https://www.dompsc.com



भारतातील राजकीय विचार आणि राजकीय पक्षामाघील विचारसरणी

भारतातील राजकीय विचार आणि राजकीय पक्षामाघील विचारसरणी

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

➤ भारताची राजकीय वाटचाल हि धर्मवादी लढाया मधून बाहेर निघत वसाहतवादाचे आव्हान पेलत समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवून लोकांना सुपूर्त करणार आहोत अस १३ डिसेंबर, १९४६ रोजी नेहरू नी भारतीय संसदेमध्ये स्पष्ट केले होते.
➤ स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांनी जगासमोर सर्वात पुरोगामी विचार ठेवला तो म्हणजे Neutralism(अलिप्ततावाद) . हा अलिप्ततावाद जगाला अस सांगतो कि आम्ही ना कुणाशी स्वतहून युद्ध करणार ना युद्धाला कुठलाही पाठींबा देणार.नेहरूंनी साम्राज्यवाद ,वसाहतवाद,विस्तारवादाला विरोध केला होता.पण आमच्या देशावर कुणी आक्रमण केले आम्ही प्रतिउत्तर देऊ असे त्यांनी सांगितले

भारतातील डावी आणि उजवी विचारसरणी


➤ मुळत: मानवाच्या डोक्यातील संरचनेमध्ये विचार करण्याचे दोन भाग असतात ज्यात मानव जेव्हा वैचारिक विचार करतो म्हणजे तर्कशुद्ध विचार,गणितीय विचार हे डाव्या बाजूस होतात तर उजव्या बाजूस सगळे क्रांतिकारी,धर्मादायी,कविता लिहिणे ,कला जोपासणे,मनाशी बांधील असलेले विचार असतात. ह्या संकल्पनेची सुरुवात फ्रांस च्या औद्योगिक विचारशैली मधून झाली.

डावी विचारसरणी


➤भारतातील डावी चळवळ हि धर्मनिरपेक्ष ,समाजवादी विचारांचा पाठपुरावा करणारी आहे ,ह्या विचारसरणी मध्ये कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस,आम आदमी पार्टी,समाजवादी पार्टी असे पक्ष आहेत

उजवी विचारसरणी


➤भारतातील उजवी विचारसरणी हि धर्म ,पंथ ,जात आणि प्रांतवाद मानणारी विचारशैली आहे यानुसार भारतात भारतीय जनता पार्टी ,शिवसेना ,रिपाई ,अकाली दल ,बजरंग दल ,राष्ट्रीय स्वयंक सेवक दल(RSS) असे संघटन आहे.

Communism(साम्यवादी विचारसरणी)

➤साम्यवाद म्हणजे सर्वांसाठी समानता.
➤साम्यवादी विचारसरणी हि कार्ल मार्क्स ,लेनिन ,माऊ या सारख्या नेत्याच्या प्रयत्नातून तयार झाली,प्रामुख्याने कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी अश्या विचाराचा उदय झाला.
➤भारतात Communist Party Of India (CPI) हि हे धोरण स्वीकारते.काही वर्ष्याआधी पश्चिम बंगाल मध्ये या पक्षाचे खूप वर्चस्व होते.

Capitalism(भांडवलशाही विचारसरणी)

➤भांडवलशाही विचारणा हि व्यायसायपूरक देशामार्फात झाली.
➤या व्यवस्थे मध्ये ज्या गटाकडे जास्त पैसे आहे त्या गटाला जास्त प्राधान्य असते.
➤सरकार वर राजकीय अंकुश प्रस्थपित करता येतो.
➤सर्व व्यवसायात भांडवलदार हा मुख्य असतो.
➤बाजार भाव हा निव्वळ विक्री खरेदी वर असतो.
➤आर्थिक धोरणामध्ये सरकारी हस्तक्षेप नसतो ,संपूर्ण खुली अर्थव्यवस्था असते

Socialism(समाजवादी)

