https://www.dompsc.com



Directive Principles of State(राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे)|MPSC Polity Notes

Directive Principles of State(राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे)|MPSC Polity Notes

राष्ट्रपती बद्दल माहिती

Author

By Shubham Vyawahare

26-December-2024

➤मार्गदर्शक तत्त्वे भाग 4 कलम ३८ ते कलम ५१ मध्ये दिलेली आहेत.
➤संकल्पना आयर्लंडच्या १९३७ मधील राज्यघटनेपासून घेतली
➤आयर्लंडने ही संकल्पना स्पेनच्या राज्यघटनेतून घेतली होती
➤ धोरणे आखताना आणि कायदे करताना राज्याने विचारात घ्यावयाचे आदर्श राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांतून व्यक्त होतात
➤ कायदेशीर, कार्यकारी आणि प्रशासकीय बाबींसंबंधी राज्यांना दिलेल्या या घटनात्मक सूचना किंवा केलेल्या शिफारशी आहेत.
➤ मार्गदर्शक तत्त्वांसाठी न्यायालयीन उपाययोजना नाही
➤ कायद्याची घटनात्मक वैधता ठरविण्यासाठी न्यायालयांना याची मदत होते

➤ आशयानुसार आणि त्यातील निर्देशानुसार त्यांचे मुख्यत तीन भागांत पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.
  • सामाजिक
  • गांधीवादी
  • उदारमतवादी-बुद्धिवादी

List Of Directive Principles of State(राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे) From Constitution Of India



कलम विषय
कलम ३६ 'राज्य' या शब्दाची व्याख्या.
कलम ३७ या भागात समाविष्ट असलेली तत्त्वे लागू करणे,
कलम ३८ लोककल्याणाला चालना देण्यासाठी राज्य समाजव्यवस्था सुनिश्चित करेल.
कलम ३९ राज्यांनी अनुसरण करावयाची धोरणविषयक काही तत्त्वे.
कलम ३९ अ समान न्याय आणि नि:शुल्क कायदे साहाय्य.
कलम ४० ग्रामपंचायती संघटित करणे.
कलम ४१ काम, शिक्षण आणि काही बाबतीत सार्वजनिक साहाय्याचा हक्क.
कलम ४२ कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय्य आणि सहृदयी व्यवस्था,
कलम ४३ कामगारांसाठी उपजीविका-वेतन इत्यादी.
कलम ४३ अ औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग.
कलम ४३ ब सहकारी संस्थांना चालना देणे,
कलम ४४ नागरिकांसाठी समान नागरी कायदा.
कलम ४५ ६ वर्षांखालील बालकांसाठी बाल संगोपन आणि शिक्षण यांची व्यवस्था.
कलम ४६ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांना चालना देणे.
कलम ४७ सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि जीवनाचा स्तर उंचाविण्यासाठी पोषणाचा स्तर वाढविण्याचे राज्याचे कर्तव्य.
कलम ४८ कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन.
कलम ४८ ए पर्यावरणामध्ये सुधारणा व संरक्षण आणि वने व वन्यजीवन यांचे संरक्षण.
कलम ४९ राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण.
कलम ५० कार्यकारी विभागापासून न्यायव्यवस्था विभक्त करणे.
कलम ५१ आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना चालना देणे,

Download Directive Principles of State(राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे)|MPSC Polity Notes In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.






Download MPSC Books pdf