https://www.dompsc.com



भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व|MPSC Polity Notes

भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व|MPSC Polity Notes

भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व आणि त्याचे अधिकार?

Author

By Shubham Vyawahare

17-December-2024

➤ नागरिक म्हणजे त्या संस्थेचा मूळ सदस्य असतो.
➤ सदस्य या नात्याने त्याला काही मूळ अधिकार दिले जातात,या अधिकाराचा वापर करून त्याला काही सवलती प्राप्त होतात.

➤आरबीआयखालील अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांना भारतात मिळतात,ते परीकायाना मिळत नाहीत.

  • कलम १५:भेदभाव विरोधी हक्क
  • कलम १६:सार्वजनिक नोकऱ्यांच्या बाबतीत समान संधीचा हक्क
  • कलम १९: भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र येणे, संघटना स्थापन करणे, संचार करणे, वास्तव्य करणे आणि व्यवसाय करणे यांचे स्वातंत्र्य
  • कलम २९ व कलम ३०: सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क

➤भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 मधील कलम 5 ते कलम ११ हे नागरिकत्व अधिकारा बद्दल आहेत.



भारतीय राज्यघटनेतील कलम 5 ते कलम 11 मधील नागरिकत्व अधिकार कोणते ?


कलम ५: घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व (अधिवासाच्या आधारावर):- घटनेच्या प्रारंभी, भारताच्या राज्यक्षेत्रात अधिवास असलेली प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल.
कलम ६: पाकिस्तानातून स्थलांतरितांचे नागरिकत्व:- पाकिस्तानातून भारतात स्थलांतर करून आलेला व्यक्ती घटनेच्या प्रारंभी भारताचा नागरिक असल्याचे मानले जाईल
कलम 7 :पाकिस्तानात गेलेल्यांचे नागरिकत्व.
कलम ८ :मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व (PIO चे नागरिकत्व):- जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजा-आजींपैकी कोणीही एक भारतात जन्मले होते आणि जी भारताबाहेरील कोणत्याही देशात सामान्यत: निवास करत आहे, अशी कोणतीही व्यक्ती भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल
कलम ९: कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर, ती व्यक्ती भारताची की नागरिक असणार नाही.
कलम १०: भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील
कलम ११: संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि विषयक अन्य सर्व बाबींसंबंधी कायद्याने तरतूद केले करण्याचा अधिकार असेल.

नागरिकत्व संपादनाचे मार्ग कोणते आहेत?


➤ भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ मध्ये नागरिकत्व संपादनाचे मार्ग दिलेले आहेत.
ह्यात जवळपास 9 वेळेस बदल करण्यात आले
  • नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, १९५७.
  • रद्द करणे आणि दुरुस्ती अधिनियम, १९६०.
  • नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, १९८५.
  • नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, १९८६.
  • नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, १९९२.
  • नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, २००३.
  • नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, २००५.
  • नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, २०१५.
  • नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम, २०१९ (CAA Act 2019).

नागरिकत्व संपादनाचे मार्ग

  1. जन्म तत्वाद्वारे (By Birth)
  2. वंश तत्वाद्वारे (By Descent)
  3. नोंदणी तत्वाद्वारे (By Registration)
  4. स्वीकृती तत्वाद्वारे (By Naturalisation)

नागरिकत्व सोडण्याचे मार्ग कोणते आहेत?


  1. नागरिकत्वाचा त्याग करणे (By Renunciation)
  2. नागरिकत्व संपुष्टात येणे (By Termination)
  3. नागरिकत्व काढून घेणे (By Deprivation)

NRI आणि OCI नागरिकत्व म्हणजे काय?


अनिवासी भारतीय (Non-Resident Indian: NRI)असा भारतीय नागरिक ज्याचे सामान्यतः भारताच्या बाहेर वास्तव्य आहे व जो भारतीय पासपोर्ट धारण करतो.

भारताचा परकीय नागरिक(OCI:Overseas Citizen of India):काही अट मान्य करून नागरिकत्व कायदा १९५५ अन्वये सेक्टीओन 7अ खाली त्याला नागरिकत्व मिळते.


Download भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व|MPSC Polity Notes In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.






Download MPSC Books pdf