https://www.dompsc.com


भारतीय घटनेचे स्त्रोत(Sources of Our Indian Constitution)-MPSC Polity Notes

भारतीय घटनेचे स्त्रोत(Sources of Our Indian Constitution)-MPSC Polity Notes
Author

By Shubham Vyawahare

17-December-2024

➤भार्तींय राज्यघटनेच्या बाबतील सदेव एक टीका असते कि भारतीय राज्य घटना हि ठिगळाची राज्यघटना आहे.

➤याचे मुख्य कारण भारतीय राज्यघटने मध्ये अनेक देशाचा अभ्यास करून त्यांच्यातील बऱ्याच चांगल्या गोष्टी घेण्यात आल्या आहेत.


भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत कोणती आहेत?

➤भारतीय राज्यघटना आणि त्याची मूळ स्थाने
समिती अध्यक्ष
भारतीय शासन कायदा, १९३५: संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोक सेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील.
ब्रिटिश घटना: संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट-पास्ट-पोस्ट-सिस्टिम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार.
युएसए ची घटना: मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत.
कॅनडाची घटना: भारताची राज्यघटना व प्रशासन प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र,
आयरिश घटना: राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन,
ऑस्ट्रेलियाची घटनाः समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य.
फ्रान्सची घटना: गणराज्य, प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श.
दक्षिण आफ्रिकेची घटना: घटनादुरूस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
सोव्हिएत रशियाची घटना मूलभूत कर्तव्ये, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श.
जपानची घटना: कायद्याने प्रस्थापित पद्धत.
जर्मनीची घटना आणीबाणीदरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे.

Download भारतीय घटनेचे स्त्रोत(Sources of Our Indian Constitution) In PDF

➤ भारताच्या राज्यघटनेमधील प्रास्तविका हा राज्य्घटनेचा महत्वपूर्ण भाग आहे ,हाच राज्यघटनेचा सार आहे






Download MPSC Books pdf