How to Write essay for MPSC Mains in Marathi and English
Table Of Contain
निबंध आणि निबंध प्रकार
By Shubham Vyawahare
17-December-2024
➤निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख
➤थोडक्यात एखाद्या गोष्टीची भरमसाट माहिती निबंध होउ शकत नाही.
➤निबंध हा शिस्तबद्ध ,दिलेल्या मुद्याला अनुसरून,नियमात ,थोडक्यात लिहिलेला असावा.
➤निबंधाचे मुल्यांकन निबंधाची सुरुवात ,अंतर्गत संबंध आणि शेवटावर अवलंबून असते.
निबंधाचे प्रकार
- ऐतिहासिक निबंध
- भावनिक निबंध
- वैचारिक निबंध
- अध्यात्मिक निबंध
- वैज्ञानिक निबंध
- सामाजिक निबंध
- राजकीय निबंध
निबंध कसा लिहावा
निबंधाची सुरुवात कशी करावी
➤ निबंधाची सुरुवात नेहमी एखाधी घटना,एखाद्या कवीचे वाक्य ,एखादी म्हण ,एखादा इतिहासक दाखला देऊन विषयाला जोडता येईल अश्या स्वरुपात असावी.
➤ सतत येणाऱ्या विषयाचे आकलन करून किंवा माघील वर्ष्याच्या प्रश्नपत्रीकेमधील विषय अभ्यासून त्या विषयाबद्दल कवींच्या एखाद्या कवितेतील ओळी ,लेखकाचं एखादं वाक्य अश्या गोष्टीची माहिती करून घ्यावी.
➤ पहिला परिच्छेद वेगळ्या विषयाने सुरु झाला तरी दुसरा परिच्छेद लिहिताना विषय भरकटनार नाही याची काळजी असावी.
➤ साधारणत: ४०० शब्दाचा निबंध अपेक्षित असल्याने सुरुवात नेहमी 5-10% शब्दात असावी म्हणजेच जास्तीत जास्त ३०-४० शब्द.
➤ सुरुवात जास्त मोठी असू नये विषयाला लवकर हात घातला पाहिजे.
➤सुरुवात संपताना दुसऱ्या मजकुरात काय लिहिणार आहोत याचा सबंध असावा.
परिच्छेदातील मांडणी कशी असावी
➤साधारणत संपूर्ण निबंध हा जास्तीत जास्त ५-६ परिच्छेदातील असावा.
➤कोणत्याही परिच्छेदामध्ये विषय भरकटनार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी
➤कोणत्याही परिच्छेदामध्ये अंतर्गत सबंध(Internal Linking) असावी.
➤ वाचकाला समजायला हवे कि पुढील परिच्छेदामध्ये लिहिणार काय लिहिणार आहे.
➤जर आकडेवारी गरजेची असल्यास काही जागी मांडायला हरकत नाही पण ती चुकीची नसावी
➤एखद्या कवितेच्या ओळी आठवत आहेत पण कवीच नाव माहिती नसल्यास चुकीच नाव देऊ नये.
निबंधाचा शेवट कसा असावा
➤निबंधाचा शेवट नेहमी आशावादी असावा
➤शेवट कधीही प्रश्नार्थी स्वरुपात ठेऊ नये
➤निबंधाचा संपूर्ण आशय ,लेखकाला काही सुचवायचे असल्यास टी सूचना,एखादी माहिती अश्या गोष्टीन शेवट करावा
निबंध लिहिताना महत्वाच्या सूचना
- लिखाण सूटसुटीत असाव
- ४०० शब्दाची मर्यादा पाळावी
- महत्वाच्या वाक्याखाली Underline करावी
- साधारण सुरुवातीच्या ४५ मिनिटामध्ये पहिला निबंध लिहिता यायला हवा.
MPSC Essay Topics List
- समान नागरी कायदा काळाची गरज आहे का ?
- मला माणसाला शोधायचे आहे
- जगाचा पोशिंदा (शेतकरी) आत्महत्येच्या विळख्यात
- मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय
- मराठी भाषेची : कथा आणि व्यथा
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम
- राष्ट्रपती पदाची निवडणूक व जातीय समीकरण
- स्त्रीभ्रूणहत्या -एक सामाजिक समस्या
- शेतकऱ्याचे मनोगत
- भाषेचे व्याकरण म्हणजेच भाषेचे चरित्र
- प्रजासत्ताक व्यवस्था किती वास्तव किती आभासी
MPSC Essay Quotes
लेखक | प्रसिद्ध वाक्य |
---|---|
Mahatma Gandhi |
|
Dr B R Ambedkar |
|
Amartya Sen |
|
Rabindranath Tagore. |
|
Download How to Write essay for MPSC Mains in Marathi and English In PDF
➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.
MPSC Mains Descriptive Book-List
Others Blogs Related to MPSC Rajyseva Mains
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf