Biodiversity(जैव विविधता) And Its Importance|MPSC Environment(पर्यावरण) Notes
✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪
Table Of Contain-जैव विविधता (Biodiversity)
Biodiversity(जैव विविधता) म्हणजे काय ?
By Shubham Vyawahare
17-January-2025
➤ सूक्ष्मजीवांपासून ते क्लिष्ट वनस्पती आणि प्राणी इतक्या जैवविविधतेने पृथ्वी संपन्न आहे.
➤पृथ्वीवर जीवनाची असणारी ही विविधता म्हणजेच जैवविविधता होय.
जलीय,भूस्थित आणि इतर सर्व परिसंस्थांमध्ये सजीवांची असणारी विविधता आणि त्यांमधील भेद म्हणजेच जैवविविधता होय.
➤ मानवी अस्तित्वासाठी आणि कल्याणासाठी त्यांचेअनन्यसाधारण महत्व आहे.
"जैवविविधता म्हणजे भूस्थित, सागरी व जलीय परिसंस्था, ज्यांचा सजीव भाग आहेत, अशा सर्व परिसंस्थांमधील जीवनाची असणारी विविधता होय.
➤ यामध्येप्रजातीअंतर्गत (Within Species Diversity), प्रजाती-प्रजातींमधील (Between Species Diversity) आणि परिसंस्थांच्या विविधतेचा (Ecosystem Diversity) समावेश होतो."
➤ जैवविविधतेचा अभ्यास हा तीन पातळ्यांवर केला जातो. जनुकीय विविधता, प्रजाती विविधता आणि परिसंस्था विविधता.
✪ जनुकीय विविधता ✪
➤कोणत्याही जीवप्रजातींच्या सर्व सदस्यांमधील जनुकांच्या एकूण सचयास त्या प्रजातीचा 'जनुकीय संचय'(Gene pool) म्हणतात.
➤ कोणत्याही प्रजातीचा 'जनुकीय संचय' हा असंख्य प्रकारच्या जनुकांनी संपन्न असतो.
➤ सजीव प्रजातीच्या जनुकीय संचयातील जनुकांची असणारी ही विविधता म्हणजेच जनुकीय विविधता होय.
➤ ही विविधता त्या प्रजातीच्या अनुकूलन क्षमतेचा (Adaptive Ability) स्त्रोत असते .
✪ प्रजाती विविधता (Species Diversity) ✪
➤ यामध्ये विविधअधिवासांमधील जीवप्रजातींच्या विविधतेचा विचार केला जातो.
➤ उदा.उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमधील वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीवांच्या असंख्य प्रजाती प्रवाळ मधील सजीवांच्या विविध प्रजाती. इ.
✪ परिसंस्था जैवविविधता (Ecosystem Diversity) ✪
➤ जैवविविधतेचा अभ्यास हा मुख्यतः जीवप्रजाती विविधतेवर केंद्रित झालेला दिसतो.
➤ जीवप्रजाती विविधता इतर दोन जैवविविधता पातळ्यांपेक्षा जास्त महत्वाची आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.
➤ जीवप्रजाती विविधता ही इतर दोन पातळ्यांपेक्षा अभ्यासाला जास्त सोयीस्कर असल्याने असे केले जाते.
➤ जैवविविधतेचे मूल्यांकन करताना खालील निकष लक्षात घेतले जातात.
- प्रजातींची संख्या (Species Richness)
- प्रजातींच्या वितरणातील समानता (Species Evenness)
- प्रजाती आधिपत्य (Species dominance)
➤ पृथ्वीवरील बरीचशी जैवविविधता ही विषुववृत्ताभोवती उष्णकटिबंधीय व उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये एकवटलेली आहे.
➤समशीतोष्ण प्रदेशांकडून उष्णकटिबंधीय प्रदेशांकडे जात असताना जैवविविधता ही वाढत जाते. उदा. युरोपमधील 1 हेक्टरवनक्षेत्रात वृक्षाच्या 50 प्रजाती आढळतात.
➤ हीच संख्या मलेशियामध्ये किंवा अॅमेझॉनच्या खोऱ्यात 200 प्रेर्यंत पोहचते.
➤ याशिवाय उष्णकटिबंधीय प्रदेशात समशीतोष्ण प्रदेशाच्या तुलनेत 2 - 3 पट अधिक पक्षी-प्रजाती आढळतात.
➤ सागरी जैवविविधता देखील समशीतोष्ण प्रदेशांकडून उष्णकटिबंधीय प्रदेशांकडे वाढत जाते.
