https://www.dompsc.com



महर्षी कर्वे जीवन आणि कार्य

महर्षी कर्वे जीवन आणि कार्य

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

➤ महर्षी धोंडो केशव कर्वे (केसोपंत) यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या खेडेगावात झाला.
➤ हे गाव मुरूडपासून १५ मैलावर आहे. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती.
➤ मुंबई येथे रॉबर्ट मन हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले

महर्षी कर्वे यांची वैयक्तिक माहिती


मुद्दा माहिती
जन्म १८ एप्रिल १८५८
स्थळ चिखली
शिक्षण BA
प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती -

महर्षी कर्वे यांची विवाह्त्तेजक संस्था

➤ 31 डिसेंबर १८९३ रोजी वर्धा येथे विधवा विवाहोतेजक मंडळी चिस स्थापना केली
➤विधवा विवाह करण्याचा उद्देश
➤त्यांनी स्वता पहिला विवाह विधवेशी केला

महर्षी कर्वे यांचे अनाथ बालिका आश्रम

➤महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहाची चळवळ सुरू केली; परंतु या चळवळीस यश मिळाले नाही.
➤त्यामुळे विधवांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यांनी १४ जून १८९६ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेत रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली
➤ या संस्थेचे चिटणीस महर्षी कर्वे व अध्यक्ष डॉ. आर. जी. भांडारकर होते.
➤प्लेगच्या साथीच्या वेळी ही संस्था हिंगणे येथे स्थलांतरित केली होती
➤अनाथ बालिका आश्रम ची उदिष्टे

  • विधवा स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी करणे.
  • विधवांच्या विचारात आणि मनोवृत्तीत बदल करणे
  • विधवांची दुःखे हलकी करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • आपले जीवन निरर्थक नसून एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे हा विचार विधवा स्त्रियांमध्ये दृढ करणे.
  • विधवांना मदत करणे व त्यांच्या शिक्षणाची सोय करणे.

➤ इ.स. १९०४ साली आश्रमातील विद्यार्थिनींची संख्या ४० झाली. या आश्रमात मुलगी, आई व आजीसुद्धा असत

महर्षी कर्वे यांचे विद्यापीठ व ठाकरसी वाद

➤महर्षी कर्वे हे इ.स. १९३२ मध्ये आफ्रिकेवरून परत आले. त्यावेळी त्यांच्यापुढे विद्यापीठ देणग्या मिळविल्या नाहीत. त्यामुळे वार्षिक व्याज देणे शक्य नाही.
➤हा वाद न्यायालयात गेला.व ठाकरसी ट्रस्ट वाद हे संकट उभारले.
➤ठाकरसी ट्रस्टीच्या मते विद्यापीठाने १५ लाख रुपयांच्या या काळात धों. के. कर्वेनी विद्यापीठ व्यवस्थितपणे चालविले
➤शेवटी न्यायालयात तडजोड झाली व विद्यापीठाचे कार्यालय पुणे येथून मुंबईला हलविण्यात आले.
➤येथूनच पुढे महिला विद्यापीठाचा हिंगणे येथील संस्थाशी संबंध तुटला गेला.



महर्षी कर्वे यांचे समता संघ

➤कर्वे यांनी २१ एप्रिल १९४४ मध्ये समता संघ) स्थापन करून मानवी समतेला हातभार लावला.
➤सर्व स्त्रीपुरूषांच्या सरसकट कल्याणाचा पुरस्कार करणे हे या संघटनेचे ध्येय होते.
➤पृथ्वीवरील मनुष्या-मनुष्यात असलेले आर्थिक व सामाजिक मतभेद आणि भेद कमी करून सर्वात समतेची भावना उत्पन्न व्हावी हा समता संघाचा हेतू आहे असे धों. के. कर्वे यांनी उद्देश स्पष्ट केला.
➤ समता संघाच्या तत्त्वाचा प्रचार करण्यासाठी मानवी समता' नावाचे आठ पृष्ठांचे वृत्तपत्र सुरू केले होते.

महिला आश्रमाची स्थापना - १९१५

➤महर्षी धों. के. कर्वे यांनी इ.स. १९१५ मध्ये अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय आणि निष्काम कर्म मठ यांच्या सेवक आणि सेविकांना एकत्र करून महिला आश्रमाची स्थापना केली
➤कर्वे यांनी आयुष्यभर स्त्रियांच्या उद्धाराचाच विचार केला. स्त्रियांचा उद्धार करणे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणे ही महिला आश्रमाची उद्दिष्टे होती.

महर्षी कर्वे यांचे जीवन दर्शन

➤१८७३ - राधाबाईशी विवाह
➤१८८४ - मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून बी.ए.
➤१८९१ - फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक
१८९२ - डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य
➤१९०७ - महिला विद्यालय (पुणे येथे)
➤१९१०-निष्काम कर्ममठाची स्थापना
➤१९११-महिला विद्यालय हिंगणे येथे
➤१९४४ - समता संघाची स्थापना
➤ कर्वे यांचा मृत्यू ९ नोव्हे १९६२ रोजी झाला.

महर्षी कर्वे यांचा गोरव

संस्था पदवी वर्ष
पुणे विद्यापीठ डी. लिट. 1951
बनारस विद्यापीठ डी. लिट. 1952
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ डी. लिट 1954
भारत सरकार पद्मभूषण 1955
मुंबई विद्यापीठ एल.एल.डी. 1957
भारत सरकार भारतरत्न 1958

Download महर्षी कर्वे जीवन आणि कार्य In PDF

➤ वरील सर्व माहिती हि MPSC च्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्व स्तरावर उपयोगी पडणारी आहे






Download MPSC Books pdf