https://www.dompsc.com


MPSC Mains Syllabus in Marathi

MPSC Mains Syllabus in  Marathi

Author

By Shubham Vyawahare

23-April-2024

➤महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही संस्था महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी राज्यसरकार ला नियुक्त करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात कार्य करते ,ही परीक्षा राज्यसेवा परीक्षा या नावाने घेतली जाते .MPSC ची ही परीक्षा ३ टप्प्यात नियोजित असून MPSC Mains Syllabus चा अभ्यास करूनच अभ्यासाला सुरुवात करता येते.
➤MPSC Mains paper मध्ये GS1, GS2,GS3,GS4 विषयाचे पेपर असून भाषा विषयासाठी इंग्रजी व मराठी भाषेचा लेखी स्वरूपाचा पेपर असतो.
➤MPSC Mains Gs 1 Syllabus हा इतिहास,भूगोल,पर्यावरण विषयाची निगडित असून त्याचा MPSC Mains Syllabus खूप मोठा आहे, तसेच MPSC Mains Gs 2 Syllabus हा राज्यातील घटना ,कायदे नियमन या संबंधित आहे तर याच्या MPSC Mains Syllabus मध्ये आता कायदे सुद्धा वाचावे लागतील.MPSC Mains Gs 3 Syllabus मध्ये मुख्य भर हा मानव संसाधन व मानवी हक्क यावर असतो.तर GS4 चा MPSC Mains Syllabus हा अर्थशास्त्राची ओळख करून देतो.

Read MPSC Mains Syllabus in Marathi

➤ MPSC GS1 पेपर हा इतिहास ,भूगोल व पर्यावरण विषयाचा असतो.साधारणतः १५० मार्काचा हा पेपर असतो व यात १५० प्रश्न असतात.
➤ एकूण १५० प्रश्नापैकी जवळपास ६० प्रश्न हे इतिहासाचे असतात तर बाकीचे प्रश्न हे भूगोल आणि पर्यावरण विषयाशी निगडीत विचारले जातात.

MPSC Mains GS 1 Syllabus 2021

MPSC Mains GS1 Syllabus for History

Point Topics
इतिहास
१.१ ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, प्रमुख भारतीय सत्तांच्याविरुध्द युध्दे, तैनाती फौज धोरण, खालसा करणाचे धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटीश सत्तेची रचना.
१.२ आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक शिक्षणाची ओळख- वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा आणि सामाजिक- धार्मिक सुधारणा आणि त्यांचा समाजावरील परिणाम.
१.३ प्रबोधन काळ :
१.३.१ सामाजिक-सांस्कृतिक बदल-ख्रिश्चन मिशनरींबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८-१८५७). सामाजिक-धामिक सुधारणांच्या चळवळी : ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन व थिऑसॉफिकल सोसायटी.
१.३.२ शीख तसेच मुस्लिम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टीस पार्टी.
१.४ वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था व्यापारीक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहन सिध्दांत, अनौद्योगीकरण, भारतीय हस्तोद्योगांचा हास, भारतीय कृषीव्यवस्थेचे वाणिज्यीकरण. आधुनिक उद्योगांचा उदय - भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटीश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी (फंड ) व गो. कृ. गोखले यांचे योगदान.
1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास - सामाजिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्रे व शिक्षण यांची भूमिका, 1857 चा उठाव, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना (इंडियन नॅशनल काँग्रेस), मवाळ गटाचा काळ, जहाल गटाची वाढ, बंगालची फाळणी, होमरुल चळवळ, महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिकासुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, ए. ओ. ह्यूम, बिपीनचंद्र पाल, लाला लजपत राय, अॅनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु व इतर.
१.६ ब्रिटीश शासनाविरोधी झालेले प्रसिध्द उठाव -
१.६.१ शेतमजुरांचे उठाव, आदिवासींचे उठाव - राघोजी भांगरे, उमाजी नाईक इत्यादी व आदिवासींच्या चळवळी
१.६.२ क्रांतीकारी चळवळी- महाराष्ट्रातील बंड- वासुदेव फडके, अभिनव भारत, बंगाल व पंजाब मधील क्रांतीकारी चळवळी, अमेरिका, इंग्लंड, येथील भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी, आझाद हिंद सेना..
१.६.३ साम्यवादी (डावी) चळवळ :- साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, काँग्रेस समाजवादी पार्टी, ट्रेड युनियन चळवळ.
१.७ गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टीकोन गांधीजीचे नेतृत्व आणि प्रतिकाराचे तत्व, गांधीजींच्या लोक चळवळी, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन १९३६, वैयक्तिक सत्याग्रह, चलेजाव चळवळ, गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन, जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळी- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन, गांधीजींचा दृष्टीकोन, इतर प्रयत्न, संयुक्त पक्ष (युनियनिस्ट पार्टी) व कृषक प्रजा पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग, संस्थानातील जनतेच्या चळवळी.
१.८ ब्रिटीश प्रशासन अधीन घटनात्मक विकास भारतीय परिषद कायदा-१८६१, भारतीय परिषद कायदा- १८९२, भारतीय परिषद कायदा- १९०९ (मोर्ले-मिंटो सुधारणा), भारत सरकारचा कायदा- १९१९ (माँट-फोर्ड सुधारणा), भारत सरकारचा कायदा-१९३५.
१.९ सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ (सर सय्यद अहमद खान व अलिगढ चळवळ, मुस्लिम लीग व अली बंधू, इक्बाल, जिन्हा ), हिंदू महासभेचे राजकारण.
१.१० सत्तेच्या हस्तांतरणाकडे ऑगस्ट घोषणा- १९४०, क्रिप्स योजना- १९४२, वेव्हेल योजना- १९४५, कॅबिनेट मिशन योजना १९४६, माउंटबॅटन योजना १९४७, भारतीय स्वातंत्र्यता कायदा-१९४७.
१.११ स्वातंत्र्योत्तर भारत देशाच्या फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलिनिकरण, राज्यांची भाषावार पुनर्रचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महत्वांच्या राजकीय पक्षांचा सहभाग आणि त्यातील महत्वाच्या व्यक्ती, शेजारी देशांशी संबंध, भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणात भूमीका :-अलिप्ततावादी धोरण- नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी. भारताची कृषि, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, बांगलादेशाची मुक्तता, राज्यांतील संयुक्त सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी, काश्मिर, पंजाब आणि आसाम मधील आतंकवाद, नक्षलवाद आणि माओवाद, पर्यावरणविषयक चळवळ, महिलांची चळवळ आणि वांशिक चळवळ.
१.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक- त्यांची विचारप्रणाली व कार्य गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षि शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्या. का. त्र्यं. तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णूबुवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा
१.१३ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक) कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी. प्रायोगिक कला -नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत. लोककला - लावणी, तमाशा, पोवाडा, भारुड व इतर लोकनृत्ये. दृश्य कला- वास्तु रचना, चित्रकला व वास्तुशिल्प, उत्सव. महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासात वाड़मय व संत वाड़मयाचा प्रभाव: भक्ती, दलित, नागरी व ग्रामीण वांड्मय.

MPSC Mains GS 1 Syllabus-Geography 2021

MPSC Mains GS1 Syllabus for Geography and Environment

Point Topics
भूगोल
२.१ भूरुपशास्त्र पृथ्वीचे अंतरंग, रचना आणि घटना- अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे, भूमीस्वरुपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक, भूरुप चक्र संकल्पना, नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमीस्वरुपे. भारतीय उपखंडाची उत्क्रांती आणि भूरुपशास्त्र. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग. महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरुपीकीय वैशिष्टये. महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये/भूमीस्वरुपे- टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता (रांजण खळगे), धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण (बीचेस).
२.२ हवामानशास्त्र वातावरण – संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे. सौरऊर्जा- पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन. तापमान - पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे उर्ध्व व क्षितीज समांतर वितरण. हवेचा दाब- वारे, ग्रहीय व स्थानिक वारे. महाराष्ट्रातील मोसमी वारे (मान्सुन), पर्जन्याचे वितरण, अवर्षण, महापूर व त्यांच्याशी निगडीत समस्या.
२.३मानवी भूगोल: मानवी भूगोलातील विचारधारा- संभववाद/शक्यतावाद, असंभववाद/अशक्यतावाद, थांबा व पुढे जा विचारधारा, विकास संकल्पना. मानवी वसाहत – ग्रामीण व नागरी वसाहत- स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे व त्यांची रचना. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील समस्या. ग्रामीण-नागरी झालर/किनार क्षेत्र. नागरीकरण – नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन.
२.४ आर्थिक भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) आर्थिक व्यवसाय- शेती - महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप. उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती (HYV) शेतीची आधुनिक तंत्रे,सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, कृषीविषयक शासकीय धोरण.
मासेमारी / मत्स्य व्यवसाय-भूप्रदेशाअंतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण.
खनिजे व उर्जा साधने - महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे व उर्जा साधने, खनिज साठे व त्यांचे उत्खनन, महाराष्ट्रातील खाणकाम व्यवसायाच्या समस्या.
• वाहतूक- वाहतूकीचे प्रकार व महाराष्ट्रातील वाहतूक प्रकारांचा विकास, आर्थिक विकास, आर्थिक विकासाची साधने, शाश्वत विकास, जागतिकीकरण.
•पर्यटन- पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा (लेणी, किल्ले व ऐतिहासिक शिल्प).
• ज्ञानाधिष्ठीत आर्थिक व्यवसाय- ऋणपरमाणू संबंधी (इलेक्ट्रॉनिक) व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र (आय.टी.पार्क), भारतातील सिलीकॉन व्हॅली/माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैवतंत्रज्ञान (CTBT) भारतातील संशोधन व विकास संस्थेची (R&D) भूमिका.
2.5 लोकसंख्या भूगोल लोकसंख्या विषयक सांख्यिकी साधने /माहिती सामग्री, महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता व वितरण, महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना व वैशिष्टये, लोकसंख्या बदलाचे घटक-जनन दर, मर्त्यता दर, लोकस्थलांतर, महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्यू दर आणि लोकस्थलांतराचा कल व पातळी, लोकसंख्या वाढ व आर्थिक विकास, लोकसंख्या विषयक धोरण
२.६ पर्यावरण भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) परिसंस्था- घटक: जैविक आणि अजैविक घटक, ऊर्जा प्रवाह. ऊर्जा मनोरा. पोषण/रासायनिक घटकद्रव्यांचे चक्रीकरण, अन्न साखळी/श्रृंखला, अन्न जाळे, पर्यावरणीय -हास व संधारण, जागतिक परिस्थितीकीय असंतुलन, जैव विविधतेमधील हास, जैव विविधतेच्या हासाची धोके, मानव-वन्य जीव संघर्ष, निर्वनीकरण, जागतिक तापमान वाढ, हरित गृह परिणाम, CO, CO2, CHA, CFC's, NO यांची वातावरणातील पातळी, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील उष्मावृध्दी केंद्र (हीट आयलँड), पर्यावरण विषयक कायदे, पर्यावरणावरील आघाताचे मुल्यमापन (EIA), क्वेट्टो संहिता व वातावरणातील कार्बन क्रेडीटस्
२.७ भूगोल आणि आकाश-अवकाशीय / अंतराळ तंत्रज्ञान आकाश व अवकाश संज्ञा, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), जागतिक स्थिती प्रणाली (GPS) आणि दूर संवेदन यंत्रणा. देशाचे संरक्षण, बँकींग आणि अंतरजाळ (इंटरनेट) च्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, दूरस्थसंपर्क प्रणाली (टेलीकम्यूनिकेशन). वाहतूक नियोजन- लोहमार्ग, रस्तेमार्ग, सागरी मार्ग व हवाई मार्ग वाहतूक व्यवस्था. आरोग्य आणि शिक्षण, भारतातील मिशन शक्ती, अँटीसॅटेलाइट मिशन, अवकाशीय उपग्रह संपत्ती, अवकाश (स्पेस) संशोधन व विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्त्रो (ISRO) व डी.आर.डी.ओ. यांची भूमिका, अंतराळातील / अवकाशीय(Space) कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा आणि त्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय, भारताची भूराजनितीक स्थिती
२.८ आ रिमोट सेन्सिंगची मुलभूत तत्वे
  • रिमोट सेन्सिंगची मुलभूत संकल्पना
  • डेटा आणि माहिती
  • रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन
  • रिमोट सेन्सिंग फायदे आणि मर्यादा
  • रिमोट सेन्सिंग प्रक्रिया
  • इलेक्ट्रो- चुंबकीय स्पेक्ट्रम
  • वातावरणासह उर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह उर्जा परस्पर क्रिया (माती, पाणी, वनस्पती)
  • भारतीय उपग्रह आणि सेंसर वैशिष्ट्ये
  • नकाशा रिझोल्यूशन
  • प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त
  • दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक
  • निष्क्रीय आणि सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग
  • मल्टी स्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग
ब] एरियल फोटोग्राफ
  • हवाई छायाचित्रांचे प्रकार आणि वापर
  • कॅमेराचे प्रकार आणि त्यांचे अनुप्रयोग
  • त्रटी निर्धारण आणि स्थानिक रिझोल्यूशन
  • एरियल फोटोग्राफी व्याख्या आणि नकाशा स्केल
  • आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी
क] जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग
  • भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय (जीआयएस)
  • जीआयएस चे घटक
  • भू-स्थानिक डेटा- स्थानिक आणि गुणधर्म डेटा
  • समन्वये प्रणाली
  • नकाशा अंदाज आणि प्रकार
  • रास्टर डेटा आणि मॉडेल
  • वेक्टर डेटा आणि मॉडेल
  • जीआयएस कार्ये - इनपुट कुशलता, व्यवस्थापन, क्वेरी विश्लेषण आणि व्हिज्यूअलायझेशन
  • जमीन वापर जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण
  • डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम)
  • त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल (टीआयएन)
  • नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएसचे अर्ज

