https://www.dompsc.com


Download MPSC Mains GS2 Syllabus In Marathi

Download MPSC Mains GS2 Syllabus In Marathi

Read MPSC Mains Syllabus For GS 1

Author

By Shubham Vyawahare

15-April-2024
MPSC GS 1 Syllabus

➤महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही संस्था महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी राज्यसरकार ला नियुक्त करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात कार्य करते ,ही परीक्षा राज्यसेवा परीक्षा या नावाने घेतली जाते .MPSC ची ही परीक्षा ३ टप्प्यात नियोजित असून MPSC Mains Syllabus चा अभ्यास करूनच अभ्यासाला सुरुवात करता येते.
➤MPSC Mains paper मध्ये GS1, GS2,GS3,GS4 विषयाचे पेपर असून भाषा विषयासाठी इंग्रजी व मराठी भाषेचा लेखी स्वरूपाचा पेपर असतो.
➤MPSC Mains Gs 1 Syllabus हा इतिहास,भूगोल,पर्यावरण विषयाची निगडित असून त्याचा MPSC Mains Syllabus खूप मोठा आहे, तसेच MPSC Mains Gs 2 Syllabus हा राज्यातील घटना ,कायदे नियमन या संबंधित आहे तर याच्या MPSC Mains Syllabus मध्ये आता कायदे सुद्धा वाचावे लागतील. MPSC Mains Gs 3 Syllabus मध्ये मुख्य भर हा मानव संसाधन व मानवी हक्क यावर असतो.तर MPSC Mains Gs 4 Syllabus चा MPSC Mains Syllabus हा अर्थशास्त्राची ओळख करून देतो.

MPSC Mains GS 2 Syllabus-Governance

Point Topics
भारताचे संविधान
१ भारताचे संविधान
  • संविधानाची निर्मिती प्रक्रिया
  • संविधानाची ठळक वैशिष्टये
  • संविधानाचे तत्वज्ञान (धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि समाजवादी)
  • मूलभूत हक्क
  • संपत्तीच्या हक्क या मुलभूत हक्काच्या दर्जात झालेले बदल
  • शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
  • मूलभूत हक्क व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांच्यातील परस्पर संबंध
  • कामाचा हक्क (मनरेगा)
  • माहितीचा अधिकार
  • मूलभूत कर्तव्ये
  • स्वतंत्र न्याय व्यवस्था
  • घटनादुरुस्तीची प्रक्रिया आणि भारतीय संविधानातील आजवरच्या प्रमुख घटना दुरुस्त्या
  • न्यायालयीन पुनर्विलोकन आणि घटनेच्या मुलभूत वैशिष्ट्यांचा सिद्धांत (केशवानंद भारती मनेका विरुद्ध मद्रास राज्य आणि मिनर्वा मिल खटले)
प्रमुख आयोग आणि मंडळांची रचना आणि कार्ये
  • निवडणूक आयोग
  • केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग
  • राष्ट्रीय महिला आयोग
  • मानवी हक्क आयोग
  • राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग
  • अनुसूचीत जाती / अनुसुचीत जमाती आयोग
  • नदी पाणी विवाद निवारण मंडळ
  • केंद्रीय माहिती आयोग
२.अ] भारतीय संघराज्य व्यवस्था
  • कायदेविषयक विषयांचे वाटप: संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, अवशेषाधिकार
  • कलम ३७० (रद्दबातल), कलम ३७१ आणि असममितीय (असिमेट्रीकल) संघराज्य व्यवस्था
  • राज्यांची भाषावार पुनर्रचना
  • प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आणि नव्या राज्यांची निर्मिती
  • केंद्र राज्य संबंध : प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध
  • राज्याराज्यातील संबंध : आंतरराज्य परिषदा, विभागीय परिषदा
  • निती आयोग आणि आर्थिक संघराज्याचे बदलते स्वरुप
  • सरकारिया आयोगाच्या शिफारशी
ब] भारतीय राजकीय व्यवस्था ( शासनाची संरचना, अधिकार व कार्ये ) भारतीय संघराज्याचे स्वरुप - संघराज्य व राज्य - विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्याययंत्रणा, केंद्र - राज्य संबंध - प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध, वैधानिक अधिकार, विषयांचे वाटप.
सांघिक कार्यकारी मंडळ:
  • राष्ट्रपती
  • उपराष्ट्रपती
  • पंतप्रधान व मंत्रिमंडळ
  • भारताचा महाअधिवक्ता
  • भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
सांघिक विधिमंडळ
  • संसद
  • सभापती व उपसभापती
  • संसदीय समित्या
  • कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण
न्यायमंडळ
  • न्यायमंडळाची रचना: एकात्मिक न्यायमंडळ
  • सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार व कार्ये, दुय्यम न्यायालये - लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय
  • न्यायमंडळ - सांविधानिक व्यवस्थेचे व मूलभूत अधिकाराचे संरक्षक
  • न्यायालयीन सक्रियता
  • जनहित याचिका
३. भारतीय प्रशासनाचा उगम :
  • ब्रिटिशपूर्व काळ
  • ब्रिटिश काळ
  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ
४ राज्य शासन व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
  • महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचना
  • राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ
  • राज्य सचिवालय, मुख्य सचिव -कार्य व भूमिका
  • विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद-अधिकार व कार्ये
५. ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन स्थानिक शासनाची वैशिष्ट्ये
ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन
  • ग्रामसभा, ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद- रचना, अधिकार व कार्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक- कार्य व भूमिका
  • ७३ वी घटना दुरुस्ती- महत्व आणि वैशिष्ट्ये
  • ग्रामिण विकास आणि पंचायती राज
नागरी स्थानिक शासन व प्रशासन
  • नगर पंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, आणि कटकमंडळ- रचना, अधिकार व कार्ये, मुख्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त- कार्ये व भूमिका
  • ७४ वी घटना दुरुस्ती- प्रमुख वैशिष्ट्ये
  • नागरी विकास व नागरी स्थानिक संस्था
६.जिल्हा प्रशासन
  • जिल्हा प्रशासनाचा उगम व विकास
  • जिल्हा अधिकारी- अधिकार व कार्ये, जिल्हा अधिकाऱ्याची बदलती भूमिका, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि तलाठी- कार्य व भूमिका
  • कायदा व सुव्यवस्था- कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा- जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नागरिक
७.पक्ष आणि हितसंबधी गट
  • भारतीय पक्ष पध्दतीचे बदलते स्वरुप
  • राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष
  • विचारप्रणाली
  • संघटन
  • पक्षीय निधी
  • निवडणुकीतील कामगिरी
  • सामाजिक आधार
  • महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबधी गट
८. निवडणूक प्रक्रिया
  • निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये
  • प्रौढ मताधिकार
  • एक सदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ,राखीव मतदारसंघ,
  • निवडणूक यंत्रणा: निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग लोकसभा व राज्यविधी मंडळासाठी निवडणूका, स्थानिक संस्थांच्या निवडणूका खुल्या व नि:पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यामधील समस्या व अडचणी