➤ उदा. ग्रेट बॅरिअर रिफ (ऑस्ट्रेलिया)च्या उत्तरेकडील टोकाजवळ सजीवांचे 50 जनरा (Genera-परस्परसंबंधित प्रजातींचा गट) आढळतात. दक्षिण टोकाजवळ हीच संख्या केवळ 10 जनरा (Genera) एवढी आहे.
➤उष्णकटिबंधीय प्रदेशातील या जैवविविधता संपन्नतेची विशिष्ट कारणे सांगता येणार नाहीत. मात्र स्थिरहवामान आणि सौर उर्जेचा सततचा पुरवठा हे त्यामागील कारण असावे.
➤ समशीतोष्ण प्रदेशांतील हवामान मात्र अस्थिर आणि प्रतिकूल असते. सौर ऊर्जेचा पुरवठादेखील तुलनेने अत्यंत कमी असतो.
➤समशीतोष्ण प्रदेशांतील जीवप्रजाती पृथ्वीच्या जीवनातील अनेक हिमयुगांमध्ये (Ice Ages) अनेकदा नष्ट झाल्या होत्या.
➤तेथील जैवविविधता कमी असण्याचे हे एक कारण असावे.
समुद्रसपाटीपासूनची उंची
➤ समुद्रसपाटीपासून जसे जसे उंच जावे, तशी जैवविविधता कमी होते.
➤ तसेच वाढत्या सागरी खोलीबरोबरदेखील जैवविविधता घटते.
➤अनेक मानवी आजारांवर इलाज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमधील क्रियाशील घटक हे सजीवापासून मिळविलेलेअसतात.
➤उदा. मलेरियाच्या उपचारासाठी वापरले जाणारे क्यूनाइन (Quinine) हे औषध 'सिंकोना' या वनस्पतीपासून मिळवितात.
➤हृदयासाठी वापरले जाणारे 'डिजीटॅलिस' हे औषध 'फॉक्स ग्लोव्ह' या वनस्पतीपासून मिळवितात.
➤उदाहरणादाखल, उष्णकटिबंधीय वनांमधील केवळ 1% वनस्पतींचा औषधी गुणधर्मांसाठी अभ्यास केला गेलेला आहे.
➤अनेक मानवी रोगाची उपचारक्षमता असणाऱ्या या भांडाराचा 99% भाग तपासणे अजूनही बाकी आहे.
➤या निसर्गातच नवनवीन प्रकारच्या सुरक्षित आणि परिणामकारक औषधांची, उपचारांची गुपिते दडलेली आहेत.
➤परंतु मानवास ज्ञात होण्याआधीच जैवविविधतेच्या होणाऱ्या हासाबरोबर ही गुपिते नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
औषध | सजीव | वापर |
---|---|---|
Atropine | Belladona | Anti cholinergic |
Cantharidine | Chinese blister beetle (भुंगा) | Anti-cancerous |
Strychnine | Nux Vomica Plant (बिबवा) | Brain Stimulant (मेंदू उत्तेजक) |
BioIndicator(जैव सूचक)
➤पर्यवार्नातिल कही घटक विशिष्ट अधिवासामध्ये कोणते सजीव असतील हे ठरवितात.
➤त्यामुले त्या सजीवावरून भोवतालची परिस्थिती व पर्यावरणा चा अंदाज बांधला जातो.
➤अश्या तुरलक प्रजाति च्या महत्वा वरून त्या क्षेत्रास एक विशेष अधिवास संबोधले जाते त्याला जैव सूचक असे म्हणतात.
Mame Of species | Indicator |
---|---|
zizyphus rotindufola | Soil Deposition |
Petridium | Burnt Forest |
Salsola | Saline Water |
जैव महाविविधता केंद्रे
➤ जगातील जैव वितरण हे फार कमी देशात एक्वटलेले आहे
➤ हे महत्वपूर्ण स्थले ओळखले जाऊंन त्यांचे सवर्धन होने गरजेचे असते.
➤या साठी १९९८ साली वाशिंगटन येथे झालेल्या अधिवेशनात हे स्थाने ठरवण्यात आली.
➤ सुरुवातीला याची संख्या १२ होती .
➤ सध्या ती १७ येवडी आहे.
➤जैव विविधता हा दर्जा प्राप्त करण्यासाठी पुढील गोष्टी उपयुक्त ठरतात
- Species Richness
- Degree Of Endemism
✪ जगातील महाजैवविविधता केंद्रे ✪
- Australia
- Brazil
- China
- Colombia
- Democratic Republic of the Congo
- Ecuador
- India
- Indonesia
- Madagascar
- Malaysia
- Mexico
- Papua New Guinea
- Peru
- Philippines
- South Africa
- United States
- Venezuela
Biodiversity Hotspots
➤ जगामध्ये जसे महाजैवविविधता देश आहेत.
