https://www.dompsc.com



Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) and all about article 368|MPSC Polity Notes

Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) and all about article 368|MPSC Polity Notes

Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) म्हणजे काय ?

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

➤राजकीय परिस्थिती नुसार काही वेळेस जुन्या नियमांना आणि कायद्यांना नवीन आवश्यकते नुसार आकार देने महत्वाचे असते अश्या वेळेस त्या कायद्याला अद्यावत केले जाते या सर्व प्रक्रियेला Amendment(घटनादुरुस्ती) असे म्हणतात.
➤ भारतीय घटनेमध्ये भाग २० मध्ये कलम ३६८ हे घटनादुरुस्ती संबंधित आहे.
➤भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला
➤ घटनेने दिलेल्या अधिकारांनुसार संसद घटनेतील तरतुदींमध्ये नव्याने समावेश करून, बदल करून किंवा रद्द करून यासाठी ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार घटनादुरुस्ती करू शकते.
➤ मात्र, घटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदींमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये (१९७३) सर्वोच्च न्यायालयाने वरील आशयाचा निर्णय दिला आहे

Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) करण्याची प्रक्रिया कोणती आहे ?

➤ कलम ३६८ नुसार

  • घटनादुरुस्तीसाठी संसदेच्या कोणत्याही गृहात विधेयक सादर करून ही प्रक्रिया सुरू करता येते
  • राज्य विधिमंडळात असे विधेयक सादर करता येत नाही.
  • विधेयक मंत्री किंवा इतर सदस्य सादर करू शकतात, त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही.
  • हे विधेयक प्रत्येक गृहाने विशेष बहुमताने संमत केले पाहिजे; म्हणजे, गृहातील एकूण सदस्यसंख्येच्या ते संमत व्हावयास हवे. बहुमताने (५० टक्क्यांपेक्षा अधिक मते) आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन-तृतीयांश बहुमताने
  • प्रत्येक गृहाने स्वतंत्ररीत्या विधेयक संमत केले पाहिजे. दोन्ही गृहांमध्ये मतभेद झाल्यास विधेयकावर चर्चा करून ते संमत करण्यासाठी दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद नाही.
  • जर विधेयकाने संघराज्यासंबंधित तरतुदीमध्ये दुरुस्ती होणार असेल तर अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी साध्या बहुमताने त्याला मान्यता दिली पाहिजे. साध्या बहुमताने म्हणजे उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने.
  • संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केल्यावर आणि आवश्यक तेथे राज्य विधिमंडळांनी संमती दिल्यावर विधेयक राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी सादर केले जाते
  • राष्ट्रपतीने घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तो मान्यता राखून ठेवू शकत नाही, तसेच पुनर्विचारासाठी संसदेकडे परतही पाठवू शकत नाही
  • राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते आणि त्या कायद्यानुसार घटनेत दुरुस्ती केली जाते.



Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) चे प्रकार कोणते आहेत?

➤ कलम ३६८ मध्ये दोन प्रकारच्या दुरुस्त्या सांगितल्या आहेत. एक, संसदेच्या विशेष बहुमताने आणि दोन,संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधिमंडळांच्या साध्या बहुमताने

  • संसदेच्या साध्या बहुमताने.
  • संसदेच्या विशेष बहुमताने.
  • संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांच्या संमतीने.

What Is Article 368 And List Of All Amendment(घटनादुरुस्ती)

Read All Amendment

Download Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) and all about article 368|MPSC Polity Notes In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.






Download MPSC Books pdf