https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील पर्वत रांगा(Mountains)-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील पर्वत रांगा(Mountains)-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील पर्वतरांगा

Author

By Shubham Vyawahare

17-December-2024

➤MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला काही प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले असतात ,त्यात मग महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्वत रांगा त्यांचीमाहिती किंवा ते ज्या भागामध्ये आहे त्याचे प्रश्न विचारल्या जातो.

➤महाराष्ट्रा मध्ये सह्याद्री,शंभू महादेव ,सातपुडा ,हरिहरेश्वर ,नांदेड डोंगर ,हिंगोली डोंगर ,गर्म्सुख टेकड्या असे पर्वत आढळतात

सह्याद्री पर्वतरांगा बद्दल माहिती

➤भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री समांतर पर्वत आहे. उत्तरेस सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सहयाद्री पसरलेला आहे.
➤लांबी सुमारे 1,600 कि. मी. आहे. यापैकी महाराष्ट्रात 720 कि.मी. लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. यास 'पश्चिम घाट' या नावानेही ओळखले जाते. त्याची सरासरी उंची 915 ते 1,220 मीटर आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते, तर दक्षिणेकडे कमी होत जाते.

सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या
  • नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ गोदावरीचा उगम आहे.
  • गोदावरी नदीच्या उगमाच्या दक्षिणेस सुमारे 100 कि. मी. अंतरावर भीमाशंकर येथे भीमा नदी उगम पावते.
  • भीमा नदीच्या दक्षिणेस महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम आहे, तसेच कोयना नदीही तेथूनच उगम पावते

शंभूमहादेव डोंगररांगा

➤रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला 'शंभूमहादेव डोंगररांग' असे म्हणतात.
➤भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहेत
➤ महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वांत मोशंभूमहादेव डोंगररांग आहे.
➤भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस शंभूमहादेडोंगर आहे.
➤डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यांतून पुढे कर्नाटकात जातात.

हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगा

➤गोदावरीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगा आहेत.
➤तिच्यामुळे गोदावरी भीमा यांची खोरी वेगळी होतात.
➤डोंगररांगांच्या पश्चिम भागास 'हरिश्चंद्र घाट' व पूर्व भागास 'बालाघाट' या नावाने ओळख जाते. बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे.

महाराष्ट्रातील डोंगर व त्यांचे जिल्हे ठिकाण

पर्वत जिल्हा
अस्थांभा डोंगर नंदुरबार
गाळणा डोंगर धुळे
अजिंठा डोंगर औरंगाबाद
वेरूळ डोंगर औरंगाबाद
हिंगोली डोंगर हिंगोली
मुदखेड डोंगर नांदेड
गरामसूर डोंगर नागपूर
दरकेसा डोंगर गोंदिया
चिरोली डोंगर गडचिरोली
भामरागड डोंगर गडचिरोली
सुरजागड डोंगर गडचिरोली

Download महाराष्ट्रातील पर्वत रांगा In PDF






Download MPSC Books pdf