➤त्याच प्रमाने काही प्रदेश आहेत जे एका पेक्षा जास्त देशामध्ये स्थायिक आहेत.
➤ या प्रदेशाना त्याच्या विविधतेमुले असाधारण महत्वह प्राप्त आहे.
➤ १९८८ मध्ये नार्मन मायर्स ने ही संकल्पना मांडली.
➤ या साथी पुढील निकष आहेत.
- Number of Endemic species
- LEvel of habitat Destruction
Region | Name |
---|---|
Africa | 1. Eastern Afro-Montanebr 2. The Guinean forests of Western Africabr 3. Horn of Africab 4. Madagascar and the Indian Ocean Islandsbr 5. Maputoland, Podoland, Albany hotspotb 6. Succulent Karoubr 7. East Malanesian islandsbr 8. South Africa's Cape floristic hotspotbr 9. Coastal forests of Eastern Africabr |
Asia and Australia | 1. Himalayan hotspot 2. The Eastern Himalayas 3. Japan biodiversity hotspot 4. Mountains of South-West China 5. New Caledonia 6. New Zealand biodiversity hotspot 7. Philippine biodiversity hotspot 8. Western Sunda (Indonesia, Malas and Brunei) 9. Wallace (Eastern Indonesia) 10. The Western Ghats of India and Islands of Sri Lanka 11. Polynesia and Micronesian Islands Complex including Hawaii 12. South-Western Australia |
North and Central America | 1. California Floristic Province 2. Caribbean islands hotspot 3. Modrean pine-oak wood lands of the USA and Mexico border 4. The Mesoamerican forests |
South America | 1. Brazil's Cerrado 2. Chilean winter rainfall (Valdivian) Forests 3. Tumbes-Choco-Magdalena 4. Tropical Andes 5. Atlantic forest |
Europe and Central Asia | 1. Caucasus region 2. Iran-Anatolia region 3. The Mediterranean basin and its Eastern Coastal region 4. Mountains of Central Asia |
पश्चिम घाटाचे महत्व
➤ पश्चिम घाट हा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील व महत्वपूर्ण आहे
➤जवळपास पुष्पीय वनस्पतींच्या 4000 प्रजाती (भारतातील 27% प्रजाती) पश्चिम घाटांमध्ये आढळून येतात.
➤सदाहरित वृक्षांच्या 645 प्रजातींपैकी 66% प्रजाती या प्रदेशात स्थानविशिष्ट आहेत
➤निम्नस्तरीय वनस्पती वर्गांपैकी, ब्रायोफाइट्सच्या 850-1000 प्रजाती येथे आढळतात. (त्यापैकी 682 प्रजाती मॉसच्या आहे. मॉसच्या 28% प्रजाती स्थानविशिष्ट आहेत.)
अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये प्रजातींची संख्या
- मुंग्या - 350 (20% स्थानविशिष्ट)
- प्रजाती फुलपाखरे - 330 (11% स्थानविशिष्ट)
- मोलुस्का (उदा. गोगलगाय) - 269 (7% स्थानविशिष्ट)
- मासे - 288 (41% स्थानविशिष्ट)
- उभयचर - 220 (78% स्थानविशिष्ट)
- सरपटणारे प्राणी - 225 (62% स्थानविशिष्ट)
- पक्षी - 500 पेक्षा जास्त
➤4 march 2010 रोजी केन्द्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटाच्या अभ्यासासाठी माधव गाडगीळ गट तयार केला.
गटाची कार्य
➤ पश्चिम घाट प्रदेशातील सध्याच्या परिस्थितिकीय स्थितीचे मूल्यमापन (Assessment) करणे.
➤ 'परिस्थितिकीयदृष्ट्या संवेदनशील' (Ecologically sensitive) म्हणून घोषित करावयाची गरज असणाऱ्या पश्चिमघाटातील क्षेत्रांची निश्चिती करणे. पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 अंतर्गत या संवेदनशील क्षेत्रांची घोषणा करण्यासाठीराष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या शिफारसी विचारात घ्याव्यात व त्याचबरोबर संबंधित राज्यसरकारांशी चर्चा करावी.
