https://www.dompsc.com



पारिस्थितिकीय विज्ञान|MPSC Environment(पर्यावरण) Notes

पारिस्थितिकीय विज्ञान|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

Intro of पारिस्थितिकीय विज्ञान

Author

By Shubham Vyawahare

17-December-2024
➤कुठलाही सजीव हा अलिप्त नसतो. तो रासायनिक संरचना, तापमान, आर्द्रता,दाब यांसारख्या भौतिक घटकांनी तसेच इतर सजीवांनी बेढलेला असतो. पृथ्वीवरील सर्व सजीव आणि त्यांचे पर्यावरण यांमध्ये पारस्पारिक आंतरक्रिया होत असतात.त्यांचा परस्परांवर विविध मार्गांनी परिणाम होत असतो. या परस्परसंबंधांचा अभ्यास म्हणजेच 'परिस्थितिकी' (Ecology) होय.
➤ Ecology हा शब्द Oikos = निवासस्थान आणि logos = study/ अभ्यास या दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे. शब्दश: परिस्थितिकी म्हणजे सजीवांचा त्यांच्या मूळ निवासस्थानी केलेला अभ्यास होय. या शब्दाचे सर्वप्रथम उपयोजन रिटर या शास्त्रज्ञाने 1968 मध्ये केले. मात्र हा शब्द आपल्या लिखाणांमध्ये वापरून प्रचलित करण्याचे श्रेय हेकेल या संशोधकास जाते.
➤पर्यावरणातील प्रश्न हे नेहमी संकल्पनेशी निगडित विचारल्या गेले आहेत तसेच या संकल्पना नेहमी सध्य स्थितीतील बातम्या वर अनुसरून असतात .

काही व्याख्या


हेकेल (1969) : "सजीवाचा त्याच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वातावरण या दोहोंशीही असणारा सर्वकष संबंध म्हणजे परिस्थितिकी होय."

ओडम : "निसर्गाच्या किंवा परिसंस्थेच्या संरचनेचा आणि कार्यांचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी होय."

टेलर :"सर्व सजीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असलेल्या सर्वकष संबंधांचे विज्ञान म्हणजे परिस्थितिकी होय."

परिस्थितिकी विज्ञानाच्या काही प्रमुख शाखा


➤ पारंपरिक पद्धतीने परिस्थितिकी विज्ञानाचे वनस्पती आणि प्राणी परिस्थितिकी असे विभाजन केले जात होते. मात्र वनस्पती, प्राणी आणि त्यांचे पर्यावरण या परस्परावलंबी आणि वेगळ्या होऊ न शकणाऱ्या गोष्टी आहेत, हे आधुनिक परिस्थितिकी विज्ञान मान्य करते. म्हणूनच आधुनिक परिस्थितिकी विज्ञानाचे विभाजन खालील शाखांमध्ये केले जाते.


Ecology tree diagram

Autecology(ऑटिकॉलॉजी)


➤एका विशिष्ट प्रजातीचा किंवा त्या प्रजातीच्या एखाद्या विशिष्ट सदस्याचा (Individual) पर्यावरण संबंधित असणाच्या संबंधांचा अभ्यास म्हणजे ऑटिकॉलॉजी होय.
➤प्रजाती ऑटिकॉलॉजी : विशिष्ट प्रजातीचा अभ्यास. उदा. वाघाचा (Panthera tigris) परिस्थितिकीय अभ्यास
➤ जीवसंख्या ऑटिकॉलॉजी (Population Ecology) : एखाद्या प्रजातीच्या विशिष्ट स्थानाबरील जीव (Population) अभ्यास. उदा. सुंदरबनमधील वाघांच्या जीवसंख्येचा अभ्यास.

Synecology(सिनिकॉलॉजी)


➤एका विशिष्ट जीवसमुदायाचा (सर्व प्रजातींच्या एकत्रित समूहाचा) परिस्थितिकीय अभ्यास (पर्यावरण संबंधित असणाच्या संबंधाचा अभ्यास) म्हणजे सिनिकॉलॉजी होय.
➤जीवसमुदाय परिस्थितिकीः एका विशिष्ट जीवसमुदायाचा अभ्यास.परिसंस्था परिस्थितिकी : अनेक जीवसमुदायांचा आणि त्यांच्या पर्यावरणाचा एकत्रित अभ्यास (म्हणजेच परिसाअभ्यास). उदा. चिल्का सरोवराचा परिस्थितिकीय अभ्यास
➤ Climate Change


पर्यावरण


➤ "सजीवांच्या सभोवताली असणारे सर्व जैविक तसेच अजैविक घटक; प्रभाव आणि घटना यांना एकत्रितपणे प्यावरण म्हणतात.
➤ अन्न, ऊर्जा, ऑक्सिजन, पाणी, निवारा आणि अशा अनेक गरजांसाठी प्रत्येक सजीव हा त्याच्या पर्यावरणावर अवलंबून असतो
➤ पर्यावरण आणि सजीव यांमध्ये सतत घडणाऱ्या आंतरक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या असतात.

पर्यावरणाचे जैविक:अजैविक असे दोन प्रमुख घटक आहेत.


जैविक घटक अजैविक घटक
हरित वनस्पति पाणी
अहरित वनस्पति अग्नि

➤ पर्यावरण हे स्थिर नसून सतत बदलणारे असते. सजीव त्यांच्या अनुकुलनक्षमतेच्या साहाय्याने या बदलास सामोरे जातात.मर्यादिच्या (सहनशक्तीची कक्षा/रेंज) आतमधील असणारे बदलच सरजीव सहन करू शकतात.




Download MPSC Books pdf