https://www.dompsc.com



Biodiversity degradation(जैव विविधता ह्रास)|MPSC Environment(पर्यावरण) Notes

Biodiversity degradation(जैव विविधता ह्रास)|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

जैव विविधता ह्रास म्हणजे काय ?

Author

By Shubham Vyawahare

17-December-2024
➤मानवाच्या परिस्थितिकीय गरजा इतर कोणत्याही प्राण्याप्रमाणेच आहेत.
➤ मात्र आपल्या फायद्यासाठी जागतिक परिसंस्थांमध्ये, पर्यावरणामध्ये लक्षणीय बदल घडवून आणण्याच्या मानवाच्या क्षमतेमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो.
➤ इतर कुठल्याही सजीवाने मानवाइतके बदल आपल्या पर्यावरणात क्वचितच घडवून आणले असतील.
➤ पृथ्वीच्या भौतिक, रासायनिक व जैविक संरचनेवर मानवाने केलेल्या आघातामुळे असंख्य प्रजाती आणि त्यांच्या अधिवासांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
➤ आदिमानव हा अन्नासाठी भटकंती करणारा व शिकारी होता. त्यास निसर्गाबद्दल नुसताच आदर नव्हता तर त्याने या निसर्गाची पूजा देखील केली.
➤ मात्र आपल्या तीक्ष्ण बुद्धीचा वापर तो जेव्हापासून करू लागला, तेव्हापासून त्याने पर्यावरणात आपल्या फायद्यासाठी व कल्याणासाठी सोयीस्कर बदल घडवून आणावयास सुरुवात केली.
➤ आज मानव निसर्गावर आपले आधिपत्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
➤ निसर्गातील साधनसंपत्तीचा त्याने आपल्या फायद्यासाठी अशाश्वत व अनियंत्रित असा वापर सुरू केला आहे.
➤ निसर्गाचा वापर करताना, निसर्गातील नाजूक समतोलाकडे त्याने नेहमीच दुर्लक्ष केले आहे.
➤ अगदी अलीकडील काळात मानवाच्या लक्षात आले आहे की, अशा प्रकारे पर्यावरणाची केलेली अवनती त्याचेच अस्तित्व भविष्यात धोक्यात आणू शकते.
➤ ज्या स्थितीमधून माघारी फिरण्याचा मार्ग नाही, अशा स्थितीत पृथ्वीस नेता कामा नये याची त्यास जाणीव झाली आहे

जंगलतोड(Deforestation) आणि कारणे


✪ स्थलांतरित शेती ✪
➤ उपजीविकेचे साधन म्हणून या प्रकारची शेती अनेक आदिवासी जमातींकडून जगभरात केली जाते .
➤ मात्र भारत ,मलेशिया यांसारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये या प्रकारच्या शेतीचे प्रमाण जास्त आहे .
➤ या प्रकारच्या शेतीत उत्पादनात लक्षणीय घट होते .
➤ त्यामुळे हा भूभाग तसाच सोडून देण्यात येतो .
➤ जंगलातील इतर भागात हीच प्रक्रिया पुन्हा केली जाते
➤ ईशान्य भारतात अशी शेती अनेक आदिवासींकडून केली जाते .
➤ त्याचबरोबर आंध्रप्रदेश , ओडिशा , काही वनांमधील काही भूभाग वृक्षे तोडून मोकळा केला जातो.
➤ तोडलेले वृक्ष आणि वनस्पती त्याच ठिकाणी जाळून निर्माण .
➤ या राखेमुळे मृदेतील पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढून मातीची सुपिकता वाढते.
➤ ही पद्धत बिहार, मध्यप्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि सिक्कीम या राज्यांतही ही पद्धती पाहावयास मिळते.

स्थलांतरित शेती आणि त्याची विविध राज्यातील नावे


राज्य स्थलांतरित शेतीच नाव
ईशान्य भारत झूम (Jhum)
गारो आदिवासी, मेघालय बोगमा (Bogma)
खासी आदिवासी, मेघालय लिंगखालुम (Lyngkhalum) किंवा शायर्ती (Shyrti)
मिकिर आदिवासी, आसाम रीत (Rit)
आओ नागा (Ao Naga) आदिवासी, मणिपूर Zahtees (Tekonglu)
आदि आदिवासी (Adis), लुशाई पर्वतरांगा आदिआबिक (Adiabik)
Reangs आदिवासी, त्रिपूरा झुक्यूस्माँग (Hookuismong)
कोया आदिवासी लंकापदसेनाद (Lankapadsenad)
भुनिया (Bhuinyas), उत्तर प्रदेश रेमो (Remo), दही कामन (Dahi Kaman) किंवा बिरिंगा (Biringa)
दक्षिण ओडिशा गुडिया, बागडा (Bagda), Sarban Donger Chara, पोडू
बिझिया (Birjhia) आदिवासी बेओन्रा (Beonra)
मालेर आदिवासी, छोटा नागपूर पठार कुरवा (Kurwa)



Overgrazing अतीचराई


➤अतिचराईमुळे मृदेस बांधून ठेवणारे वनस्पतींचे आच्छादन नाहीसे होऊन, मृदा उघडी पडते.
➤ याचे पर्यावसन मृदेची धूप (Soilerosion) आणि वाळवंटीकरण (Desertification) यांमध्ये होते.
➤मृदेची जलधारणक्षमतादेखील कमी होते. वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन मिळते.
➤ अतिचराई झालेल्या प्रदेशांमध्ये पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याचे प्रमाणदेखील कमी असते.
➤ मृदेतील पोषणद्रव्ये पाण्याबरोबरवाहून जातात. सुपिकता घटून परिसंस्थांच्या उत्पादकतेवर त्याचा विपरित परिणाम होतो.
➤ भारतात एकीकडे गुरांची संख्या वाढते आहे, तर दुसरीकडे कुरणांसाठीचा उपलब्ध भूभाग हा घटत चालला आहे.
➤ त्यामुळे उपलब्ध कुरणांवरचा ताण वाढतो आहे.

अशाश्वत शेती (Unsustainable Agriculture)


➤शेतीमध्ये नैसर्गिक परिस्थितिकीय व्यवस्थांमध्ये सोयीस्कर बदल घडवून आणले जातात.
➤एकप्रकारे नैसर्गिक परिसंस्थांमध्ये हस्तक्षेप करून उत्पादकतेवरील नैसर्गिक मर्यादा काढून टाकणे किंवा कमी करणे आणि पीकवाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण, हेच शेतीचे प्रमुख उद्दिष्ट असते.
➤ या हस्तक्षेपांमध्ये नवनवीन पीकवनस्पतींच्या वाणांचा वापर, स्पर्धा करणाऱ्या वनस्पती (तणे) काढूपण, तणनाशकाचा व खताचा वापर, किटकनाशकांद्वारे रोगांचे नियंत्रण इ. बाबींचा समावेश होतो.
➤मात्र या अशाश्वत शेतीमुळे पर्यावरणाची अतोनात हानी होत आहे.
➤ वर्षातून अनेकदा येणाऱ्या वनस्पती (Perennials) आणि झाडे यांपेक्षा वर्षातून एकदाच येणाऱ्या वनस्पतींचे मृदा ही खुली होते.
➤ या भूभागाच्या सूक्ष्म हवामानात (Microclimate) बदल होऊन, अनेक तण-वनस्पती जलदगतीने वाढतात.

खनन (Mining)


➤ शास्त्रीय प्रगति बरोबर मानवी गरजा वाढलेल्या आहेत.
➤ मानव ला आवश्यक वाटणारा प्रत्येक बाबी आता मिलवने शक्य आहे.
➤अश्या परिस्थिति मध्ये मानवाने कसल्याही बाबीचा विचार न करता प्रगति केलि आहे.
➤ खोदकाम , खनन ही आंतररास्ट्रीय बाजार पेठाची गरज आहे.
➤ यातून जो पर्यावरण ह्रास होतो त्या कडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.

शहरीकरण


➤ ओद्योगिक क्रांति मुले मानवाची एक नविन वाटचाल सुरु झालेली आहे .
➤ओद्योगिकरण एक विशित्ष्ट शहर पुरते मर्यादित असल्यामुले कामगारांची गरज जास्त भासु लागली आहे.
➤ या सर्व कारणामुले एका भोगोलिक भागामध्ये एकदाच गरज निर्माण होते या सर्व गोष्टीतून पर्यावरणीय ह्रास होतो आहे
➤ १९८८ मध्ये नार्मन मायर्स ने ही संकल्पना मांडली.




Download MPSC Books pdf