➤ संबंधित राज्य सरकारे व लोकांशी सल्लामसलत करून पश्चिम घाट प्रदेशाच्या संवर्धन, संरक्षण व पुनरुज्जीवनासाठीम्हणून घोषित करण्यासाठी वेळोवेळी जारी केलेल्या अधिसूचनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारसी करणे.
➤ पश्चिम घाट परिस्थितिकी प्राधिकरण' (Western Ghats Ecology Authority) ची स्थापना
➤ हे प्राधिकरण पश्चिम घाट प्रदेशाच्या शाश्वत विकासासाठी व परिस्थितिकीय व्यवस्थापनासाठी एक व्यावसायिक (Professional) संस्था म्हणून कार्य करेल.
➤ या प्रदेशातील पर्यावरणाशी संबंधित इतर विषयांचा अभ्यास करणे.
पर्यावरण मंत्रालयाने खालील गोष्टींचा या पॅनलच्या कार्यक्षेत्रात समावेश केला आहे.
➤रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा
➤ गुंडीया जलविद्युत
➤ केंद्रअथिरापल्ली जलविद्युत केंद्र
➤ गोव्यातील नवीन खणन परवान्यांवरील स्थगितीसंदर्भात शिफारशी करणे.
गटाच्या शिफारसी
➤ संपूर्ण पश्चिम घाट प्रदेशास ‘परिस्थितिकीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र' (Ecologically Sensitive Area/ESA) म्हणून घोषित करावे.
➤ या प्रदेशाचे ESZ-1 (Ecologically Sensitive Zone-1), ESZ-2, ESZ-3 असे वर्गीकरण करावे. पॅनलच्याअभ्यासावर आधारित या झोन्सची सीमानिश्चिती करणे
➤ ESZ-1, ESZ-2 व ESZ-3 मधील गतीविधींवर वेगवेगळ्या पद्धतींनी नियंत्रणे आणणे. या सर्व प्रक्रियेत लोकांचा व ग्रामसभेचा सहभाग करून घेणे.
➤ ESZ-1 मध्ये कोणताही मोठा जलसाठा असणाऱ्या नवीन धरणांना परवानगी देऊ नये. अथिरापल्ली व गुंडीया हे दोन्हीही जलविद्युत प्रकल्प ESZ-1 अंतर्गत येत असल्याने, या प्रकल्पांना ‘पर्यावरणीय मान्यता' (Environmental clearance) देऊ नये.
Hope Spot
➤ होप स्पॉट्स हे महासागरांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असणारी विशेष स्थळे आहेत.
➤ यांमधील काही ठिकाणे याआधीच संरक्षित आहेत, तर इतर स्थळांना संरक्षणाची गरज आहे.
➤ पृथ्वीवरील जवळपास 12% भूक्षेत्र विविध स्वरुपात (राष्ट्रीय उद्याने, जागतिक वारसा स्थळे, वास्तू इ.) संरक्षित आहे. मात्रमहासागरांचा 4% पेक्षा कमी भाग संरक्षित आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मिशन ब्ल्यू (नील अभियान) ही आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहे. महासागरांचे संरक्षित क्षेत्र 20% पर्यंत वाढविणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट्य आहे.
Hope spot चे फायदे
➤जैवविविधता संवर्धन
➤ कार्बन सिंक म्हणून कार्य ऑक्सिजनची निर्मिती
➤ संवेदनशील अधिवासांचे संवर्धन इकोटुरिझम सारख्या पर्यावरणपूरक कृतींना परवानगी.
हिंदी महासागरातील होप स्पॉट्स
➤लक्षद्विप
➤ अंदमान बेटे
➤ मालदिव ॲटॉल बेटे
➤ गोस (Chagos) द्विपसमूह
➤ मेरगुई (Mergui) द्विपसमूह (म्यानमार)
Others Blogs Related to MPSC Environment Notes
➤MPSC Environment Exam Pattern (परीक्षा पद्धत)
➤पारिस्थितिकी विज्ञान
➤परिथितिकी-मुलभुत संकल्पना
➤भूस्थित परिसंस्था(Terrestrial)
➤जैवविविधता
➤पारिस्थितिकीय अनुक्रमण (Ecological Succession)
➤जलीय परिसंस्था
➤महत्वाच्या परिसंस्था
➤भूस्थिर परिसंस्था
➤जैव विविधता ह्रास
➤जैव विविधता वितरण
➤महाराष्ट्रातील अभयारण्ये,संरक्षित जाळ,महाराष्ट्रातील व्याघ्र राखीव क्षेत्र(Wildlife Conservation)
➤महाराष्ट्र वन्यजीवन
➤पर्यावरण समस्या आणि श्वास्वत विकास
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf