https://www.dompsc.com



List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)|MPSC Polity Notes

List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)|MPSC Polity Notes

भारतीय राज्यघटनेतील Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)

Author

By Shubham Vyawahare

26-December-2024

➤समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणे घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे, पाडणेही अपेक्षित असते
➤ लोकशाहीत लोकांनी केवळ हक्कांचीच मागणी करू नये, तर कर्तव्यांप्रती त्यांनी दक्ष असावे
➤भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला
१९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरूस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली
➤८६ व्या घटनादुरूस्तीने ११ वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले.
➤भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली
➤ जपान च्या राज्यघटनेत मुलभूत कर्तव्य आहेत.

Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य) साठीची स्वर्ण सिंग समिती ने काय सांगितले?

➤ स्वर्ण सिंग समिती ने सुचवलेल्या मुख्य तरतुदी

  • १० मूलभूत कर्तव्यांपैकी केवळ आठच कर्तव्यांची शिफारस स्वर्ण सिंह समितीने केली होती
  • काँग्रेस सरकारने ही शिफारस स्विकारून ४२ व्या घटनादुरूस्ती (१९७६) अन्वये घटनेत भाग IVA समाविष्ट करण्यात आला
  • कलम ५१ A टाकण्यात आले



List of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)

क्रमांक मुलभूत कर्तव्य
1 घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे,
2 ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे,
3 भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे,
4 देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे
5 धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे
6 आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे
7 वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे,
8 )विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे,
9 सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक समिती स्थापन केली. या समितीने मूलभूत कर्तव्यांचे एक त्याग करणे
10 राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे,
11 जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या पाल्यास सहा ते चौदा वर्ष पर्यंत शिक्षण देणे(८६ व्या घटनादुरुस्ती ने)

Download List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)|MPSC Polity Notes In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.






Download MPSC Books pdf