MPSC Mains GS 1 Syllabus-Agriculture 2021

MPSC Mains GS1 Syllabus for Agriculture

Point Topics
कृषी
३.१ कृषि परिसंस्था
  • परिसंस्थेची संकल्पना, रचना आणि कार्ये
  • परिसंस्थेतील उर्जा प्रवाह
  • परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म
  • जैवविविधता, तिचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन, संवर्धित शेती
  • नैसर्गिक साधनसपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका
  • पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी
  • कार्बन क्रेडीट : संकल्पना, कार्बन क्रेडीटची देवाण घेवाण, कार्बन जप्ती (Sequestration), महत्व, अर्थ आणि उपाय/मार्ग
  • पर्यावरणीय नितीतत्वे : हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्ल वर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश (होलोकॉस्ट)आणि त्यांचा कृषि, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील परिणाम, आकस्मिक पीक नियोजन
३.२ मृदा
  • मृदा एक नैसर्गिक घटक, मृदाविषयी अध्यापनशास्त्रीय व भूमीशास्त्रीय संकल्पना
  • मृदानिर्मिती : मृदा निर्मिती करणारे खडक आणि खनिजे
  • मृदा तयार होण्याची प्रक्रिया व कारके
  • जमीनीचे - भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म
  • जमीनीचा उभा छेद आणि मृदा घटक
  • जमीन (मृदा) वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्त्रोत, आवश्यक आणि लाभदायक वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्ये, जमीनीतील पोषक वनस्पती अन्नद्रव्यांची स्वरुपे
  • जमीनीतील सेंद्रीय पदार्थ : स्त्रोत, स्वरुपे, गुणधर्म, जमीनीतील सेंद्रीय पदार्थावरील परिणामकारक घटक, सेंद्रीय पदार्थांचे महत्व आणि जमीनीच्या गणधर्मावर होणारे परिणाम.
  • जमीनीतील सजीव सृष्टी : स्थूल (Macro) आणि सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी, त्यांचे जमिन आणि वनस्पतीवरील लाभदायक व हानीकारक परिणाम
  • जमिनीचे प्रदुषण : प्रदुषणाचे स्त्रोत, किटकनाशके, बुरशीनाशके, इत्यादींचे दुषित करणारे अजैविक घटक यांचा जमीनीवर होणारा परिणाम , जमीन प्रदुषणाचे प्रतिबंध आणि शमन
  • खराब / समस्याग्रस्त जमिनी आणि त्या लागवडी योग्य करण्यासाठी उपाययोजना
  • रिमोट सेन्सींग आणि जीआयएस (GIS) यांचा खराब / समस्याग्रस्त जमीनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरीता वापर
  • जमिनीची धूप, धुपीचे प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय
  • सेंद्रीय शेती
  • अतिसुक्ष्म तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी) आणि अचूक/ काटेकोर शेती
३.३ जलव्यवस्थापन
  • जल विज्ञान चक्र
  • पावसावलंबी आणि कोरडवाह शेती
  • जलसंधारणाच्या पद्धती
  • पाण्याचा ताण / दुष्काळ आणि पीक निवारण
  • पावसाचे पाणी अडवणे आणि साठवणे
  • पाणलोट क्षेत्राची संकल्पना उद्दीष्ट्ये, तत्वे, घटक आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनावर परिणाम करणारी कारके
  • सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदुषण आणि औद्योगिक दुषित पाण्याचा परिणाम
  • पाणथळ जमिनीचे जलनिस्सारण सिंचनाचे वेळापत्रक ठरविणारे निकष
  • पाणी वापराची आणि सिंचन कार्यक्षमता
  • नद्यांची आंतरजोडणी (नद्या जोड प्रकल्प )
  • सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी
  • सिंचन पद्धती आणि सिंचनाबरोबर/सिंचनाद्वारे खते देणे

Download MPSC Mains Syllabus in Marathi