MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक झाल्याने गोंधळ उडाला आहे
By Shubham Vyawahare
➤ MPSC Data leak :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अधिकृत संकेतस्थळ आज अचानक एका अज्ञात व्यक्तीने hack करत सर्व विध्यार्त्याची महत्वाची माहिती चोरली आहे . तसे पाहता पूर्व परीक्षेचा पेपर ६ दिवसावर असताना अश्या घटनांचा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर परिणाम पडला आहे.सकाळी अचानक MPSC 2023 A ह्या टेलेग्राम च्या चानल वरून अचानक एकानंतर एक जवळपास ९०००० प्रवेशपत्र (hall ticket) उपलोड केल्या गेल्याने एम पी एस सी आयोगाची वेबसाईट hack झाली कि काय अशी शंका अजूनही सर्वांच्या मनात आहे ? mpsc आयोगाद्वारे जानेवारी महिन्या मध्ये महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क ह्यासाठी परीक्षा घेण्याचे आयोगाने स्पष्ट केले होते.त्यानुसार सुमारे ८००० जागांची जाहिरात आयोगाने काढली होती .परीक्षेची सर्वच तयारी हि अगदिच अंतिम टप्यात असताना असा डाटा चोरी होणे हि एक वाईट घटना आहे.माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्याऱ्या व्यक्तीने जो दावा केला आहे तो खालील प्रमाणे :
- ओनलाईन पोर्टल लोगिन
- फी पावती
- उपलोड केलेली कागदपत्रे
- आधार कार्ड नंबर
- दूरध्वनी क्रमांक
- इमेल id
MPSC परीक्षार्थी कडून कोणत्याही परीक्षेचा अर्ज भरून घेताना त्या परीक्षार्थी ची वैयक्तिक माहिती जसे नाव जन्म दिनांक पत्ता मोबाईल क्रमांक रहिवासी पत्ता , ईमेल आयडी आधार कार्ड क्रमांक अश्या स्वरूपाचा अतंत्य महत्वाचा वैयक्तिक माहिती तसेच त्या परीक्षार्थी ची शैक्षणिक माहिती जसे की १०,१२, डिग्री चे मार्क तसेच काही परीक्षार्थी अनुभवी असल्यास त्याचा कामाचा अनुभव असा संपूर्ण डाटा असतो.जर का महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क २०२३ चा पेपर फुटला असेल तर आयोगाणे ह्याबाबत स्पष्ट करत ३० एप्रिल ला होणारा पेपर काही काळासाठी पुढे ढकलून ,नवीन नियोजनात परीक्षा घेतली पाहिजे.
आयोगाने स्पष्टीकरण देताना ह्या घटने बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. pic.twitter.com/UP9hnZgUGB
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 23, 2023
- अनेक मुलांचं हॉलतिकीट लीक झाल्यानंतर सर्व विद्यार्थी संभ्रमात होते की अश्या ३० एप्रिल ला होणारी परीक्षा ही होईल का नाही?...बऱ्याच telegram वर असे संदेश ही फिरत होते की परीक्षा पुढे ढकलला हवी ...
- सारासार गोष्टीचा विचार करत आयोगानं स्पष्ट केले की तांत्रिक बाबीची पडताळणी केली असता पेपर लीक झाला नसून परीक्षा आहे त्या तारखेला पूर्ण होईल
- MPSC ची अधिकृत सूचना येथे वाचता येईल MPSC Official Notification On Data leak
एमपीएससी ने MPSC data leak ह्या घटनेवर प्रतिक्रिया देताना खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत
➤ MPSC ने स्पष्टीकरण देताना सांगितले कि website वरील लोड कमी व्हावा म्हणून बाह्य लिंक उपलब्ध केली असता तीथुन data चोरला आहे
- दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिध्द होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर प्रसिध्द झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे.
- तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही विदा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही.
- आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
- प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुध्द सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
- प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाद्वारे उमेदवारांना आश्वस्त करण्यात येते की, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
- MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील -MPSC Official Notification On Data leak निवेदन प्रसिद्ध करत , MPSC आयोगाने स्पष्ट सांगितले आहे कि वरील घटनेचा परीक्षेवर काहीही परिणाम होणार नाही, तसेच परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ३० एप्रिल रोजीच होईल.
FAQ:MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
Read All MPSC blogs
➤ केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
➤ MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
➤ MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
➤ MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
➤ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Read More MPSC Blogs
MPSC Books pdf