https://www.dompsc.com



महाराष्ट्रातील अभयारण्ये,राष्ट्रिय उद्याने|MPSC Environment(पर्यावरण) Notes

महाराष्ट्रातील अभयारण्ये,राष्ट्रिय उद्याने|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

महाराष्ट्रातील अभयारण्ये,संरक्षित जाळ,महाराष्ट्रातील व्याघ्र राखीव क्षेत्र

Author

By Shubham Vyawahare

17-December-2024
➤ महाराष्ट्र हा जैवविविधता संपन्न असा प्रदेश आहे.
➤ जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट ठरलेल्या पश्चिम घाटांचा बराचसा भाग महाराष्ट्रात वसलेला आहे.
➤ पश्चिम घाटाच्या एकूण 1600 किमी.
➤ लांबी पैकी महाराष्ट्रातील लांबी 440 किमी. आहे.
➤ राज्यामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास 20.1% क्षेत्र (भारतातील वनक्षेत्राच्या 8%) वनांखाली आहे.
➤ वन धोरणानुसार हे 7% असायला हवे.
➤ महाराष्ट्रात एकूण 41 वन्यजीव अभयारण्ये, 6 राष्ट्रीय उद्याने व 6 व्याघ्र राखीव क्षेत्रे आहेत.
➤ जून 2012 मध्ये नव्याने चार आणि 2015 मध्ये एका वन्यजीव अभयारण्याची स्थापना महाराष्ट्रात करण्यात आली आहे.
➤ त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण अधिसूचीत (Notified) वन्यजीव अभयारण्यांची संख्या एकूण 42 इतकी झाली आहे.
➤ नव्याने स्थापलेली ही अभयारण्ये खालीलप्रमाणे.
  • उमरझराई - नागझिरा - भंडारा
  • नवे माळढोक - सोलापूर
  • नवे बोर - वर्धा
  • नवे नवेगाव - गोंदिया
  • ठाणे -
➤ राज्य वन मंडळाने नुकतेच दोन ठिकाणांस अभयारण्यांचा दर्जा देण्यास मान्यता देऊन, त्या संदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे सादर केलेला आहे.
  • ताम्हिनी-सुधागड - पुणे जिल्हा (मुळशी तालुका)
  • ईसापूर - यवतमाळ जिल्हा

महाराष्ट्रातील अभयारण्ये


पुणे विभाग
अभयारण्ये तालुका जिल्हा स्थापना क्षेत्रफळ(चौ. कि. मी)
मयुरेश्वर सुपे (मोर) बारामती पुणे १९९७ ५.१५
भीमाशंकर (शेकरू) आंबेगाव पुणे १९८४ 131
सागरेश्वर/ यशवंतराव चव्हाण केडगाव सांगली १९८५ १०.८७
कोयना पाटण सातारा १९८५ ४२४
ताम्हिणी मुळशी पुणे २०१३ ४९.६२
राधानगरी (गवे) राधानगरी कोल्हापुर १९५८ ३५१


