https://www.dompsc.com



संधी व संधीचे प्रकार -मराठी व्याकरण

संधी व संधीचे प्रकार

संधी व संधीचे प्रकार

Author

By Shubham Vyawahare

17-November-2024
➤ ❝ मराठी भाषेमध्ये शब्द तयार होण्याची जी क्रिया असते त्यावेळी एक अक्षर दुसऱ्याची जोडताना जे नियम वापरल्या जातात त्यालाच संधी असे म्हणतात. ❞
  • संधी शब्दाचा मूलतः अर्थ साधने किंवा जोडने असा होतो
  • मराठी व्याकरणामध्ये संधी या संकल्पनेला जास्त महत्त्व असते कारण संधी साधल्याखेरीज शब्द निर्मिती होत नाही
  • संधी प्रकारामंध्ये स्वरा चा स्वराशी तसेच स्वराचा व्यजनाशी आणि व्यंजनाचा व्यंजनाशी सतत संबंध येत असतो
  • संधी या प्रकारामुळ शब्दांची संपती वाढत जाते
  • ज्या भाषेमध्ये शब्द निर्मिती आणि शब्द जोडणीचे संधी आणि सामासासारखे प्रकार आहेत ती समृद्ध भाषा ठरते.

संधी आणि संधीचे मुख्य तीन प्रकार

  1. स्वर संधी
  2. व्यंजन संधी
  3. विसर्ग संधी

संधी व संधीचे प्रकार उदाहरणासहीत स्पष्टीकरण


1) स्वर संधी

➤ शब्द निर्मिती होत असताना एकमेकांशेजारी जोडलेली वर्ण जर स्वरांनी जोडलेली असतील तर त्या संधी ला स्वर संधी असे म्हणतात.
  • उदा. देव + आलय= देवालय
  • वरील उदाहरनामध्ये देव मधील व् आणि आ या दोन्ही स्वरांची मिळून संधी झालेली लक्षात येते म्हणून त्याला स्वर संधी असे संबोधतात.

स्वर संधीचे प्रकार

अ) सजातीय स्वर संधी

:ज्या संधी मधे एकमेकांसमोर येणारे स्वर हे त्याच ह्रस्व किंवा दीर्घ स्वरूपातील असतील तर त्याला सजातीय स्वर संधी किंवा दिर्घत्व संधी असे म्हणतात..

टीप:समोरा समोर येणारे स्वर हे सारखेच आहेत
    उदा
  • अ +आ =आ
  • इ + ई = ई
  • उ + ऊ =ऊ
  • स्वर ह्रस्व किंवा दीर्घ स्वरा समोर तोच ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास दीर्घ स्वर घ्यायचा असतो

  • उदा 1). गुरु + उपदेश = गुरूपदेश
  • गुरुपदेश ह्या शब्दाची फोड गुरु + उपदेश अशी होते ह्यात रु=र+उ आणि , म्हणजेच उ स्वरा समोर दुसरा उ आहे आणि त्याचा दीर्घ उ झाला म्हणजे सजातीय /दिर्घत्व संधी.
  • उदा 2. महिलाआश्रम
  • ह्या शब्दा मध्ये महिला +आश्रम अशी फोड होते तरल+अ म्हणजे अआणि ह्यांची संधी साधत आ हा शब्द तयार झालेला आहे.

टीप:एका वर्णाच्या जागी दुसराच वर्ण येणे ह्याला आदेश म्हणतात

संधी प्रकार अव्यय
गुनादेश ए,ओ,अर
वृदयादेश ऐ,औ
यनादेश य,व,र

आ ) गुणादेश स्वरसंधी

टीप:समोरा समोर येणारे स्वर हे वेगळे आहेत
  • आ /अ पुढे इ/ई आल्यास त्याचा ए होतो.
  • आ /अ पुढे उ/ऊ आल्यास त्याचा ओ होतो
  • आ/अ पुढे ऋ आल्यास त्याचा अर होतो

  • उदा. ईश्वर + इच्छा =ईश्वरेच्छा.
  • वरील उदाहरणात अ + ई = ए अशी संधी साधली आहे एक तर समोरासमोर दोन्ही स्वर आहेत आणि ते वेगळे आहेत म्हणजे सजातीय नाहीच आणि वरील 3 नियमानुसार एक आहे म्हणून हि गुनादेश संधी आहे.

इ) वृद्यादेश स्वरसंधी

  • आ किंवा अ पुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा ऐ होतो
  • आ किंवा अ पुढे ओ किंवा औ आल्यास त्याचा औ होतो.
  • उदा .अ + ऐ = ऐ एक + ऐक = एकेक

ई ) यनादेश स्वरसंधी

  • इ,ई,उ ऊ यांच्या समोर विजातीय स्वर आल्यास
  • इ -ई चा य होतो.
  • उ-ऊ चा व होतो

उ ) उर्वरित स्वरसंधी

  • ए ,ऐ ,ओ ,औ या पुढे कोणताही स्वर आला तर अनुक्रमे आय ,अवि ,आवी ,असे आदेश होऊं संधी होते
  • ने + अन = नयन

व्यंजन संधी

:वाक्यातील जोडाक्षरे होताना पाहिला व्यंजन व दुसरा स्वर किंवा दोन्ही व्यंजन असतील तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात.
✪ उदा.व्यंजन + स्वर , व्यंजन + व्यंजन

व्यंजन संधी चे प्रकार

प्रथम द्वितीय तृतीय चर्तुर्थी अनुनासिक
-
त्र

अ) प्रथम व्यंजन संधी

  • वरील पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिका शिवाय कोणत्याही व्यंजनापुढे दुसरे कोणतेही कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पाहिले कठोर व्यंजन येउन संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात

  • विपद+काल =द + क = त+ क =विपत्काल
  • ह्या उदाहरणामध्ये वरील पाच वर्गापैकी पहिल्या शब्दाच्या शेवटी 'द' (हे तिसऱ्या वर्गातील व्यंजन ,अनुनासिक नसणारे ) हे असून ह्याच्यासमोर 'क' (पहिल्या वर्गातील व्यंजन ,अनुनासिक नसणारे ) आले आहे अश्यावेळी पहिल्या शब्दातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच ओळीतील प्रथम व्यजन झाले असल्यास ती प्रथम व्यंजन संधी असते.

आ) तुतीय व्यंजन संधी

  • पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तीसरे व्यंजन येउन संधी होते त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात
  • उदा.वाक् + ईश्वरी= क +ई =ग + ई =वागीश्वरी

इ ) अनुनासिक संधी

  • पहिल्या पाच वर्गातील व्यंजनापुढे अनुनासिका आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन होऊण संधी होते त्याला अनु नासिक संधि असे म्हणतात
  • उदा.जगत + नाथ=जग्गनाथ

ई) त व्यंजन संधी

त या व्यंजनापुढे
  • च छ आला तर त बद्दल च होतो
  • ज झ आला तर त बद्दल ज होतो
  • ट ठ आला तर त बद्दल ट होतो
  • ल आला तर त बद्दल ल होतो
  • श आला तर त बद्दल च होतो व श बद्दल छ होतो
  • उदा.१) सत+चरित्र =सच्चरित्र
  • २) सत + शिष्या= सच्छिष्य

विसर्ग संधी

:विसर्ग हे स्वरादी असतात ,विसर्ग हे स्वरानंतर येतात.
➤ पहिला वर्ण विसर्ग तर दुसरा व्यंजन किंवा स्वर असतो

विसर्ग संधीचे प्रकार


अ )विसर्ग-उकार संधी

  • विसर्गाच्या माघे अ हा स्वर असून पुढे मृदु यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व् तो माघिल अ मध्ये समाविष्ट होऊण त्याचा औ होतो
  • उदा.यश: + धन =यशोधन

आ) विसर्ग -र संधी

  • विसर्गाच्या मागे अ ,आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते त्याला विसर्ग -र-संधी म्हणतात
  • उदा.नि:+ अंतर =निरंतर
  • दू: + जन =दुर्जन

मराठीतील काही विशेष संधी संकल्पना


अ )पूर्वरूप संधी:

मराठीत कधी कधी दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर ण बदलता तसाच राहतो व दूसरा लोप पावतो त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात.
● उदा. काही +असा = काहीसा

अ )पररूप संधी:

मराठीत कधी कधी पहिला स्वर लोप पावत व दूसरा तसाच राहतो त्याला पररूप संधी असे म्हणतात.
● उदा. घर+इ =घरी



Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf