https://www.dompsc.com


Details Analysis Of MPSC Csat Paper

Details Analysis Of MPSC Csat Paper

Author

By Shubham Vyawahare

17-November-2024

➤महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) संस्था दरवर्षी राज्यसेवा परीक्षा तीन टप्यात घेत असून ह्या परीक्षे मध्ये पास होण्यासाठी प्रत्येक परीक्षेच्या पद्धतीचे MPSC Pre Paper Analysis होणे अत्यंत गरजेचे असते.विद्यार्थ्यांना दरवर्षी च्या पेपर चे Analysis करतच यशाची पायरी गाठावी लागते.
➤MPSC PRE Paper मध्ये जो दुसरा पेपर आहे तो अत्यंत महत्वाचा ठरतो. CSAT म्हणजे CIVIL Services Aptitude Test जो राज्यसेवा परीक्षा २०१३ पासून पद्धती मध्ये समाविष्ट झाला.
➤MPSC Pre analysis करत असताना पूर्व परीक्षे ला येणाऱ्या सर्व विषयाची माहिती असणे महत्वाचे ठरते तर ह्या परीक्षे मध्ये MPSC CSAT पेपर हा साधारण ८० प्रश्नांचा असतो आणि प्रत्येक प्रश्नास २.५ मार्क दिलेले असतात.परंतु प्रश्न क्रमांक ७५-८० हे Decision Making आधारित प्रश्न असतात ज्यात परीक्षार्थी ची निर्णय क्षमता ओळखली जाते.निर्णयाधारित जे प्रश्न आहेत त्यात नकारात्मक गुण वगळले जात नाहीत.तर ह्यात दिलेले चारही पर्याय बरोबर असतात. See MPSC Pre Syllabus in detail

➤ MPSC CSAT Paper 2 आता Qualifying(पात्रताप्रात ) झाला आहे म्हणून ह्या पेपर मध्ये किमान ३३ % घातल्यास GS-1 पेपर तपासल्या जाईल आणि अंतिम गुण यादी फक्त GS -१ वर आधारित असेल

MPSC CSAT Paper Pattern

➤MPSC Csat paper analysis करताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि ८० प्रश्ना पैकी कोणते प्रश्न कशावर आलेले आहेत
➤खाली एकूण प्रश्न कशावर विचारतात ते दिले आहे.

Details Analysis of 80 MPSC CSAT question

Queston Topics
40-45 मराठी उतारे प्रश्न
5 इंग्रजी उतारे प्रश्न
10-12 आकलनशक्तीधारित प्रश्न
10-13 गणिताधरीत प्रश्न
5 Deciosion Making

MPSC CSAT उताऱ्यावरील प्रश्ने

Details Analysis of MPSC CSAT from 2013

MPSC CSAT Paper मध्ये ८० प्रश्नांपैकी ५० प्रश्न हे उतारे आणि त्या आधारित प्रश्नावर आधारलेले असतात,ज्यात ९ उतारे हे मराठी भाषेतील असतात तर १ उतारा व त्या खालील प्रश्न हे इंग्रजी माध्यमातील उतार्यावर आधारित असतो.परीक्षेत येणारी उतारे हे विविध प्रकारातील असून काही वर्षाचे आकलन खालील तक्त्यात दिलेले आहे.

उतारे विश्लेषण
विषय 2016 2017 2018 2019 2020
ऐतिहासिक 1 1 1 1 1
वैज्ञानिक 3 4 3 2 4
साहित्यिक 1 1 1 1 1
भौगोलिक - - 2 - 1
संविधान 1 1 1 - 1
अर्थशास्त्र 1 1 1 1 1
तत्वज्ञान 1 1 1 1 1
जनरल 1 1 - 1 1

वरील प्रकारच्या उतार्याचे आकलन आणि सराव केल्यास त्यास प्रकारचा उतारा सोडवण्यास मदत होते ,विज्ञानाधीष्टीत उतारे कधी सोपे तर कधी फार कठीण येतात

MPSC CSAT Math And Reasoning

Details Analysis of MPSC CSAT Math And Reasoning Problems

MPSC CSAT पेपर मधील ८० पैकी साधारणपणे २५-३० प्रश्न हे गणिती आणि आकालानाधारित गणितीय पद्धती मध्ये विचारले जातात ,ह्या भागास साधारण ४५ मार्क्स मिळवता येतात.
ह्यात साधारण २ प्रकारचे प्रश्न असतात १)संख्यात्मक अभियोग्यता २) बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र

संख्यात्मक अभियोग्यता

  • संख्यावरील क्रिया
  • लसावि व मसावी
  • वयावरील उदाहरणे
  • शेकडेवारी
  • काळ आणि वेग
  • भागीदारी
  • रेल्वे वरील गणिते
  • पाण्याची टाकी नळ
  • सरासरी
  • काम आणि वेग
  • क्षेत्रफळ
  • गणितीय क्रिया
  • संभाव्यता
  • मांडणीचे प्रकार
  • मिश्रणे
  • सरळव्याज चक्र वाढ व्याज

बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र
  • दिशा
  • अंकमालिका
  • गाळलेली पदे
  • अंक अक्षर संकेत
  • अक्षर मालिका
  • आदान प्रदान
  • वेगळी संख्या
  • केंलेंडर
  • घड़याळ
  • सांकेतिक भाषा
  • पझल
  • लॉजिक
  • दिशा
  • नातेसंबंध
  • विधाने व अनुमान
  • आकृत्या
  • भूमिती

Download Details Analysis Of MPSC Csat Paper