➤सर्व समाजातील लोकांसाठी सामाजिक लोकोपयोगी विचार बाळगणारी चळवळ
➤समाजवादी विचारसरणी मध्ये सर्व जाती धर्म पंथाला समान मानणारी विचार प्रवृत्ती असते.
➤अश्या व्यवस्थेमध्ये सरकार काही लोकोपयोगी निर्णय घेऊ शकते जे व्यावहारिक द्र्यष्ट अउपयुक्त अस्तात जसे कि योजना,सवलत अश्या गोष्टीवर खर्च करणे
➤भारतात समाजवादी पार्टी या विचाराचे समर्थन करते

Feminism(स्त्रीवादी)

➤मुख्यत्वे स्त्रीला मुख्य मानून केलेली चळवळ
➤उदा. महाराष्ट्रातील शनीशिंगणापूर येथे झालेली चळवळ,तामिळनाडू मधील मंदिर प्रवेशा साठी झालेली चळवळ
➤लिंगभेद माणू नका मानणारी चळवळ पण कधी कधी फक्त स्त्रीत्वादी होऊन पुरुष्याला दुय्यम स्थान देणारी होते.
➤महिला सबलीकरणासाठी जास्त प्रयत्न असतो.

Federalism (संघराज्यवाद)

➤या विचारसरणी मध्ये काही प्रांतातील भाषा ,धर्म ,पंथ ,संकृती एकत्र येऊन एक राज्यातील वेगळ राज्य मानण्याचा प्रयत्न करतात.
➤भारतामध्ये दक्षिणात्य राज्ये ,पूर्वेकडील सात राज्य हे संघाराज्यावादाचे उदाहरण आहे



Secularism(धर्मनिरपेक्ष)

➤Secularism म्हणजे कोणताही धर्म ,जात ,पंथ हा श्रेष्ठ नसून सर्व मानव जनता समान आहे अस माननारी विचारसरणी आहे.
➤भारतीय संविधानाने हि विचारसरणी आत्मसाद करून कायदे मंडळ तयार केले आहे
➤भारतामध्ये कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस ,आम आदमी पार्टी हा विचार परिधान करते

Nationalism(राष्ट्रवाद)

➤Nationalism म्हणजे आपला देश आणि सर्व देशातील बांधवा साठी समान विचारसरणी ठेवणारा समूह.
➤धर्म ,प्रांत,भाषा,वेशभूषा यापेक्षा राष्ट्राला एक समजणारा समूह

Colonialism(वसाहतवाद)

➤हा १७ व्या शतकातील विचार आहे.
➤ब्रिटिशांच्या विश्व आत्मसाद करण्याच्या धोरणामध्ये या विचाराचा समावेश होता
➤भारता प्रमाणे अनेक देशात वसाहती बनवून राज्य प्रस्थापित केले
➤वसाहत वादाचा नवा विचार म्हणजे विस्तारवाद आहे जो आता चीन ने तिबेट गिळंकृत करून जगासमोर आणला.

Rationalism(बुद्धीप्रमाण्यावाद)

➤बुधीप्रामान्य वाद म्हणजे तर्कशुद्ध गोष्टी मानणारा वर्ग
➤ कोणत्याही घटनेस,गोष्टीस,विचारास परावृत्त न होता फक्त डोक्याला पटेल आणि गोष्टीतील तथ्य दोन्ही बाजूनी तर्कशुद्ध मांडून आत्मसाद करणारा विचार
➤साधारणतः वकील,लेखक,पत्रकार,सरकारी अधिकारी या विचाराचे असतात.

Provincialism(प्रांतवाद)

➤एखद्या राज्यामध्ये काही भागास कमी प्राधान्य मिळाले अथवा तो प्रांत कायम दुर्लक्षित आहे असे भासल्यास तेथील लोक या विचारसरणी ला आत्मसाद करतात आणि वेगळे प्रांत निर्माण करण्याची मागणी करतात.
➤ महाराष्ट्रामध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी,गुजरात मध्ये सौराष्ट्र,बंगालमध्ये गोरखलँड हे प्रांतवादाचे उदाहरण आहे

Humanism(मानवतावाद)

➤एखादा समूह ,एखादा धर्म ,एखादे प्रांत अश्या कोणत्याही मर्यादा न बाळगता सर्व मानवाचे कल्याण मानणारा हा विचार आहे
➤दुर्दैवाने भारतात असा कोणताही पक्ष नाही.

Liberalism(उदारमतवादी)

➤हा विचार कुठल्याही स्थरावर भेदभाव करत नाही मग त्यात काळे-गोरे असा वर्णवाद,उच्च-नीच ,गरीब -श्रीमंत ,ताकदवान-कुपोषित,स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव जुमानत नाही
➤भारतातील अध्यात्मिक परंपरेने हा विचार संपूर्ण जगाला देण्याचे कार्य केले

Racism(वर्णवाद)

➤अमेरिकेमध्ये सुरुवातीपासून वर्णवाद आहे तेथील लोक काळ्या लोकांना तुच्छ समजतात.
➤अनेक विकसित देशाच्या समूहामध्ये हा विचार पसरलेला असतो

Fascism

➤Fascist म्हणजे धर्म हेच श्रेष्ठ मानणारा
➤Fascism म्हणजे धर्मसत्ता विरोधात आंदोलन करून धर्मातील कठोर अन्यायकारी विचारांचा विरोध करणारा गट
➤युरोपीय देशामध्ये हा विचार जास्त पसरलेला होता

Naxalism(नक्षलवाद)

➤पश्चिम बंगाल मधील नक्षलबारी जिल्ह्यातून या चळवळीचा उदय झाला
➤सध्यस्थिती मध्ये संपूर्ण पूर्व भारतात ह्या चळवळीचे विचार क्षेत्र आहे.
➤मुळात जमीनदार सरकारी यंत्रणा यातून होणारया अन्यायकारक त्रासा विरुद्ध हि चळवळ असते
➤ह्या चळवळीतील समूह कोणतेही सरकारी बांधिलकी जुमानत नाही

Terrorism (आतंकवाद)

➤आतंकवाद म्हणजे एखद्या देशात अवैध रित्या घुसखोरी करून तेथील समाजव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणे.
➤भारताप्रमाणे अनेक देशांना ह्या विचाराचा त्रास आहे
➤आतंकवाद हि जागतिक समस्या आहे

Atheism(नास्तिकता)

➤देवतांच्या अस्तित्वावर अविश्वास ठेवणे
➤ देव न मानणारा समाज
➤निरीश्वरवाद हा सहसा कोणत्याही आदर्श किंवा मूल्यांच्या कमतरतेचा अर्थ म्हणून घेतला जातो

Communalism(जातीयवाद)

➤एखाद्याच जातीचा फायदा विचारात घेणारे विचारात घेणारे विचार
➤ महाराष्ट्रात मराठा समाज फक्त मराठा समाजाला आरक्षण मागून जातीयवाद निर्माण करते

Nepotism(वंशवाद)

➤राज्याचाच मुलगा राजा बनू शकतो अस मानणारा समाज
➤ जगामध्ये सर्व क्षेत्रात वंशवाद आहे


➤या सर्व विचारसरणीमध्ये माणूस हा कोणत्या तरी वेचारिक भेदभावाला उच्च समजून अप्रत्यक्षपणे एखाद्या मता संबंधित परावृत्त होऊन आपली विचारसरणी त्या पद्धतीची आहे असे समजून एका विशिष्ट विचारामध्ये संपूर्ण आयुष्य उद्वस्त करतो.
➤याउपर एखाद्याला आदर्शवादी मनुष्य व्हायचे असल्यास त्याने कोणत्याही इसम (ism) ला बळी न पडता वेळेप्रसंगी कोणाचेही नुकसान होणार नाही ह्याची पूर्तता करून वैचारिक धोरण अखायला हवे ,नाहीतर तो एकाच प्रकारच्या वैचारिक बंदिशाळे मध्ये आयुष्य संपवून टाकेल.

Download भारतातील राजकीय विचार आणि राजकीय पक्षामाघील विचारसरणी In PDF

➤ वरील सर्व माहिती हि MPSC च्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्व स्तरावर उपयोगी पडणारी आहे