्या उद्योगांची सरंचना. सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग (MSMEs) वृद्धी, समस्या, संभाव्य शक्यता व धोरणे. (एस.ई.झेड., एस.पी.व्ही.) आजारी उद्योग - उपाय, औद्योगिक निकास धोरण. 1991 च्या पूर्वीची व नंतरची औद्योगिक धोरणे, भारत व व्यवसाय सुलभता. भारतातील सेवा क्षेत्राची रचना व वृद्धी भारतीय श्रम – समस्या, उपाय व सुधारणा , सामाजिक सुरक्षा उपाय
२.७ पायाभूत सुविधा विकास पायाभूत सुविधांचे प्रकार, ऊर्जा, पाणी पुरवठा व सफाई इत्यादी पायाभूत सुविधांची वृद्धी, गृहनिर्माण, वाहतूक (रस्ते, बंदरे इ.) दळणवळण (पोस्ट व टेलिग्राफ, दूरसंचार), रेडिओ, दूरचित्रवाणी व इंटरनेटचे जाळे. भारतातील पायाभूत सुविधांसंदर्भातील समस्या पायाभूत सुविधांसाठीचा वित्त पुरवठा - आव्हाने व धोरण पर्याय, सार्वजनिक-खाजगी क्षेत्र भागीदारी (PPP). थेट परकीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा विकास, पायाभूत सुविधा विकासाचे खाजगीकरण. पायाभूत सुविधा संदर्भातील केंद्र आणि राज्य (एस.पी.व्ही.) सरकारची धोरणे - विशेष उद्देश साधने , परवडणारी घरे, झोपडपट्टी पुनर्वसन
२.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल भारताच्या परकीय व्यापाराची वृद्धी, रचना आणि दिशा, परकीय व्यापार धोरण - निर्यात प्रोत्साहन उपक्रम. विदेशी भांडवल प्रवाह - रचना व वृद्धी, शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक. इ -व्यापार, परकीय व्यापारी कर्जे (ECBs). बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था आणि भारत. भारतातील विनिमय दर व्यवस्थापन
२.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी, उद्योग व सेवा क्षेत्राची वैशिष्ठ्ये, महाराष्ट्र सरकारची कृषि , उद्योग व सेवा क्षेत्रासाठीची धोरणे, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन - महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक. उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र
२.१० कृषि १. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व
कमी उत्पादनक्षमतेची कारणे - राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान. मुलभूत शेतीविषयक निविष्ठाची माहिती, शेतीचे आकार आणि उत्पादकता, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे. कृषी उत्पादन वाढीसाठी इतर शासकीय धोरणे, योजना आणि कार्यक्रम जसे जमीन सुधारणे आणि जमीन वापर, मृद आणि जलसंधारण, पर्जन्य शेती, सिंचन आणि त्याच्या पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण. सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी. कृषि कर आणि जीएसटी. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषि विषयक विविध करार (W.T.O.). पिक विमा योजना आणि त्यांची वाटचाल, भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र कृषि व संशोधन परिषद (MCAER) यांची कृषि क्षेत्रातील कार्ये.
२. ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषि पत पुरवठा
  • भारतीय कृषि क्षेत्रात कर्जाची गरज, भूमीका आणि महत्व, कृषि पतपुरवठ्याचे वर्गीकरण, पुरवठा करणारे स्त्रोत, वाणिज्य आणि सहकारी बँक, नाबार्ड, ग्रामीण बँक इत्यादी संस्था, कर्ज परतफेडीचे प्रकार, किसान क्रेडीट कार्ड योजना
  • कृषि मूल्य – कृषि मूल्यांचे विविध घटक आणि विविध कृषि उत्पादनावर परिणाम करणारे घटक, कृषि मालांच्या _ विविध शासकीय आधारभूत किंमती, केंद्रीय कृषि मूल्य आयोग (CACP), शासकीय विविध कृषिमाल खरेदी, विक्री व साठवणूक करणाऱ्या संस्था (NAFED, NCDC etc.)
