https://www.dompsc.com



राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य|MPSC Polity Notes

राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य|MPSC Polity Notes

राष्ट्रपती बद्दल माहिती

<
Author

By Shubham Vyawahare

17-December-2024

➤राष्ट्रपती हा भारतीय संघराज्यीय पद्धती नुसार मुख्य कार्यकारी प्रमुख असतो.
➤संपूर्ण देशातील सर्वच कामे फक्त राष्ट्रपती च्या नावाने होत असतात.
➤हि सर्व कार्य पंतप्रधान जरी सांभाळत असला तरी तो अंतिम सही साठी राष्ट्रपती वर अवलंबून असतो.
➤ भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मधील कलम ५२ ते ६२ मध्ये राष्ट्रपती बद्द्द्ल सर्व तरतुदी दिलेल्या आहेत.
➤ राष्ट्रपती सर्व संरक्षक दलाचे प्रमुख म्हणून काम बघत असतात.

राष्ट्रपती ला कोण निवडून देते?

➤ कलम ५४ नुसार, राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचकगणाकडून (Electoral College) होते,त्यामध्ये पुढील सदस्य असतात

  • संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य
  • राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य.
  • दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य. (ही तरतूद घटनेच्या ७० व्या दुरूस्तीने (१९९२) समाविष्ट करण्यात आली.)



राष्ट्रपती पदाच्या पात्रता कोणत्या असतात?

➤ कलम ५८ नुसार, राष्ट्रपती पदासाठी पात्र ठरण्यासाठी व्यक्तीने पुढील अर्हता धारण केल्या पाहिजे:

  • तो भारतीय नागरिक असावा.
  • त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी.
  • तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
  • तो भारत सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा कोणताही स्थानिक प्रधिकारी किंवा इतर कोणताही सार्वजनिक प्राधिकारी, यांच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा

राष्ट्रपती वर महाभियोग कसा लावतात?

➤कलम ६१ मध्ये राष्ट्रपतींवर महाभियोग लावून त्यांना पदमुक्त करण्याची पद्धत दिलेली आहे

➤ महाभियोग केवळ 'घटना भंग या एकाच कारणावरून लावता येतो

  • राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्यासाठी घटनाभंगाचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येऊ शकतो.
  • राष्ट्रपतीवरील दोषारोपाचा प्रस्ताव ठरावाच्या स्वरूपात मांडावा लागतो.
  • असा ठराव मांडण्यापूर्वी पुढील अट पूर्ण करावी लागते: ठराव मांडण्याचा हेतू दर्शविणारी त्या सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या किमान १/४ सदस्यांनी स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस किमान १४ दिवस आधी सभागृहात मांडावी लागते.
  • त्यानंतर दोषारोपाचा प्रस्ताव असलेला ठराव त्या सभागृहामध्ये एकूण सदस्यसंख्येच्या २/३ बहुमताने पारित होणे गरजेचे असते

Powers and Functions of the President-राष्ट्रपती चे अधिकार आणि कार्य कोणते असतात?

राष्ट्रपतीचे अधिकार व त्यांची कार्ये

  • कार्यकारी अधिकार
  • कायदेविषयक अधिकार
  • वित्तीय अधिकार
  • न्यायीक अधिकार
  • परराष्ट्र विषयक अधिकार
  • लष्करी अधिकार
  • आणीबाणीविषयक अधिकार

राष्ट्रपती संबंधित कलमे आणि प्रावधान

कलम w विषय
कलम ५२ भारताचा राष्ट्रपती
कलम ५३ संघराज्याचे कार्यकारी अधिकार
कलम ५४ राष्ट्रपतीची निवडणूक
कलम ५५ राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत
कलम ५६ राष्ट्रपतीचा कार्यकाल
कलम ५७ पुनर्निवडीसाठी पात्रता
कलम ५८ राष्ट्रपतिपदी निवड होण्यासाठी आवश्यक पात्रता
कलम ५९ राष्ट्रपतिपदाच्या अटी
कलम ६० राष्ट्रपतीची शपथ किंवा वचनबद्धता
कलम ६१ राष्ट्रपतीच्या महाभियोगाची प्रक्रिया
कलम ६२ राष्ट्रपतिपद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्यासाठी कालावधी
कलम ६५ उपराष्ट्रपतीने प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणे किंवा राष्ट्रपतीची कार्ये करणे
कलम ७१ राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी बाबी
कलम ७२ राष्ट्रपतीचा क्षमा करण्याचा किंवा काही बाबतीत शिक्षेमध्ये स्थगिती, सवलत किंवा पर्यायी शिक्षा देण्याचा अधिकार
कलम ७४ राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी व साहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ
कलम ७५ मंत्र्यांसंबंधी इतर तस्तुदी . जसे- नियुक्ती, कार्यकाल, वेतन इत्यादी.
कलम ७६ भारताचा महान्यायवादी
कलम ७७ भारत सरकारचे कामकाज चालविणे
कलम ७८ राष्ट्रपतीला माहिती देण्याबाबत व इतर बाबतीत पंतप्रधानांचे कर्तव्य
कलम ८५ संसदेची अधिवेशने, तहकुबी व विसर्जन
कलम १११ संसदेने संमत केलेल्या विधेयकांना मान्यता
कलम ११२ केंद्रीय अर्थसंकल्प (वार्षिक आर्थिक पत्रक)
कलम १२३ अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
कलम १४३ सर्वोच्च न्यायालयाशी विचारविनिमय करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार

Download राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य|MPSC Polity Notes In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.






Download MPSC Books pdf