https://www.dompsc.com


शब्दशक्ती-मराठी व्याकरण Mpsc Grammar

शब्दशक्ती-मराठी व्याकरण

शब्दशक्ती

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

✪ शब्दामध्ये अनेक अर्थ लपविन्याची क्षमता असते,मराठी भाषा तर या बाबती मध्ये खुप अष्टपैलू प्रकाराची आहे ,एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणे किंवा ते अनुभवाने तसे काढ़ने या साठी तर अनेक मोठ्या सहीत्यकानी त्यांची हयात घातली,मराठी भाषेची अरथात अर्थ लपवन्याची एक खूबी च आहे.येवडेच काय मराठी मध्ये एक चित्रपट संगीत सुधा फार प्रसिद्ध आहे जसे ❝शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले❞
मराठी संस्कृतीतील संतानी या शब्द्सिधी प्रकारचा वापर पुरेपुर करुण घेतला आहे ,संत तुकाराम महाराज आणि संत माउलिंच साहित्य हे तर सम्पूर्ण शब्द्सिधि संकल्पनेचा वापर करत आलेल आहे. शब्दांमध्ये प्रकट होण्याची अंगभूत शक्ति असते,शब्दांच्या या थेट किंवा गर्भित अर्थ स्पष्ट करण्याच्या शक्तीला शब्दशक्ती असे म्हणतात.

● उदा.समाजातील जाड चरबिचे प्राणी थोड़े त्रास देतातच.
वरील उदाहरणामध्ये जाड चरबिचे हा शब्द आहे यातून शब्दश अर्थ ण घेता वाचनारयाला तो कळतो की लेखकाला नेमके काय सांगायचे आहे आता या ठिकाणी जाड चरबिचे म्हणजे वाईट प्रव्रुतीचे माणसे. या ठिकाणी शब्दशक्ति वापरली आहे

मराठी व्याकरनामध्ये ३ प्रकारच्या शदबशक्ती आहेत :

अभिधा :शब्दातून किंवा वक्यातुं जेव्हा सरळसरळ किंवा शब्दश: अर्थ स्पष्ट होत असतो तेव्हा त्या शब्दशक्तिला अभिधा असे म्हणतात.तर त्या अर्थाला वाच्यार्थअसे म्हणतात.
● उदा. जंगलात खुप साप आहेत.

➤वरील वाक्यामध्ये साप या शब्दातून जंगलातील प्राण्याविषयीचे आकलन होते तर त्याच्या वाच्यार्थ आहे तसा प्राण्याबद्दल चा निघतो.म्हणजे ही अभिधा शब्द्शकती आहे.

व्यंजना :शब्दातून सरळ सरळ अर्थ प्रतीत न होता जेव्हा व्यंगात्मक अर्थ पतित होतो तेव्हा त्याला व्यंजना शब्दशक्तीअसे म्हणतात.तर त्या अर्थाला व्यंगार्थअसे म्हणतात.
● उदा.समाजात वावरलेले साप ठेचुन काढायला हवे.

➤वरील वाक्यामध्ये साप या शब्दातून वाईट प्रवत्तिचे दर्शन होत असून खलत्व सांगणारा व्यंगार्थ या ठिकाणी स्पष्ट होतो आहे.
➤ मुळ अर्थ तसाच राहून आणखी एक अर्थ व्यंजना मध्ये स्पष्ट होतो.

लक्षणा:शब्दश: अर्थ न घेता सुसंगत अर्थ जेव्हा घ्यावा लागतो तेव्हा लक्षणा शब्दशक्ति आहे असे म्हणतात.
● उदा.चला ताटावर बसुयात.

➤ वरील वाक्यामध्ये ताटावर बसा म्हणजे चला जेवायला बसा असा त्याचा अर्थ स्पष्ट होतो ,जर शब्दश: अर्थ घेतला तर तो दुसराच निघू शकतो.




Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf