https://www.dompsc.com



पारिस्थितिकी मुलभुत संकल्पना|MPSC Environment(पर्यावरण) Notes

पारिस्थितिकी मुलभुत संकल्पना|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

Intro of पारिस्थितिकी मुलभुत संकल्पना

Author

By Shubham Vyawahare

17-December-2024
➤परिस्थितिकी विज्ञानाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्याआधी काही परिस्थितिकीय संकल्पना समजावून घेणे गरजेचे आहे.
अधिवास (Habitat) पर्यावरणातील सजीव ज्या ठिकाणी जन्मास येतात, वाढतात, आपला जीवनक्रम व्यतित करतात व शेवटी मृत होतात, त्या ठिकाणास किंवा स्थानास 'सजीवांचा अधिवास/निवासक्षेत्र' असे म्हणतात. थोडक्यात सजीव ज्या परिसरात राहतो, तो परिसर म्हणजे अधिवास होय. उदा. तलाव, दलदलीय प्रदेश, जंगल, महासागर इ.
जीव प्रजाती (Species) परस्परांमध्ये मुक्तपणे समागम करून सक्षम संततीचे प्रजनन करणाऱ्या सजीवांच्या समूहास जीवप्रजाती असे म्हणतात. उदा. Panthera tigris (वाघ), Homo sapiens (मानव), Pisum sativum (वाटाणा) इ.

जिवसंख्या पारिस्थितिकी (Population Ecology)


➤ एका विशिष्ट प्रदेशात विशिष्ट वेळी असणाऱ्या एकाच विशिष्ट जीवप्रजातीच्या सदस्यांच्या समूहास (किंवा सदस्य संख्येस) जीवसंख्या असे म्हणतात.
➤ उदा.मेळघाटमधील वाघांची जीवसंख्या (Population), सुंदरबनमधील वाघांची जीवसंख्या, मानस अभयारण्यातील हूलॉक वानरांची जीवसंख्या इ.
डीम्स (Demes) एकाच प्रजातीच्या भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या झालेल्या जीवसंख्यांना डीम्स (Demes) असे म्हणतात. या स्थानिक मध्ये स्थानिक पर्यावरणानुसार काही बदल झालेले दिसतात.
जीवसंख्येची वैशिष्ट्ये
➤घनता : एकक क्षेत्रात असणारी जीवांची संख्या .
➤ जन्मदर .
➤ मृत्युदर.
➤ विकिकरण
➤ वय वितरण

✷ विस्तारणारी जीवसंख्या (Expanding Population) ✷

➤या प्रकारच्या जीवसंख्येत एकून जीवसंख्ये पैकी तरुण सदस्याचे असणारे प्रमाण जास्त आहे.भारताची लोकसंख्या विस्तारणारी आहे.

✷ स्थिर जीवसंख्या (Stable Population) ✷


➤ जीवसंख्येचा मृत्यूदर आणि जन्मदर हा जवळपास सारखाच असल्याने जीवसंख्या स्थिर राहते. एकूण जीवसंख्येतील तरुण सदस्यांचे प्रमाण (Proportion) हे मध्यम असते.

✷ घटणारी (वयस्कर होणारी) जीवसंख्या (Ageing or declining Population) ✷


➤ मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा जास्त असतो. तरुण सदस्यांचे प्रमाण हे कमी असते. उदा. गिधाडांची घटणारी जीव लोकसंख्या.

जीवसमुदाय Community


➤ एकाच अधिवासात राहणाऱ्या, परस्परांमध्ये तसेच भौतिक पर्यावरणाशी आंतरक्रिया करणाऱ्या सर्व सजीवांचा (सर्व जीवप्रजातींच्याजीवसंख्यांचा) समूह म्हणजेच जीवसमुदाय होय.
➤जीवसमुदाय हा भौतिक पर्यावरणापासून वेगळा करता येत नसला तरीही, जीवसमुदाय हा शब्द परिसंस्थेतील केवळ जैविक घटकच (सजीव) दर्शवितो.
जीवसमुदाय = एकाच अधिवासातील सर्व सजीव (जैविक घटक)
परिसंस्था =सर्व सजीव + भौतिक पर्यावरण (जैविक घटक) (अजैविक घटक)
➤ उदा. गवताळ प्रदेशामध्ये गवते, किटक, कृमी, पक्षी, सूक्ष्मजीव, सस्तनशील प्राणी इ
➤ विविध जीवप्रजाती परस्परांमध्ये आंतरक्रिया करीत असतात. कीटक हे अन्नासाठी गवतावर अवलंबून असतात. तर कीटक हे पक्षांचे अन्न म्हणून कार्य करतात.
➤गवताळ प्रदेशांतील सर्व सजीवांचा एकत्रित असा एक 'गवताळ प्रदेशीय जीवसमुदाय' तयार होतो.
➤ जीवसमुदाय हे कितीही लहान किंवा मोठ्या आकाराचे असू शकतात.
➤ जीवसमुदायांमध्ये जीवसमुदाय अशी संरचना आढळते.


jiv-samuday
विशिष्ट प्रजातीचे आधिपत्य (Dominance)
➤ जीवसमुदायांना निश्चित व सुस्पष्ट अशा सीमा नसतात. दोन लगतच्या जीवसमुदायांच्या दरम्यान दोहोंचीही वैशिष्ट्ये असणारा संक्रमणात्मक प्रदेश आढळतो
➤सुस्पष्ट आणि निश्चित सीमा असणारा ‘जीवावरण' हाच एकमेव जीवसमुदाय आहे.
➤कुठल्याही जीवसमुदायामध्ये एखाद्या विशिष्ट प्रजातीचे आधिपत्य/आधिक्य असते. संख्येने किंवा जैववस्तुमानाने सर्वांत जास्त असणारी ही प्रजाती अधिवासाच्या स्वरूपामध्ये आणि वैशिष्ट्यांमध्ये बदल घडवून आणते
➤परिणामी अधिवासातील इतर प्रजातींवर तेथील जीवसमुदायाचा आकृतिबंध हा त्या प्रजातीने प्रभावित झालेला असतो.
➤म्हणून त्या प्रजातीच्या नावानेच संपूर्ण जीवसमुदायास यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
1.प्रजातींची संख्या
2.जीवसंख्येतील प्रत्येक प्रजातीचे प्रमाण (Relative Abundance)

Ecotone & edge Effects


➤ कोणत्याही जीवसमुदायास निश्चित आणि सुस्पष्ट अशा सीमा नसतात.
➤दोन वेगवेगळ्या लगतच्या जीवसमुदायांच्या मधीलसंक्रमणात्मक प्रदेश म्हणजे 'इकोटोन' होय.
➤ उदाहरणार्थ, जंगल आणि गवताळ प्रदेशांच्या मधील संक्रमणात्मक प्रदेश, कुरणातूनवाहणाऱ्या ओढ्याचा किनारा.
➤इकोटोन्समधील परिस्थिती ही लगतच्या जीवसमुदायांमध्ये असणाऱ्या परिस्थितींच्या दरम्यानची असते.
➤इकोटोन्समधील जैवविविधता ही लगतच्या जीवसमुदायांपेक्षा जास्त असते.

✷ इकोटोन्स जैवविविधता संपन्न असण्याची कारणे ✷


लगतच्या दोन्हीही जीवसमुदायांमधून जीवप्रजातींचे Ecotone होणारे स्थलांतर
लगतच्या जीवसमुदायांमध्ये न आढळणाऱ्या काही प्रजाती Ecotone आढळतात.
सीमा परिणाम (Edge Effect)
➤लगतच्या जीवसमुदायांमध्ये न आढळणाऱ्या व केवळ इकोटोनपुरत्याच मर्यादित असणाऱ्या प्रजातींसाठी अधिवास म्हणून कार्य करण्याच्या इकोटोन्सच्या क्षमतेस सीमा परिणाम (Edge Effect) असे म्हणतात.
➤ उदा. घुबडाची एक प्रजाती वने आणि गवताळ प्रदेशांच्या मध्ये असणाऱ्या इकोटोनमध्ये आढळते.
➤अन्नभक्षणासाठी ही प्रजाती गवताळ प्रदेशांवर, तर अधिवासासाठी इकोटोन्स मधील वृक्षांवर अवलंबून असते.

Ecosystem(परिसंस्था)


➤विविध सजीवांमध्ये तसेच सजीव आणि पर्यावरण यांमध्ये परस्पर आंतरक्रिया घडत असतात.
➤पर्यावरण आणि सजीवांमधील आंतरक्रिया ही दोन्हीही दिशांमध्ये घडणारी प्रक्रिया असते.
➤'परिसंस्था' हा पारिभाषिक शब्द योजण्याचे व त्याची व्याख्या करण्याचे श्रेय आर्थर टान्सली (1935) या ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञास जाते.
➤त्याने केलेली व्याख्या अशी, “पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या एकीकरणातून आकारास येणारी व्यवस्था म्हणजे परिसंस्था होय."
➤कुठल्याही प्रदेशातील जीवसमुदाय आणि भौतिक पर्यावरण यांची मिळून परिसंस्था बनते.
➤म्हणजेच परिसंस्थेमध्ये त्या प्रदेशातील जैविक तसेच अजैविक घटकांचा समावेश होतो..
➤परिसंस्था ही परिस्थितिकी विज्ञानातील अत्यंत महत्वाची संकल्पना असून, ती परिस्थितिकीय अभ्यासाचे एकक (Unit ofEcological Studies) आहे.
➤परिसंस्था ही अभ्यासकाच्या उद्देशानुसार कितीही लहान (जसे जंगलातील कुजणारे लाकूड व त्यातील जीवसमुदाय, शेणाचा गोळा व त्यामधील सजीव) किंवा कितीही मोठी (उदा. उष्णकटिबंधीय सदाहरित वने किंवा संपूर्ण पृथ्वी) असू शकते.
➤परिसंस्थेमधील विघटक हे परस्परांशी अनेकार्थांनी संबंधित असतात. विविध सजीवांमध्ये, सजीव व त्यांचे पर्यावरण यांमध्येपरस्पर आंतरक्रिया होत असतात.
➤परिसंस्थेतील एका घटकाचा परिणाम हा वेगवेगळ्या प्रमाणात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे परिसंस्थेतील इतर घटकांवर होत असतो.
➤ओझोनमध्ये स्ट्रॅटोस्फीयर मुबलक आहे, एक प्रकारचे ऑक्सिजन रेणू जो सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना शोषून घेतो आणि वातावरणामध्ये या थराला गरम करण्यासाठी वापरतो
➤या प्रमाने पर्यावरण सजिवाना प्रभावित करते, त्याचप्रमाणे सजीवदेखील आपल्या विविध जीवनप्रक्रियांच्या आधारे (उदा. वाढ, जीवावशेषांचे विघटन इ.) पर्यावरणास प्रभावित करतात.
➤ परिसंस्थेमध्ये उत्पादक भक्षक यांची आंतरक्रिया चालूच असते.

● Lindman Law of trophic efficiency ●
अन्न साखळी मध्ये उर्जा विनिमय एका पातळी पासून पुड्च्या विनिमय पातळीकडे उर्जेचे होणारे हस्तांतरण हे जवळपास १० % असते.


Food Chain


➤ सूर्यापासून आलेली उर्जा उत्पादकापासून तृतीय भक्षकापर्यन्त जाते त्याला अन्न साखळी असे म्हणतात.

✪ Grazing Food Chain ✪


✪ भूस्थित अन्न साखळी✪


✪ जल अन्न साखळी✪


परिसंस्था प्रकार


➤ मानवी हस्तक्षेपाच्या आधारे परिसंस्थांचे दोन प्रकार पडतात.
  1. नैसर्गिक परिसंस्था Natural Ecosystems
  2. मानवी हस्तक्षेपांपासून मुक्त असणाऱ्या परिसंस्थांना नैसर्गिक परिसंस्था म्हणतात. उदा. सागरी परिसंस्था, गवताळ प्रदेशीय परिसंस्था इ.

  3. मानव निर्मित परिसंस्था Artificial Ecosystems
  4. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मानवी हस्तक्षेपांनी बदल घडवून आणलेल्या परिसंस्थांना मानवनिर्मित परिसंस्था म्हणता येईल.


    ● स्वत:च्या फायद्यासाठी मानव या परिसंस्थांमधील परिस्थिती नियंत्रित करीत असतो.
    ● उदा. शेती ही मानवनिर्मित परिसंस्था आहे. शेतीमध्ये विविध किटकनाशके, तणनाशके वापरून मानव तणांचे, किडींचे नियंत्रण करतो. उत्पन्नवाढीसाठी विविध खतांचा वापर करतो.
➤ स्थानानुसार परिसंस्थांचे दोन प्रकार आहेत
  1. भूस्थिर परिसंस्था (Terrestrial Ecosystems):भूपृष्ठावर असणाऱ्या सर्व परिसंस्थांचा यात समावेश होतो.
  2. ● उदा.गवताळ प्रदेश, टुंड्रा वने.
  3. जलीय परिसंस्था (Aquatic Ecosystems) :पाण्यामध्ये स्थित असणाऱ्या परिसंस्थांना जलीय परिसंस्था असे म्हणतात.
  4. उदा. प्रवाळे, सागरी परिसंस्था, सरोवर, तलाव, नदी इ.

जैव-भू-रासायनिक-चक्र (Biogeochemical Cycle)



Niche



Keystone species






Download MPSC Books pdf