औरंगाबाद विभाग
अभयारण्ये तालुका जिल्हा स्थापना क्षेत्रफळ(चौ. कि. मी)
येडशी –रामलिंग घाट उस्मानाबाद उस्मानाबाद १९९७ २२.३८
नायगाव – मयुरेश्वर (मोर) पाटोदा बीड १९९४ २८.८९
नवीन माळढोक उस्मानाबाद उस्मानाबाद २०१२ १.९८
गौताळा औट्रम घाट कन्नड औरंगाबाद १९८६ २८०
जायकवाडी पैठण औरंगाबाद १९८६ ३४१
अमरावती विभाग
अभयारण्ये तालुका जिल्हा स्थापना क्षेत्रफळ(चौ. कि. मी)
पैनगंगा किनवट यवतमाळ-नांदेड १९८६ ३२४
काटेपूर्णा वाशीम वाशीम १९८८ ७३.६३
अंबाबराव खामगाव बुलढाणा १९९७ १२७.११०
ज्ञानगंगा बुलढाणा बुलढाणा १९९७ २०५
लोणार लोणार बुलढाणा २००० १०७
वाण अमरावती अमरावती १९९७ २११७३.६३
टिपेश्वर केळापूर यवतमाळ १९९७ १४८
इसापूर दिग्रस यवतमाळ २०१४ ३७.८०
मेळघाट धरणी (चिखलदरा ) अमरावती १९८५ ७७८
नरनाळा अकोट अकोला १९९७ १३
कारंजा सोहळ(काळवीट ) कारंजा वाशीम -अकोला २००० १८.३२
नाशिक विभाग
अभयारण्ये तालुका जिल्हा स्थापना क्षेत्रफळ(चौ. कि. मी)
अनेर शिरपूर धुळे १९८६ ८२.९४०
नंदुरबाधमेश्वर (पक्षी) निफाड नाशिक १९८६ १००
यावल यावल जळगाव १९६९ १७९
देऊळगाव रेहकुरी (काळवीट) कर्जत अहमदनगर १९८० २.१७
हरिश्चंद्रगड – कळसुबाई अकोले अहमदनगर १९८६ ३६१


नागपुर विभाग
अभयारण्ये तालुका जिल्हा स्थापना क्षेत्रफळ(चौ. कि. मी)
नवेगाव अर्जुनी मोरगाव गोंदिया २०१२ १२२.७५६
नवीन नागझिरा गोरेगाव गोंदिया २०१२ १५१
बोर सेलू वर्धा १९७० १२१
नवीन बोर (विस्तारित ) सेलू वर्धा २०१४ १६.३१
नागझिरा गोरेगाव गोंदिया १९७० १५१
चपराळा चार्मोशी गडचिरोली १९८६ १३५
भामरागड भामरागड गडचिरोली १९९७ १०४.३८०
अंधारी भद्रावती चंद्रपूर १९८५ १०९
कोका भंडारा भंडारा २०१३ ९७.६२
प्राणहिता गडचिरोली २०१४ ४२०
उमरेड कार्र्हन्डला पवनी नागपूर-भंडारा २०१२ १८९.२९
मानसिंगदेव नागपूर २०१० ६०
नवीन बोर सेलू वर्धा – नागपूर २०१२ ६०

कोंकण विभाग
अभयारण्ये तालुका जिल्हा स्थापना क्षेत्रफळ(चौ. कि. मी)
तुंगारेश्वर (पक्षी) वसई पालघर २००३ ८५
फणसाड पक्षी अभयारण्य अलिबाग रायगड १९८६ ७०
कर्नाळा (पक्षी) पनवेल रायगड १९८६ १२.१४४
तानसा वाडा पालघर १९७० ३२०
मालवण सागरी मालवण सिंधुदुर्ग १९८७
सुधागड सुधागड रायगड २०१४ ७७.१२८

महाराष्ट्र व्याघ्र क्षेत्रे


➤ महाराष्ट्रातील व्याघ्र राखीव क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ (कोअर झोन) 3775.484 चौ. किमी. म्हणजेच महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1.226 % एवढे आहे.
महाराष्ट्र व्याघ्र क्षेत्रे
व्याघ्र राखीव क्षेत्र कोअर झोन क्षेत्रफळ (चौ.किमी.) बफर झोन क्षेत्रफळ (चौ.किमी.) एकूण क्षेत्रफळ (चौ.किमी
मेळघाट 1500.49 1268.03 2768.52
ताडोबा अंधारी 625.82 1101.7711 1727.5911
पेंच 257.26 483.96 741.22
सह्याद्री 600.12 565.45 1165.57
नवेगाव-नागझिरा 653.674 - 653.674<
बोर 138.12 - 138.12

महाराष्ट्रातील जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट स्थळे : (एकूण 8)


  1. वेरुळच्या लेण्या
  2. अजिंठा लेण्या
  3. एलिफंटा लेण्या
  4. छत्रपती शिवाजी टर्मिनस
  5. कास पठार
  6. कोयना वन्यजीव अभयारण्य
  7. चंदोली राष्ट्रीय उद्यान
  8. राधानगरी वन्यजीव अभयारण्य