  • कृषि विपणन, बाजार आणि बाजार रचना, बाजार एकत्रिकरण, कृषि विपणनामध्ये जोखमीचे प्रकार, कृषि विपणनात शासकीय संस्थांची भुमिका (APMC, NAFED, NCDC, E Nam etc.)
२.११ अन्न व पोषण आहार भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल, अन्न स्वावलंबन, अन्न सुरक्षिततेमधील समस्या, साठवणुकीतील समस्या व प्रश्न, प्रापण, वितरण, अन्नाची आयात व निर्यात, भारतातील सामान्य पौष्टीक समस्या. शासकीय धोरणे, योजना जसे सार्वजनिक वितरण योजना, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन योजना आणि इतर पौष्टीक कार्यक्रम यासारखे कार्यक्रम. हरित क्रांती आणि अन्नाच्या आत्मनिर्भरतेवर त्याचा परिणाम. खाद्य कार्यक्रमासाठी तेल पौष्टिक सुरक्षा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३

Read MPSC Mains GS 4 Syllabus:Science And Technological Development

३. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास
३.१ ऊर्जा विज्ञान: पारंपारिक ऊर्जा स्त्रोत- जिवाश्म इंधन आणि ज्वलन, औष्णिक, जलविद्युत शक्ती (भरती व लहरी शक्ती), आवश्यक द्रव गतीशास्त्र ऊर्जा रुपांतरण
अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत – परिचय, तत्व आणि प्रक्रिया- सौर, पवन, समुद्रलाटा, भूऔष्णिक, जीववस्तुमान, कचरा, जैववायू, पेट्रोप्लांट आणि इतर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत. उदा.- ऊस पिक इत्यादीचे उपउत्पादने, सौर साधने, सौर कुकर, पाणीतापक, सौरशुष्कयंत्र इत्यादी.
भारतातील ऊर्जा संकट- शासन धोरणे व ऊर्जा निर्मिती कार्यक्रम (MNRE, MEDA, IREDA etc.) औष्णिक व जलविद्युत निर्मिती कार्यक्रम, विज वितरण व विद्युत पुरवठा यंत्रणा-ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड, सौर विद्युत घटप्रणाली, उर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यामधील कार्यरत संस्था.
३.२ संगणक व माहिती तंत्रज्ञान परिचय - संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅक्सेसरीज कम्युनिकेशन , नेटवर्किंग-वायर्ड / वायरलेस, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक / डायनॅमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान- क्लाऊड कंप्यूटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन. इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आभासी वास्तव / संवर्धित वास्तव (व्हीआर / एआर), मेसेजिंग, सर्च इंजिन, डिजीटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता / मशीन लर्निंग (एआय / एमएल)
शासकीय पुढाकार - मिडिया लॅब एशिया, डिजीटल इंडिया इ.
सुरक्षा- नेटवर्क आणि माहिती सुरक्षा, फॉरेन्सिक, सायबर कायदा
३.३ अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान भारतीय अंतराळ अभ्यास- धोरणे व कार्यक्रम, अंतराळ मोहिमा, ISRO, भारतीय कृत्रिम उपग्रह, प्रस्तावना, कार्यतत्व, उपयोजन, उदा- दूरदर्शन प्रसारण, दूरसंचारण, हवामान अंदाज, GPS, आपत्ती पूर्वानुमान, शिक्षण. उपग्रह प्रक्षेपक, अवकाश कचरा. सुदूरसंवेदन आणि त्यांचे उपयोजन- GIS आणि त्याचे उपयोजन उदा.- अभियांत्रिकी आणि नियोजन, सुविधा, व्यवस्थापन, पर्यावरण आणि संसाधने व्यवस्थापन, मार्गीका जाळे, भूभाग माहिती प्रणाली.
३.४ जैवतंत्रज्ञान
  • ३.४.१ प्रस्तावना:जैवतंत्रज्ञान, अति सुक्ष्मतंत्रज्ञानाची प्रस्तावना, संधी, वापर व स्वरुप, जनुक फुटन, पुनसयंत्रक डीएनए तंत्रज्ञान.
  • ३.४.२ शेतीमध्ये (कृषि) जैवतंत्रज्ञान- प्रस्तावना, इतिहास, जैविक किटकनाशक, जैविक खते,जैव इंधन, पर्यावरण विषयक स्वच्छता, जैविक उपचार, जैवविविधतेचे संवर्धन.
  • ३.४.३ वनस्पती उर्जा संवर्धन-आधुनिक तंत्रज्ञान, उपयोगिता, दुय्यम चयापचय.
  • ३.४.४ प्रतिरक्षा विज्ञान-प्रतिरक्षानिदान तंत्रे, पशु पेशी तंत्रज्ञान
  • ३.४.५ डीएनए तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरीता उपयोगीता- जनुकिय परावर्तीत प्राणी, कृतक व मुळपेशी संशोधन, मनुष्याचे डीएनए चाचणी (पासरेखा), मनुष्याची वैयक्तीक ओळख पटविण्याची कार्यपद्धती, उपयोजित मानवी जनुक विज्ञान पितृत्व चाचणी, जनुकीय समुपदेशन, वैद्यकशास्त्रामध्ये डीएनए तंत्रज्ञान, पेशीजननशास्त्र, रक्तजल जनुक विज्ञान, कर्करोग आणि सुक्ष्मजीव संसर्गाचे निदान.
  • ३.४.६ लसी – परंपरागत व आधुनिक जैवपद्धतीच्या लसी.
  • ३.४.७ किण्वन - औद्योगिकदृष्ट्या महत्वपूर्ण किण्वन उत्पादने.
  • ३.४.८ जैवनैतिकता - आरोग्यसेवेत जैवनैतिकता, कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान, जन्मपूर्व निदान, जनुकीय चाचणी, अनुवंशिक तपासणी, जनुकीय उपचार पद्धती, प्रत्यारोपण तंत्रज्ञान
  • ३.४.९ जैवसुरक्षा - जैवसुरक्षितता, विशिष्ट जीवांकरिता जैवसुरक्षेचे टप्पे, जैवतंत्रज्ञान विभागाची मार्गदर्शक तत्वे.
  • ३.४.१० एकाधिकार (पेटंट) : प्रस्तावना, बौद्धिक मालमत्ता अधिकार, पेटंटिग प्रक्रिया, पेटंट कायदा- प्रक्रिया व उत्पादन
३.५ भारताचे औष्णिक कार्यक्रम प्रस्तावना, ठळक वैशिष्टे, आवश्यकता, अलीकडील आण्विक धोरणे, आण्विक चाचण्या, आण्विक -औष्णिक वीज निर्मिती- तत्व, रचना, कार्य आणि पर्यावरण (आण्विक कचरा, अपघात) भारतातील आण्विक विद्युत निर्मिती केन्द्र, आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग उदा. ग्राहक उत्पादने, अन्न आणि शेती उत्पादने.वैद्यकीय औषधे इत्यादी
३.६ आपत्ती व्यवस्थापन
  • आपत्ती व्यवस्थापन-व्याख्या, पर्यावरणीय तणाव (स्ट्रेस), आपत्तीचे वर्गीकरण
  • नैसर्गिक आपत्ती- कारणे, परिणाम व उपाय योजना. भूकंप, त्सुनामी, महापूर, दरडी कोसळणे, अवर्षण, वणवा, वीजा कोसळणे.
  • मानवी आपत्ती- कारणे, परिणाम व उपाय योजना. वाळवंटीकरण, मृदा धूप, जंगले, शेती व घरांना लागणाऱ्या आगी
  • दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया - बॉम्ब स्फोट, नागरी भाग आणि दाट लोकवस्तींना लक्ष्य करून केलेले हल्ले
  • अपघात- पूल व पादचारी पूल कोसळणे, महाराष्ट्रातील विविध पूलांचे, इमारतींचे, धरणांच्या भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची आवश्यकता, बांधकाम अंकेक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) प्राधिकरणांचे गठण व त्यांची गरज. आपत्तींची ओळख / पूर्वकल्पना व वितरण, प्रभावक्षेत्र व धोके त्यांचे विश्लेषण, आपत्ती विषयक जाणीवा, पूर्वानुमान, मदत कार्य व पुनर्वसन कार्य.

Read MPSC Mains Syllabus

Download MPSC Mains Syllabus in Marathi