  • निवडणूकविषयक सुधारणा- निवडणूक निधी व निवडणूकीतील खर्च
  • इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे
  • व्ही व्ही पॅट
९.प्रसार माध्यमे
  • मुद्रण व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे - धोरण निर्धारणावर त्यांचा होणारा परिणाम, जनमत तयार करणे व लोकजागृती करणे
  • भारतीय वृत्तपत्र परिषद (प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया)
  • जनसंपर्क प्रसारमाध्यमांसाठी आचारसंहिता
  • फेक न्यूज व पेड न्यूज
  • मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसारमाध्यमांमधील महिलांचा सहभाग:वस्तुस्थिती व मानके
  • भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा
  • सामाजिक, माध्यमांमुळे निर्माण झालेली नवीन आव्हाने
१०. शिक्षण पध्दती
  • राज्य धोरण व शिक्षण याविषयीची निदेशक तत्वे
  • वंचित घटक - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
  • मुस्लिम व महिला यांचे शिक्षणविषयक प्रश्न
  • शिक्षणाचे खाजगीकरण – शिक्षणाची उपलब्धता, गुणवत्ता, दर्जा व सामाजिक न्याय यांसंबंधीचे मुद्दे
  • उच्च शिक्षणातील समकालीन आव्हाने
  • शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर
  • NMEICT, इ-पाठशाला, इ. पीजी -पाठशाला, स्वयम् सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान
११. प्रशासनिक कायदा कायद्याचे राज्य, सत्ता विभाजन, प्रत्यायुक्त कायदे, प्रशासकीय स्वेच्छानिर्णय, प्रशासनिक न्यायाधिकरणे,नैसर्गिक न्यायाची तत्वे, दक्षता आयोग, लोकपाल आणि लोकायुक्त, लोकसेवकांना संविधानिक सरंक्षण
१२. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ व्याख्या, जमीनीचे वर्ग व प्रकार, जमीनीचा वापर व वापर बदलासंबधी प्रक्रिया,जमीन महसुल निर्धारण, आकारणी व जमाबंदी, भूमिअभिलेख, अपिल, पुनरिक्षण आणि पुनर्विलोकन संबधी तरतूदी.
काही सुसंबद्ध कायदेः
  • पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६: व्याख्या, उद्दिष्टे, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपायोजना
  • बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९: व्याख्या, उद्दिष्टे, बालकांचा शिक्षणाचा __ अधिकार, शासनाचे कर्तव्य तसेच शाळा व शिक्षकांच्या जवाबदा-या
  • माहितीचा अधिकार अधिनियम २००५: व्याख्या, अर्जदाराचे अधिकार, सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्य, माहिती मधील अपवाद, अपिल, शिक्षा
  • माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० (सायबरविषयक कायदा): व्याख्या, प्राधिकरणे, ईलेक्ट्रॉनिक शासन, अपराध आणि शिक्षा
  • भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ : व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाय योजना.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाति (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९: व्याख्या, उदिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाय योजना
  • पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम २००७: व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाय योजना
  • नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५: व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाय योजना.
१४ समाज कल्याण व सामाजिक विधीविधान सामाजिक-आर्थिक न्यायनिर्देशसबंधी घटनात्मक तरतूदी, भारताचे संविधान व मानव अधिकार अंतर्गत महिलांचे सरंक्षण, कौटुंबिक हिंसाचार (प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत महिलांना संरक्षण, भारताचे संविधान व मानव अधिकार अंतर्गत बालकांचे सरंक्षण, मोफ़त कायदा सहाय्यता व जनहित याचिका संकल्पना.
१५. वित्तीय प्रशासन अ)अर्थसंकल्पीय प्रक्रिया : अर्थसंकल्प तयार करणे, कायदेशीर प्रक्रिया आणि अंमलबजावणी करणे.
ब) सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण : संसदीय नियंत्रण, वित्त मंत्रालयाचे नियंत्रण समित्यांद्वारे नियंत्रण- लोकलेखा समिती (पीएसी), अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती
क)भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक - कार्ये व भूमिका
१६. कृषि प्रशासन आणि ग्रामिण अर्थव्यवस्था अ. हरित क्रांती ब. धवलक्रांती
१७. सार्वजनिक सेवा
  • अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा व राज्य सेवा – सांविधानिक दर्जा व कार्ये.
  • भरती आणि प्रशिक्षण – भरती व प्रशिक्षणाचे प्रकार
  • प्रशिक्षण संस्था – लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी (यशदा) व भारतीय लोकप्रशासन संस्था (आयआयपीए)
  • केंद्रीय सचिवालय- पंतप्रधान कार्यालय, मंत्रीमंडळ सचिव- अधिकार, कामे आणि भूमिका
१८.घटनात्मक आणि वैधानिक संस्था
  • घटनात्मक संस्था : राज्य निवडणूक आयोग, महाधिवक्ता
  • वैधानिक संस्था : लोकपाल आणि लोकआयुक्त
१९.लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टीकोन आणि सिद्धांत
  • संकल्पना- नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था, विकेंद्रीकरण व प्रदत्तीकरण आणि ई-गव्हर्नन्स
  • दृष्टीकोन – वर्तणुकात्मक दृष्टीकोन आणि व्यवस्था दृष्टीकोन
  • सिध्दांत- नोकरशाही सिध्दांत आणि मानवी संबंध सिध्दांत
२०.सार्वजनिक धोरण
  • सार्वजनिक धोरण – निर्मिती, अंमलबजावणी, मूल्यमापन आणि विश्लेषण
  • सार्वजनिक धोरणे आणि जागतिकीकरण
  • भारतातील सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया

MPSC Mains GS 3 Syllabus And MPSC Mains GS 4 Syllabus

Download MPSC Mains Syllabus in Marathi