महाराष्ट्रातील राष्ट्रिय उद्याने (एकूण 6)


राष्ट्रिय उद्यान स्थापना क्षेत्रफळ जिल्हा
चांदोली 2004 317.67 सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी
गुगामल 1987 361.28 अमरावती
नवेगाव 1975 133.88 गोंदिया
पेंच 1975 257.26 नागपूर
सजय गाधी 1983 86.96 मुंबई उपसागर व ठाणे
ताडोबा 1955 116.55 चद्रपूर

महाराष्ट्र राज्य जीव


  • राज्य प्राणी :शेकरू (Malabar giant squirrel) - Ratifa indica
  • राज्य पक्षी : हरियाल (Yellow - footedgreen Pigeon)- Treron phoenicoptera
  • राज्य फुलपाखरू : ब्ल्यू मोरमान - Papiliopolymnestor
  • राज्य फूल : जारुल - Lagerstroemia Speciosa
  • राज्य वृक्ष : साग Tectona grandis
  • राज्य फळ : आंबा (Alphanso Mango)-Magnifera indica

ब्लू मॉरमॉन(रानी पाकोळी)


➤महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत 'ब्ल्यू मोरमॉन' या फुलपाखराला राज्य फुलपाखरू मान्यता देण्याचा स्तुत्य निर्णय नुकताच घेण्यात आला.
➤ यानिमित्तानं 'राज्य फुलपाखरू' घोषित ब्ल्यू मोरमॉन (राणी पाकोळी)म्हणून मान्यता देण्याचा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं.
➤ 'ब्ल्यू मोरमॉन'ला राज्य फुलपाखरू घोषित केल्याच्या निमित्तानं महाराष्ट्रान फुलपाखरांचं निसर्गातलं महत्त्व अधोरेखित करण्यात पुढाकार घेतला आहे.
➤ वन्यजीवसंवर्धन म्हणजे केवळ वाघ अथवा यो प्राणीच नव्हे तर संपूर्ण जैवविविधतेचं संवर्धन.
➤त्यात छोट्यात छोटे कीटकसुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात.
➤महाराष्ट्रात 225 जातींची फुलपाखरे आढळतात.
➤देशात जेवढी फुलपाखरे आहेत त्यातील 15 टक्के महाराष्ट्रात आहेत 'ब्ल्यू मोरमॉन' महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाबरोबरच श्रीलंका व द. भारत पूर्व समुद्री किनाऱ्यावरील भागात आढळते.
➤संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये हे फुलपाखरू आढळतं.
➤ पण सह्याद्री पर्वतरांगा आणि आसपासच्याप्रदेशात तुलनेत त्याचं प्रमाण अधिक आहे.
➤सातपुडा पर्वतरांगा, ताडोबा आणि विदर्भातील इतर जंगलांमध्ये ते तुरळकप्रमाणात आढळते.
➤विशेष म्हणजे ज्या ठिकाणी खूप शहरीकरण झालेलं आहे अशा मुंबईत अगदी कुलाब्यापर्यंत तसंच नागपूरला महाराजबाग परिसरातसुद्धा हे फुलपाखरू दिसते.

महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्र जाळे (Protected Area Networks)


संरक्षित प्रकार संख्या क्षेत्रफल राज्याच्या एकूण क्षेत्रफळाशी प्रमाण (%)
राष्ट्रीय उद्याने 6 1273.60 0.41
वन्यजीव अभयारण्ये 42 7604.44 2.47 (पूर्वी 4.6)
जीवावरण राखीव क्षेत्रे (Biosphere Reserves) 0 - -
जीवसमुदाय राखीव क्षेत्रे (Community Reserves) 0 - -
संवर्धन राखीव क्षेत्रे (Conservation Reserves) 2 184.21 0.06




Download MPSC Books pdf