https://www.dompsc.com



राजर्षी शाहू महाराज जीवन आणि कार्य

राजर्षी शाहू महाराज जीवन आणि कार्य

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

➤आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांचे नाव विशेष उल्लेखनीय ठरते.
➤राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात भरीव स्वरूपाच्या सुधारणा करून लोककल्याण करण्याचा प्रयत्न केला.
➤ बहुजन समाजाची पारंपरिक बंधनातून सुटका करणे, त्यांना सुशिक्षित बनविणे, त्यांच्यात जागृती घडवून आणणे आणि त्याना प्रगत बनविण्यासाठी प्रयत्न करणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले
➤ कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार पाहण्यासाठी दत्तक घेण्याची आवश्यकता निर्माण झाली.
➤ चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी घाटगे घराण्यातील जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांचे पुत्र यशवंतराव यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले.
➤ दत्तक घेतल्यानंतर यशवंतरावांचे नाव शाह छत्रपती असे ठेवण्यात आले, हेच राजर्षी शाहू महाराज होत

राजर्षी शाहू महाराज यांची वैयक्तिक माहिती


मुद्दा माहिती
मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे
जन्म २६ जून १८७४
स्थळ कागल कोल्हापूर
शिक्षण इ.स. १८८५ मध्ये महाराजांना राजकोट येथील राजकुमार कॉलेजात पाठविण्यात आले
प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती -

राजर्षी शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण

➤राजर्षी शाहू महाराज धार्मिक प्रवृत्तीचे होते. ते नियमित पूजा-अर्चा करीत असत
➤दररोज पंचगंगा नदीवर जात असत. पूर्वापार प्रथेप्रमाणे महाराज ऑक्टोबर १८९९ मध्ये कार्तिक महिन्यात पंचगंगा नदीवर स्नानास गेले.
➤नारायण भटजी हे स्वतः स्नान न करताच वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र उच्चारत होते
➤ महाराजांनी त्यांना जाब विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिले, “शूद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात. वैदिक मंत्र म्हणते वेळीच स्नानाची आवश्यकता असते; परंतु या शूद्रांना पुराणोक्त पद्धतीचा अनुग्रह करावयाचा असल्याने मला स्नानाची आवश्यकता नाही.
➤या वरून महाराजांनी कुर्तकोटी यांना पुरोहित केले
➤मराठा पुरोहित तयार करण्याचे विद्यापीठ काढले

राजर्षी शाहू महाराज यांची लोकोपयोगी कामे

➤राजर्षी शाहू महाराज यांनी सत्यशोधक समाजाच्या शाखा कोल्हपुर मध्ये स्थापन केल्या
➤आर्य समाजाची स्थापना
➤ कुलकर्णी वतने नष्ट करून तलाठी पद निर्मिती केली
➤विविध कलांना राजाश्रय दिला
➤गुळाची बाजारपेठ कोल्हापुरात स्थापन केली
➤जाती तील मुलांसाठी होस्टेल बांधली , मराठा होस्टेल ,दलित होस्टेल

राजर्षी शाहू महाराज आणि अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूर

➤वि.रा.शिंदे यांनी सरकार ला सांगितले होते कि दलितांचे प्रतिनिधी विधिमंडळ सभासदांनी निवडावे न कि संस्थांनी.
➤या वर आंबेडकर यांनी दलितांसाठी हि सभा घेतली ह्यात शाहू महाराजांनी पाठींबा दिला



राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन दर्शन

➤जन्म - २६ जून १८७४. कागल (कोल्हापूर) १७ मार्च १८८४ राज्यारोहण
➤१८८५ ते १८८९ कॉलेजमध्ये प्रशिक्षण राजकोट येथील राजकुमार
➤ १८९७ - दुष्काळी कामे - शेतक-यांना स्वस्तात कर्ज व धान्य पुरवठा-महारोग्यासाठी उचगाव येथे आश्रम,
➤ १९०१ व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, दिगंबर जैन बोर्डिंग नंतर १९२१ पर्यंत २० वसतिगृह.
➤२६ जुलै १९०२ - मागासवर्गीयांना नोकरीत - ५०% जागा राखीव ठेवण्याची घोषणा.
➤१९१६ - प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत.
➤१९१७ - पुनर्विवाहाचा कायदा.
➤१९१८ - कुलकर्णी वतने बंद, तलाठी पद्धत
➤१९१८ - बलुते पद्धत बंद..
➤१९१८ - महार वतने बंद
➤६ मे १९२२ - पन्हाळा लॉज, मुंबई येथे मृत्यू.

Download राजर्षी शाहू महाराज जीवन आणि कार्य In PDF

➤ वरील सर्व माहिती हि MPSC च्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्व स्तरावर उपयोगी पडणारी आहे






Download MPSC Books pdf