https://www.dompsc.com



Terrestrial(भूस्थित परिसंस्था)|MPSC Environment(पर्यावरण) Notes

Terrestrial(भूस्थित परिसंस्था)|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

Intro of भूस्थित परिसंस्था(Terrestrial)

Author

By Shubham Vyawahare

17-December-2024
➤पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या एक चतुर्थांश भागच जरी भूमीने व्यापलेला असला तरीही,भूस्थित परिसंस्थांची क्लिष्टता व विविधता ही जलीय परिसंस्थापेक्षा बरीच अधिक असते.
➤ हवामानाची विविधता, शीलावरणातील विविधता व भूस्थित जीवसमुदायांची असमानता यास कारणीभूत ठरते.
➤ जलिय परिसंस्था ही एकावस्था (Single phase)असणारी व्यवस्था आहे.
➤ भूस्थित परिसंस्था मात्र त्रिअवस्था (Three phase) व्यवस्था आहे.
➤ यांमधीलअधिवासांची वैशिष्ट्ये वातावरण आणि हवामान, मृदा आणि स्वतः जीवसमुदाय यांद्वारा नियमित होत असतात.
➤ एखाद्या पर्यावरणातील प्रणालीमध्ये सापडलेल्या बायोटिक किंवा सजीव वस्तूंमध्ये वनस्पती आणि प्राणी यांसारख्या विविध जीवनांचा समावेश होतो.
➤ इकोसिस्टममध्ये सापडलेल्या अजैविक किंवा निर्जीव वस्तूंमध्ये विविध भू-जीवन आणि हवामान यांचा समावेश आहे.
➤भूस्थित परिसंस्था हा महासागर आणि भौगोलिक सी पूल नंतर तिसरा सर्वात मोठा जागतिक कार्बन (सी) पूल आहे
➤भूस्थित परिसंस्थांचे वर्गीकरण खंडीय भूभाग खालील दोन प्रकारे वर्गीकृत केला जातो.
(1) जैवभौगोलिक प्रदेश (Biogeographic Realms or regions) :
पृथ्वीवर सहा जैवभौगोलिक प्रदेश निर्धारीत केलेले आहेत.
  • (1) पॅलीआर्क्टिक प्रदेश (Palearctic realm)
  • (2) निओट्रॉपिकल प्रदेश (Neotropical realm)
  • (3) निआर्क्टिक प्रदेश (Nearctic realm)
  • (4) इथिओपिअन प्रदेश (Ethiopian realm)
  • (5) ओरिएंटल प्रदेश (Oriental realm)
  • (6) ऑस्ट्रेलियन प्रदेश (Australian realm)

(2) जीवसंहती Biomes
  • (1) टुंड्रा Tundra
  • (2) अल्पाइन Biome
  • (3) वन Biome
  • (4) सव्हाना Biome
  • (5) गवताळ प्रदेशीय Biome
  • (6) वाळवंट Biome


Biome (जीवसंहती)


➤जैवभौगोलिक क्षेत्रांमध्ये हवामान, इतर भौतिक घटक आणि जैविक घटक यांमधीलआंतरप्रक्रियांतून मोठ्या आकाराचे जे जीवसमुदाय) आकारास येतात, त्यांना जीवसंहती असे म्हणतात.
➤ जीवसंहती हा एक अत्यंत प्रचंड भौगोलिक प्रदेश आहे जो जैविक प्रणालीपेक्षा मोठा आहे.
➤ शिवाय, जीवसंहती व्याख्या ही आहे की तिचा एक विशाल भूभाग तेथील वातावरण, वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून आहे.
➤ शिवाय जीवसंहती सारख्या प्रदेशात असंख्य जैविक प्रणाली असतात.

Tundra (टुंड्रा प्रदेश)


➤ टुंड्रा हे नाजूक (Fragile) परिसंस्थांचे एक उत्तम उदाहरण आहे.
➤ टुंड्रा म्हणजे 'दलदुली मैदाने' (Marshy Plain)होय.
➤ 60°N अक्षवृत्तास उत्तरेस ही स्थित आहेत.
➤ झाडांचा अभाव, खुरट्या वनस्पतींचे अस्तित्व आणि मउ(Spongy) आणि आर्द्र असा भूभागाचा वरील पृष्ठभाग ही टुंड्राची वैशिष्ट्ये आहेत.
➤ तापमान, पर्जन्य आणि बाष्पीभवन हे अत्यंत कमी असते. सर्वांत उष्ण महिन्यांमधील तापमान देखील 10°Oपेक्षकमी, तर सर्वांत आर्द्र महिन्यांतील पर्जन्यमान हे 55mm पेक्षा कमी असते.
➤ तरीही बाष्पीभवनाचा दर अत्यंत कमी असल्याने कमी पर्जन्यमान ही अडचण ठरत नाही.
➤ वरच्या भागातील 10-20 सेमी. रुंदीचा थर वगळता भूपृष्ठ सहसा गोठलेले असते.
➤ कायमस्वरुपी गोठलेल्या मृदेच्यखोल थरास permafrost असे संबोधले जाते.
➤ काही सेमी ते काही मीटर्स खोलीवर असणाऱ्या permafrost रेषेपर्यंवनस्पतींची मुळे वाढू शकतात.
➤ वनस्पतीजीवनः गवते, लव्हाळे (sedges), मॉस आणि दगडफूल (Lichens). दगडफूल (रेनडिअर मॉस म्हणूनप्रख्यात) हे आर्टेिट टुंड्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
➤ दगडफूल (Lichens) हे शैवाल (Algae) आणि बुरश(Fungi) यांच्या परस्परसह्योगातून (Symbiotic Association) निर्माण होते.
➤ निव्वळ प्राथमिक उत्पादकता अत्यंत कमी आहे.


अल्पाइन Biome


➤हिमालयाप्रमाणे काही उंच पर्वतरांगांमध्ये वृक्षरेषेच्या (timber line) वरील विशिष्ट वनस्पती व प्राणीजीवन :प्रदेशास अल्पाईन प्रदेश असे म्हणतात.
➤प्रदेशाचे खालील उपविभाग
  1. उप-हिम प्रदेश (Sub-snow zone) - हिमरेषेच्या लागलीच खालील प्रदेश.
  2. कुरण प्रदेश (Meadow zone)- मधोमध स्थित.
  3. झुडुप (Shrub) प्रदेश - हा प्रदेश हळूहळू वृक्ष प्रदेशात (Tree zone) विलीन होतो.
अतिउंचीवरील या प्रदेशातील पर्यावरणाची खालील वैशिष्ट्ये आहेत
➤हवेची कमी घनता.
➤कमी ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व बाष्प पातळी, ओझोनचे जास्त प्रमाण.
➤ कमी तापमान, हिम आच्छादन, शुष्कनाचा (desiccation) वाढलेला दर
➤ वेगाने वाहणारे वारे, चमकणारे आकाश व हिम.
➤ झाडांचा अभाव
➤ आयनकारी प्रारणाची जास्त तीव्रता (High intensity of ionising radiation)..

वन संहती


समशीतोष्ण पानझडी वने (Temperate deciduous forests)
➤रुंदपर्णी पानझडी वृक्ष या वनांचे वैशिष्ट्य आहे. या वृक्षाची पाने पावसाळ्यात गळतात, हिवाळ्यात कमी प्रमाणात असतात आणि वसंत ऋतुमध्ये या वृक्षांना पालवी फुटते. उंची -40-50 मी.
➤ही वने पूर्व आशिया, चिली, ऑस्ट्रेलियाचा काही भाग आणि जपानमध्ये आढळतात.
उष्णकटिबंधीय वर्षावने (Tropical Rainforests)
➤ही वने पृथ्वीवरील सर्वांत अधिक वैविध्यपूर्ण जीवसमुदायांपैकी एक आहेत. तापमान व आर्द्रता दोन्हीही जास्तआणि स्थिर असतात.
➤वार्षिक पर्जन्यमान 200-225 सेमी पेक्षा जास्त असून वार्षिक वितरण एकसमान असते.
➤वनस्पतीजीवन हे आत्यंतिक वैविध्यपूर्ण असून एक चौरस मैल क्षेत्रात 300 पेक्षा अधिक प्रजाती असू शकतात.
➤वनांमध्ये स्तरीकरण (Stratification) आढळून येते
➤उंच झाडावर द्राक्षवेली (Vines), Creepers (लता/वेली),महालता (Lianas), आमर बांडगुळे (Epiphytic orchids) आणि bromeliads आढळून येतात.
➤या वनांतील प्राणीजीवनदेखील अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. न्यू गिनी आणि द. क्विन्सलँड मधील वनांमध्ये माकडांचा अभाव असला तरीही झाडावर राहणारे कांगारु येथे आढळतात.
उष्णकटिबंधीय हंगामी वने
➤एकूण वार्षिक पर्जन्यमान खूप जास्त असून निश्चित आर्द्र आणि शुष्क हंगाम आढळतात.
➤झाडे 40 मी. पेक्षा उंच वाढू शकतात.
➤स्तरीकरण हे साधे असून पानझडी वृक्षांचा वरील स्तर व सदाहरित असा खालचा थर आढळतो.
➤सागवान हा भारत आणि साऊथ ईस्ट आशियामधील वनांमध्ये प्रमुख वृक्ष आहे.
➤ मान्सून वनांचा या प्रकारच्या वनांमध्ये समावेश होतो.
➤स्ट्रॅटोस्फीयरमध्ये जैविक जीवाणूंचे प्रकार राहतात.
उप-उष्णकटिबंधीय वर्षा वने (Sub-tropical Rainforests)
➤हिवाळा व उन्हाळ्यातील तापमानामधील फरक (वार्षिक तापमान कक्षा) कमी असणाऱ्या बऱ्यापैकी जास्त पर्जन्य प्रदेशा मध्ये
➤ उदा. अमेरिकेतील फ्लोरिडा) रुंदपर्णीय सदाहरित उप-उष्णकटिबंधीय (Broad leavedsub-tropical) जीवसंहती आढळून येते.
➤ सर्व वनस्पती सदाहरित असतात. परंतु शुष्क हंगामात त्यांची पाने झडू शकतात.
समशीतोष्ण सदाहरित (Temperate Evergreen)
➤भूमध्य प्रकारचे हवामान (उष्ण, शुष्क उन्हाळे आणि शीत, आर्द्रहिवाळे) असणाऱ्या प्रदेशांमध्ये ही वने आढळतात.
या प्रकारचे हवामान असणाऱ्या प्रदेशांमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो.
टोकदार किंवा थोडी रुंद पाने असणारी कमी उंचीची सदाहरित झाडे येथे आढळतात.
➤ 3-4 मी. उंचीची झुडपे (Shrubs) आढळतात.
➤ प्रजाती विविधता ही साधारणपणे समशीतोष्ण पानझडी वने आणि शुष्क गवताळ प्रदेश यांदरम्यानची आहे.
➤ वणवा हा या परिसंस्थांमधील महत्त्वाचा घटक आहे.
➤ वणव्यामध्ये जळाल्यानंतर पुर्ननिर्मिती क्षमतेची अनुकूलने वनस्पतीजीवन येथील वनस्पतींमध्ये विकसित झालेली दिसतात.
➤ प्राणीजीवन - हरिण, ससा, झाडांवर राहणारे खुरी प्राणी (Ungulates) इ.
➤ उड्या मारणारे व वेगाने धावणारे खुरी प्राणी हेदेखील सामान्यपणे आढळतात.
समशीतोष्ण वर्षावने (Temperate Rainforests)
➤ इतर कोणत्याही वर्षावनापेक्षा ही शीत (Cold) परिसंस्था आहे. या वनांमध्ये तापमान आणि पर्जन्यमान वर्षभरात बदलत असून यामध्ये निश्चित हंगामीपणा आढळून येतो.
➤ पर्जन्यमान जास्त असते. त्याबरोबरच धुक्याचे प्रमाणहीखूप अधिक असू शकते आणि पाण्याचा स्रोत म्हणून धुक्याचे महत्त्व पर्जन्यापेक्षाही जास्त आहे.
➤ प्राणी व वनस्पती विविधता ही उष्ण (Warm) वर्षावनांच्या तुलनेत कमी असली तरीही इतर समशीतोष्ण वनांपेक्षा जास्त आहे.
➤ रेडवूड (द. अमेरिकेचा पॅसिफिक समुद्रकिनारा), अल्पाइन अंश (Alpine Ash) (ऑस्ट्रेलिया व तास्मानिया) या वनस्पती प्रजाती प्रामुख्याने आढळतात.
➤ आमर बांडगुळे (Epiphytes) आणि महालता (Lianas) हे देखील सामान्यतः आढळतात. मात्र इतर वर्षावनांप्रमाणे विपुल प्रमाणात आढळत नाहीत.
➤ प्राणीजीवन हे बहुतांशी पानझडी वनांप्रमाणेच मात्र काहीसे जास्त वैविध्यपूर्ण असते.

उष्णकटिबंधीय सव्हाना (Tropical Savanna)


➤ सव्हाना हे विरळ, विखुरलेल्या, अवर्षण प्रतिरोधक व 10 मी) पर्यंत उंचीच्या झाडांसह असणारे उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत.
➤ सव्हाना जीवसंहती वन आणि गवताळ प्रदेश यांदरम्यानची आहे.
➤ मे-ऑक्टोबर या कालावधीत पावसाळा तर नोव्हेंबर-एप्रिल शुष्क ऋतू हे येथील हवामानाचे वैशिष्ट्य आहे.
➤ मृदा (Latosol Soils) पावसामुळे पोषणद्रव्ये वाहून गेल्याने मृदेमध्ये पोषण द्रव्य कमी सापडतात.
➤ हवामान व मृदा हे जरी महत्त्वाचे नियंत्रक घटक असले तरीही सर्वात महत्वाचा नियंत्रक घटक वणवा आहे
➤या घटकामुळेच येथील प्रजाती वैविध्य हे लगतच्या उष्णकटिबंधीय वनांच्या तुलनेत बरेच कमी असते.
➤ पाने ही बऱ्याचदा कठीण व अवर्षण प्रतिरोधक असतात.
➤ मोठ्या आकाराचे प्राणी (उदा. जिराफ, हत्ती, गवे, सिंह, काळवीट इ.) आढळतात.
➤ चावण्यासाठी प्रबळ अधोहनु (Mandibles) असणारे किटकवर्गीय प्राणी मोठ्या प्रमाणावर येथे आहेत.

गवताळ प्रदेशीय (Grassland Biome)


➤ वनांसाठी अपुरे परंतु वाळवंटापेक्षा जास्त पर्जन्यमान (25 ते 75 सेमी.) असणाऱ्या प्रदेशांमध्ये ही जीवसंहती आढळते.
➤ गवताळ प्रदेश हे खंडांच्या अंर्तभागात आढळतात. उंच गवताचे प्रेअरी, खुरट्या गवतांचे प्रेअरी, द. अमेरिकेतील शुष्क गवताळ प्रदेश, युरेशियामधील स्टेपी, Puszta (हंगेरी), आफ्रिकेतील वेल्ड (Veldt), आणि द. अमेरिकेतील पंपास (अर्जेंटीना) इ. ठिकाणी ही जीवसंहती आढळते.

वाळवंट (Desert Biomes)


➤ वाळवंट जीवसंहती ही अत्यंत शुष्क पर्यावरणामध्ये आढळते. तापमानानुसार वाळवंटाचे शीत वाळवंट (Colddeserts) व उष्ण वाळवंट (Hot deserts) असे प्रकार पडतात.
➤ वाळवंटामध्ये पर्जन्यमान अत्यंत कमी (10 मीमी पेक्षा कमी) असते.
➤ जगातील बहुतांश उष्ण वाळवंटे कर्कवृत्त (Tropic of Cancer) व मकर वृत्ताच्या (Tropic of Capricorn)जवळपास वसलेली आहेत.
➤ तर शीत वाळवंटे अतिउंचीवर वसलेली आहेत. वारे अतिउंचीवर पोहचेपर्यंत त्यांमधीलबाष्प अत्यंत कमी होते, त्यामुळे तेथे अत्यंत कमी पाऊस पडतो. बहुतांश शीत वाळवंटांमध्ये Sage Brush वाढते.
हवामान (Climate)
➤ अत्यंत कमी पर्जन्यमान
➤ मृदा व हवेचे तापमान दिवसा अत्यंत जास्त तर रात्री अत्यंत कमी असते. दैनिक तापमानकक्षा जास्त असते.
➤ कमी आर्द्रता
➤ जास्त सूर्यप्रकाश (Insolation)
➤ वातावरणातील या सर्व निर्जलीकरण घटकांना (dessicating factors) येथील वनस्पती व प्राणी अनुकूलित झालेले असतात.
वाळवंटी अनुकूलने (Desert Adaptations)

वनस्पती : पाणी वाया जाऊ न देता, साठवून ठेवणारी अनुकूलने विकसित झालेली दिसतात. • वाळवंटी वनस्पती झुडुपमय असतात व दुष्काळी परिस्थितीस अनुकूलित झालेल्या असतात. लहान आकाराची पाने व शुष्क परिस्थितीमध्ये पानझडी ही अनुकूलने बाष्पोत्सर्जनातून (Transpiration) मधून वाया जाणारे पाणी कमी करतात. वाळवंटी वनस्पतींची मुळे उत्तम विकसित झालेली असतात.


Un Convention On Desertification


➤ संयुक्त राष्ट्रसंघाचा वाळवंटीकरण प्रतिकार करार (UN Convention to combat Desertification/UNCCD)1977 मध्ये नैरोबी येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या वाळवंटीकरणावरील परिषदेत (United Nations Conference on Desertification) वाळवंटीकरण या विषयावर पहिल्यादांच जागतिक पातळीवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
➤वाळवंटीकरण ही एक मोठी प्रमुख जागतिक पर्यावरणीय समस्यांपैकी आहे.
➤वाळवंटीकरणामुळे अन्नउत्पादनात घट, नैसर्गिक संसाधनांमध्ये घट व पर्यावरणीय अवनती घडून त्याचा थेट विपरित परिणाम प्रभावित क्षेत्रांतील रहिवाशांच्या जीवनाच्या दर्जावर होतो.
UNCCD ची उद्दिष्ट्ये
  1. अन्न सुरक्षा वाढविणे व गरिबी हटविणे.
  2. शाश्वत विकास साधून सामाजिक-आर्थिक विकासात सुधारणा घडविणे.
  3. पर्यावरण संवर्धन व संरक्षण साधण्यासाठी दीर्घकालीन एकात्मिक अशा रणनितीस सुरुवात करणे. यामध्ये वनीकरण,जमिनीची वाढलेली उत्पादकता, जल संसाधनांचे आणि जमिनीचे संवर्धन व शाश्वत व्यवस्थापन इ. बाबींचा समावेश होतो
➤म्हणजेच हा करार पर्यावरण संवर्धन, कृषि उत्पादकता, शाश्वत ऊर्जा व चारा निर्मिती, स्थानिक समुदायांसाठी विकासात्मक काआणि अवनती झालेल्या जमिनीवर त्यांचे पुर्नवसन, त्याचबरोबर आरोग्य, साक्षरता आणि सामाजिक-सांस्कृतिक विकास, रोजगारसंधी यांसारख्या बाबींवर लक्ष देतो.
➤या कराराच्या सदस्य राष्ट्रांनी वाळवंटीकरणाविरोधी राष्ट्रीय कृती कार्यक्रम (NationalAction Planto Combat Desertification)आखणे आवश्यक आहे.
➤भारत 14 ऑक्टोबर 1994 पासून या कराराचा सदस्य आहे.
UNCCD अंतर्गत आशियासाठी प्रादेशिक कृती कार्यक्रम
  1. वाळवंटीकरण देखरेख व मूल्यमापन.
  2. शुष्क, निम-शुष्क व शुष्क उप-आर्द्र क्षेत्रांमध्ये कृषि-वनीकरण व्यवस्थापन व मृदा संवर्धन.
  3. शुष्क प्रदेशांमध्ये कुरणांचे व्यवस्थापन (सरकणाऱ्या Sand dunes वर विशेष लक्ष).
  4. शुष्क, निम-शुष्क व शुष्क उप-आर्द्र क्षेत्रांमध्ये कृषिसाठी जलसंसाधनांचे व्यवस्थापन.
  5. हवामान बदलाच्या संदर्भात दुष्काळ निवारण व व्यवस्थापन.
  6. दुष्काळ व्यवस्थापन व वाळवंटीकरण नियंत्रणासाठी नियोजन क्षमतांचे सबलीकरण.




Download MPSC Books pdf