जलीय परिसंस्था|MPSC Environment(पर्यावरण) Notes
✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪
Table Of Contain
What is Aquatic Ecosystems And Its Type
By Shubham Vyawahare
17-January-2025
➤पाण्यात वास्तव्य करणार्या सजिवांची परिसंस्था म्हणजे जलीय परिसंस्था.
➤ परिसंस्थांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
What is Fresh water ecosystems And Its Types
➤ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील केवळ 6.8% एवढाच भाग गोड्या पाण्याने व्यापलेला आहे.
➤या परिसंस्थांमधील प्राथमिक उत्पादकता ही सूर्यप्रकाश आणि पोषद्रव्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
➤ या प्रकारच्या परिसंस्थांचे दोन उप-विभागांमध्ये विभाजन केले जाते.
1)What is लेंटीक परिसंस्था (Lentic Ecosystems) And Its Types?
➤ यामध्ये गोड्या पाण्याचे तलाव, सरोवरे इ. स्थिर जल असणाऱ्या जलसाठ्यांचा समावेश होतो.
●लेंटिक परिसंस्थांमधील पर्यावरणाचे खालील तीन विभागांमध्ये विभाजन केले जाते ●
(1) लिट्टोरल झोन:
➤ तलाव किंवा सरोवराच्या काठाजवळील हा विभाग होय. यामध्ये मूळे असणाऱ्या वनस्पती आढळतात.
(2) लिम्नेटीक झोन (Limnetic Zone)
➤ काठापासून दूर असणारा तलावांचा किंवा सरोवरांचा सूर्यप्रकाश प्राप्त होणारा विभाग
(3) प्रोफंडल झोन (Profundal Zone)
➤ तलावाचा किंवा सरोवराचा अप्रकाशित भाग. विघटन (Decomposition) ही प्रमुख जैविक प्रक्रिया.
●समशीतोष्ण प्रदेशांमधील(Temperate Region)सरोवरांचे स्तरीकरण(Stratification)आणि त्याचे प्रकार●
➤ तलाव किंवा सरोवरांमध्ये औष्णिक स्तरीकरण (Thermal Stratification) आढळून येते. त्यांमध्ये खालील स्तर आढळून येतात.
(1)एपिलेम्निऑन (Epilemnion)
➤सूर्यप्रकाशामुळे उबदार बनणारा हा स्तर आहे. हा स्तर ऑक्सिजनयुक्त असतो.➤वनस्पती-प्लवंगाकडून पोषणद्रव्यांचा वापर झाल्याने, या स्तरातील पोषणद्रव्ये कमी होतात.
(2) थर्मोक्लाइन (Thermocline):
या स्तरातील तापमान वेगाने घटते.(3) हायपोलेम्निऑन (Hypolemnion):
➤ या स्तरातील तापमान आणखीनच घटते. या स्तरात विघटन घडत असल्याने बराचसा ऑक्सिजन वापरला जातो.➤त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता या स्तरात आढळते.ऑक्सिजन व पोषणद्रव्यांचा विनिमय एपिलेम्निऑन मधील पाणी थंड होऊन खालच्या स्तरांमध्ये येते
➤ त्यामुळे पोषणद्रव्ये आणि ऑक्सिजनचे तलावामध्ये पुर्नवितरण घडते.
2) लोटिक परिसंस्था (Lotic Ecosystems)
➤ यामध्ये प्रवाही जल (Flowing Water) असणाऱ्या परिसंस्थांचा समावेश होतो. उदा. नद्या, ओढे, नाले इ.
संक्रमणात्मक जलीय परिसंस्था (Transitional Ecosystems) आणि त्याचे प्रकार
a) खाड्या (Estuaries)
➤ नदी सागरास ज्या ठिकाणी जाऊन मिळते,त्या ठिकाणातील सागरी खारे पाणी व नदीचे गोडे पाणी यांच्यामधील संक्रमणात्मक प्रदेशास खाडी असे म्हणतात.
➤ खाड्यांमधील क्षारता ही सागरी पाण्यापेक्षा कमी आणि अस्थिर असते.
➤ म्हणूनच खाड्यांमधील सजीव बदलणाऱ्या किंवा अस्थिर क्षारता पातळ्यांना अनुकूलीत झालेले असतात.
b)दलदलीय प्रदेश (Wetlands):
➤यामध्ये स्वम्प, मार्शस, बॉग्ज (Bogs) किंवा फेम्स् (Fems) यांचा समावेश होतो.
➤येथे पाणी पूर्णपणे किंवा अंशत: उथळ असते.
➤ सूर्यप्रकाशाच्या विपुल उपलब्धतेमुळे या परिसंस्थांमधील जैवविविधता लक्षणीय असते.
c)सागरी परिसंस्था (Marine Ecosystems)
➤पृथ्वीचा पृष्ठभागाचा जवळपास 71% भाग हा सागरी परिसंस्थांनी व्यापला आहे.
➤यामध्ये किनारी प्रदेश (Shorelines), प्रवाळे, खुला सागर आदिंचा समावेश होतो.
➤ सूर्यप्रकाशाच्या विपुल उपलब्धतेमुळे या परिसंस्थांमधील जैवविविधता लक्षणीय असते.
सागरी परिसंस्था आणि त्याचे प्रकार
(1) फोटीक किंवा युफोटीक झोन (Photic/Euphotic Zone)/एपिपेलॅजिक झोन (Epipelagic Zone)
➤हा पेलॅजिक विभागाचा सूर्यप्रकाश प्राप्त होणारा झोन आहे.➤प्रकाशकिरण पाण्यात ज्या खोलीपर्यंत पोहचतात, ती या झोन ची खालची सीमा आहे.
➤ही सीमा पाण्याच्या स्वच्छतेनुसार बदलत असत.पाकाच्या किरण जास्त खोलीवरी पोहचू शकतात .
➤या झोनची खोली सागरी पृष्ठभागापासून सर्वसाधारणपणे 100-200 मी पर्यंत असते
2) अॅफोटीक (Aphotic) झोन/अप्रकाशित झोन
➤कायमस्वरूपी सूर्यप्रकाशाचा अभाव असणारा हा झोन आहे.➤ या झोनमध्ये स्वयंपोषी सजीव (प्रकाशसंश्लेषक) बहुधा आढळत नाहीत.
➤ काही शास्त्रज्ञ 'डिस्फोटीक झोन' (Disphotic Zone) हा वरील दोन झोन्सच्या मध्ये असणारा संक्रमणात्मक असा तिसरा झोनदेखील सुचवितात.
➤ हा झोन 1098 मीटर खोलीपर्यंत स्थित असतो.
➤या विभागात दृष्टीसाठी पुरेसा, मात्र प्रकाशसंश्लेषणास अपुरा असा मंद सूर्यप्रकाश असतो.
(1) मेसोपेलॅजिक झोन (Mesopelagic Zone)
➤डिस्फोटिक झोन आणि या झोनचे क्षेत्र एकच आहे.
➤हा झोन 200 मीटर आणि 700-1000 मीटर यादरम्यान स्थित असतो.
2) थिपेलॅजिक (Bathypelagic Zone):
➤ 700-1000 मीटर आणि 2000-4000 मीटर या दरम्यानच्या खोलीमध्ये हा झोन स्थित असतो.
(3) ॲबायजल पेलॅजिक (Abyssal pelagic):
➤ या झोनची खालची सीमा 6000 मीटर पेक्षा जास्त असते. मुख्य सागरी मैदानाच्या वरील भागात हा झोन स्थित असतो.
4) हॅडल पेलॅजिक (Hadal Pelagic):
➤ समुद्रतळातील खोल घळईमध्ये (Deep Ocean Trenches) असणाऱ्या खुल्या पाण्याचा हा विभाग आहे.
➤ 6000 मीटर आणि 10000 मीटर खोली दरम्यान हा झोन विस्तारलेला असतो.
Benthic Zone
समुद्रतळाच्या पृष्ठभागीय क्षेत्रास बेंथिक झोन असे म्हणतात. बेंथिक झोनचे उपविभाग खालीलप्रमाणे (1) लिट्टोरल झोन (2) सबलिट्टोरल झोन : नेरीटीक झोनच्या खालचा समुद्रतळ. (3) बॅथायल झोन (Bathyal Zone) बॅथिपेलॅजिक झोनच्या खालील समुद्रतळ. (4) ॲबायजल झोन : अॅबायजल पेलॅजिक झोनच्या खालील समुद्रतळ. (5) हॅडल झोन : खोल सागरी घळईंचा (Deep Ocean Trenches) पृष्ठभाग. सागरी पर्यावरण
सागरी जीवनशैली
➤सागरी जीवनात विलक्षण विविधता आहे. वर्णन करावयाच्या असलेल्या सागरी जीवप्रजाती लाखो असल्याने, अभ्यासक त्यांनाभौतिक वैशिष्ट्यांनुसार काही विभागांमध्ये आणि उपविभागांमध्ये विभाजित करतात
➤ मात्र विभाजनाची ही पद्धत नेहमीच योग्य किंवा माहितीपर ठरत नाही
➤ कारण वेगवेगळ्या प्रजातींचे सजीव एकाच विभागात असू शकतात आणि त्यांचे जीवनाच्या अस्तित्वासाठीचे डावपेचही सारखे असू शकतात
➤ म्हणूनच अभ्यासक सागरी पर्यावरणाचे जीवनशैलीनुसार खालील तीन वर्गांमध्ये वर्गीकरण करतात.>
(i) प्लवंग (Plankton)
➤ Plankton' हा शब्द 'Plankton = wanderer'/ भटकणारा या मूळ पीक) शब्दापासून बनलेला आहे.
➤ सागरी लहरिसोबत कुठल्याही नियंत्रणाशिवाय किंवा यदृच्छया वाहत जाणाऱ्या वनस्पती (Phytoplankton) आणि प्राणी (Zooplankton) मीच समूह म्हणजे प्लवंग होय.
➤ बरेचसे प्लवंग हे सूक्ष्म असतात आणि सागरी लाटांच्या विरुद्ध पोह शकत नाहीत.
➤ पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या काही सजीवांपैकी प्लवंग एक आहेत.
Phytoplankton
➤ हे प्राथमिक उत्पादक (म्हणजेच स्वयंपोषी) सजीव आहेत.
➤ प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या आधारे हे सजीव ऊर्जा (सौर ऊर्जा), असेंद्रिय पोषणद्रव्ये आणि विरघळलेल्या कार्बन डायऑक्साईड चा वापर करून आपले अन्न (कार्बोहाड्रेट्स) बनवितात.
➤जलीय परिसंस्थांमधील बहुतांश अन्नसाखळ्यांची सुरुवात यांपासून होते.
Zooplankton
➤हे सूक्ष्म जीव इतर प्लवंगाचे भक्षण करतात.
➤ हे सजीव भक्षक आहेत.काही झूप्लॅक्टन हे इतर मोठ्या प्राण्यांचे सुरवंट किंवा अळ्या (Larval stage) किंवा अपरिपक्व विकास अवस्था असतात.
➤उदा. पुढील प्राण्यांचे सुरवंट किंवा अळ्या (Larvae) : मोलूस्का (गोगलगाय), क्रस्टॅसिया (खेकडे), मासे, जेलीफिश,सी कुकुंबर, सागरी तारेकाही झूप्लँक्टन हे एकपेशीय प्राणी असतात. उदा. फोरॅमिनिफोरा
➤काही झूप्लॅक्टन हे लहान आकाराचे क्रस्टॅसिया गटातले सजीव असतात. (उदा. Daphnia)
➤सागरी परिसंस्थांची उत्पादकता (Productivity) ही प्लवंगावरच अवलंबून असते.
➤अनेक सागरी अन्नशृंखलांचा प्रारंभ हा वनस्पतीप्लवंगांपासूनच होतो.
➤म्हणूनच जागतिक अन्नसाखळीमध्ये (Global Foodchain) त्यांचे असणारे स्थान हे अनन्यसाधारण आहे.
(ii) नेक्टॉन्स (Nektons)
➤ Nektonians - swinn swinning the same.
➤ 'Nektons' हा शब्द Nektons = पोहणे, या मूळ ग्रीक शब्दापासून बनलेला आहे.
➤ हे सजीव क्रियाशील असतात व पोहू शकतात.
➤ यामध्ये लहान आकाराच्या अपृष्ठवंशीय सजीवांपासून मोठ्या आकाराच्या व्हेल माशांचाही समावेश होतो.
➤ सागरातील बहुतेक भक्षक हे नेक्टॉन्स आहेत. सर्वांत जास्त नेक्टॉन्स हे पृष्ठवंशीय (Vertebrates) आहेत. उदा. मासे, व्हेल, पाणगाय (ड्रगाँग) इ. ऑक्टोपस सारखे काही प्राणी अपृष्ठवंशीय (Invertebrates) आहेत.
(iii) बेन्थॉस
➤ समुद्रतळावर किंवा समुद्रतळातील गाळामध्ये राहणाऱ्या सजीवांचा यात समावेश होतो.
➤ सजीव हे हालचाल करू शकणारे किंवा हालचाल न करणारे (Sessile) असू शकतात.
Others Blogs Related to MPSC Environment Notes
➤MPSC Environment Exam Pattern (परीक्षा पद्धत)
➤पारिस्थितिकी विज्ञान
➤परिथितिकी-मुलभुत संकल्पना
➤भूस्थित परिसंस्था(Terrestrial)
➤जैवविविधता
➤पारिस्थितिकीय अनुक्रमण (Ecological Succession)
➤जलीय परिसंस्था
➤महत्वाच्या परिसंस्था
➤भूस्थिर परिसंस्था
➤जैव विविधता ह्रास
➤जैव विविधता वितरण
➤महाराष्ट्रातील अभयारण्ये,संरक्षित जाळ,महाराष्ट्रातील व्याघ्र राखीव क्षेत्र(Wildlife Conservation)
➤महाराष्ट्र वन्यजीवन
➤पर्यावरण समस्या आणि श्वास्वत विकास
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf