Sustainable Development(शाश्वत विकास)|MPSC Environment(पर्यावरण) Notes
✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪
Table Of Contain
शाश्वत विकासाचा इतिहास
By Shubham Vyawahare
17-December-2024
"जो विकास चालू पिढीच्या गरजा पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता
पूर्ण करतो अशा विकासाला 'शाश्वत विकास' (Sustainable Development) असे
म्हणतात.' जो विकास मानवाच्या सध्याच्या व भविष्यातील गरजांची संतुलित पूर्ती
करतो, तोच शाश्वत विकास होय "
शाश्वत विकास आणि संयुक्त राष्ट्र संघटना : पूर्वेइतिहास :
➤ 1972 : संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरणावरील परिषद (स्टॉकहोम्स) या परिषदेत मानवी कुटुंबांचे आरोग्यदायक व उत्पादक पर्यावरणासाठी असणारे हक्क ठरविण्याबाबत औद्योगिक व विकसनशील राष्ट्रांमध्ये एकमत झाले.
➤ 1980 : IUCN ने प्रसिद्ध केलेल्या जागतिक संवर्धन रणनिती (World Conservation Strategy/WCS) मध्ये 'शाश्वत विकास' या संकल्पनेची पूर्वचिन्हे दिसून आली. या रणनितीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि विकास यामधील परस्परावलंबन अधोरेखित करण्यात आले. कोट्यवधी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी विकास अत्यावश्यक असून निसर्गाचे संवर्धन विकासाशिवाय होणार नाही, ही गोष्ट ही रणनिती सांगते..
➤ 1982 : या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 'World Charter of Nature स्वीकारण्यात आला.
➤ 1983 :या वर्षात जागतिक पर्यावरण व विकास आयोग (WorldCommission on Environment and Development/WCED) ची स्थापना करण्यात आली. 1984 मध्ये हा आयोग (WCED) संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करु लागला. हा आयोग पृथ्वीवरील सामाजिक पर्यावरणीय समस्यांचे निरीक्षण करून त्यांवर वास्तववादी उपाय योजण्यासाठी आणि पृथ्वीवरील संसाधने पुढील.पिढ्यांसाठी राखून त्यांचा उपयोग चालू पिढीसाठी शाश्वतरित्या कसा करता येईल, यासाठी उपाययोजना शोधण्यासाठी नेमण्यात आला होता. या आयोगाचे अध्यक्ष नॉर्वेच्या (Norway) पंतप्रधान ग्रो हारलेम ब्रुन्डलँड (Gro Harlem Brundland) ह्या होत्या. त्यावरून या आयोगाला बॅन्डलँड आयोग (Brundland Commission) असेही म्हणतात.
➤ ह्या आयोगाने सादर केलेल्या 'Our Common Future' या अहवालात शाश्वत विकास (Sustainable Development) ही संकल्पना व तिची व्याख्या सर्वप्रथम मांडण्यात आली. हीच व्याख्या सर्वमान्य मानली जाते.
शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये
- विकासाचे पुनरूज्जीवन (Reviving Growth)
- विकासाचा दर्जा सुधारणे (Changing the quality of Growth)
- रोजगार, अन्न, ऊर्जा, पाणी आणि स्वच्छता याबाबतीत गरजा पूर्ण करणे. (Meeting essential needs for Jobs,Food, Energy, Water and Sanitation)
- संसाधनांचे रक्षण आणि संवर्धन (Conserving and Enhancing Resource Base
- तंत्रज्ञानाचा वापर (Reorienting technology)
- निर्णयप्रकियेमध्ये पर्यावरण व अर्थशास्त्राचा समावेश करणे. (Merging environment and economics indecision making)
शाश्वत विकास आराखडा
- गरिबांच्या समस्यांवर लक्षः गरीब देशांमधील ज्या लोकांकडे उपजीविकेसाठी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसतो,त्यांच्याकडून पर्यावरणाचे नुकसान होते. उपजीविका धोक्यात असताना संसाधनांचा बेसुमार वापर केला जातो. त्यामुळेसंसाधनांच्या असमान वितरणावर उपाययोजना करायला हवी.
- संसाधनांचा शाश्वत वापर
- संसाधनांचे प्रभावी नियोजन
- संसाधनांच्या नियोजनात स्थानिक ज्ञानाचा वापर
- संसाधनांचे योग्य मूल्यांकन
➤जेंडा 21 नुसार ब्रुण्डलँड आयोगाने शाश्वत विकासासाठी सांगितलेल्या शिफारसींचा योग्य पाठपुरावा करण्यासाठी शाश्वत विकास आयोग (Commission on Sustainable Development) स्थापन करण्यात आला
➤ हा आयोग संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण व विकास कामांचे समन्वय करतो.
शाश्वत विकास आणि भारत
➤शाश्वत विकासाची तत्त्वे अंगिकारणे भारतासारख्या विकसनशील देशाला अत्यावश्यक आहे
➤भारताची पारंपरिक कृषिप्रधान अर्थव्यवस्था विकसित देशांप्रमाणे जलद आर्थिक विकासाचा मार्ग स्वीकारु लागली आहे. त्यातून होणारा संसाधनांचा -हास हा देशातील नैसर्गिक परिसंस्थांचा -हास होण्यास कारणीभूत ठरू शकतो.
➤शाश्वत कृषी (Sustainable Agriculture) हे भारतामध्ये उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. कृषी विकास आराखडा (AgriculDevelopment Strategy) 1999 मध्ये राष्ट्रीय शाश्वत विकास आणि ग्रामीण विकास आराखडा म्हणून स्वीकारण्यात आला .
➤ 'National Sustainable Agriculture and Rural Development(SARD) Strategy' अंतर्गत केली जाणारी महत्त्वाची कामे
- फलशेतीचा विकास
- त्या त्या प्रदेशांना अनुकूलित पिकांची निर्मिती
- जैविक खते व जैविक तंत्रज्ञानाचा वापर
- पाणलोट क्षेत्रविकास
Others Blogs Related to MPSC Environment Notes
➤MPSC Environment Exam Pattern (परीक्षा पद्धत)
➤पारिस्थितिकी विज्ञान
➤परिथितिकी-मुलभुत संकल्पना
➤भूस्थित परिसंस्था(Terrestrial)
➤जैवविविधता
➤पारिस्थितिकीय अनुक्रमण (Ecological Succession)
➤जलीय परिसंस्था
➤महत्वाच्या परिसंस्था
➤भूस्थिर परिसंस्था
➤जैव विविधता ह्रास
➤जैव विविधता वितरण
➤महाराष्ट्रातील अभयारण्ये,संरक्षित जाळ,महाराष्ट्रातील व्याघ्र राखीव क्षेत्र(Wildlife Conservation)
➤महाराष्ट्र वन्यजीवन
➤पर्यावरण समस्या आणि श्वास्वत विकास
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf