https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील मुद्रा व मुद्रा प्रकार-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील मुद्रा व मुद्रा प्रकार-MPSC Geography Notes

मृदेबद्दल माहिती व मृदेचे प्रकार?

Author

By Shubham Vyawahare

17-December-2024

➤सेंद्रिय पदार्थ, खनिजे, वायू, द्रव आणि जीव एकत्रितपणे जीवनाचे समर्थन करणारे मिश्रण म्हणजेच माती
➤महाराष्ट्रात काळी मृदा,जांभा मृदा,गाळाची मृदा,तांबडी मृदा आढळते.

➤मृदेच्या प्रकारामध्ये सर्वात उपयुक्त मृदा हि काळी रेगुर मृदा आहे.
➤महाराष्ट्रात जास्त भाग हा रेगुर किंवा काळ्या मृदेने व्यापलेला आहे

महाराष्ट्रात आढळणारी काळी मृदा आणि तिचे महत्व?

➤सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळ्या मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश त्याप्रमाणे रंगही गडद काळ्या रंगाचा असून फिकट होत असतो.

काळ्या मृदेचे प्रामुख्याने दोन उपप्रकार पडतात

  • मैदानावरील महाराष्ट्रात सर्वांत उत्तम प्रकारची कापसाची काळी मृदा ही गोदावरी, भीमा, कृष्णा तसेच तापी नदीच्या खोऱ्यात
  • नद्यांच्या खोऱ्यात मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात असते. पठारावरील मृदा ही फिकट रंगाची, पातळ आणि मध्यम प्रतीची

काळ्या मृदेचे गुणधर्म कोणते असतात?

  • ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते.
  • सुपीकता कमी होत नाही.
  • कोरड्या हवेत काळी सुपीक मृदा पिकास अत्यंत अनुकूल असते.
  • मृदेमध्ये वाजवीपेक्षा जास्त पाणी असल्यास किंवा अतिरिक्त जलसिंचन झाल्यास जमिनीत पाणी साचून ती दलदलयुक्त होते.

काळ्या मृदेत कोणती पिके घेतात?

  • खरीप आणि रब्बी
  • कापूस, गहू, ऊस, ज्वारी, तंबाखू, केळीच्या बागा,जवस तसेच कडधान्यांचे उत्पादन

महाराष्ट्रात आढळणारी जांभा मृदा आणि तिचे महत्व

➤महाराष्ट्रामध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड; पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा मृदा आढळते.

जांभा मृदेचे गुणधर्म कोणते असतात?

  • जांभा मृदेचा थर तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांबड्या छटांचा असतो
  • उंचावरच्या प्रदेशातील जांभा मृदा अतिशय पातळ, उथळ आणि खडकाळ स्वरूपाची असते
  • तिच्यात ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असत नाही
  • जांभा मृदेचा रंग गडद तपकिरी असतो.

➤रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या सखल भागामध्ये जांभा मृदेचे संचयन झालेले आहे

जांभा मृदेत कोणती पिके घेतात?

  • हापूस आंबा
  • काजू, चिकू

महाराष्ट्रात किनारीभागात आढळणाऱ्या गाळाची मृदेचे महत्व

➤महाराष्ट्रामध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड; पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा मृदा आढळते.

गाळाची मृदा गुणधर्म कोणते असतात?

  • वाळूमिश्रित लोम प्रकारची मृदा

➤ महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची मृदा आहे, तिला ‘भाबर मृदा' असेही म्हणतात.

जांभा मृदेत कोणती पिके घेतात?

  • तांदळाचे पीक
  • नारळाचे पिक

महाराष्ट्रात आढळणारी तांबडी आणि पिवळसर मृदा

➤सह्याद्रीच्या पर्वतमय भागात विशेषतः उत्तर कोकणलगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा तयार झालेली आहे.

गाळाची मृदा गुणधर्म कोणते असतात?

  • तांबड्या मृदेची रचना, रंग, खोली, रासायनिक पदार्थांचे प्रमाण व सुपीकता यांच्यात स्थिरता असत नाही.
  • तांबडी मृदा पातळ थराची, कमी सुपीक, वाळूमिश्रित, सच्छिद्र आणि फिकट रंगाची असते.
  • सखल प्रदेशात खोल थरांची व रासायनिक पदार्थांनी युक्त गडद रंगाची सुपीक लोम प्रकारची असते.

➤ महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची मृदा आहे, तिला ‘भाबर मृदा' असेही म्हणतात.

जांभा मृदेत कोणती पिके घेतात?

  • भरड धान्ये
  • बाजरी
  • तांदूळ

Download महाराष्ट्रातील मुद्रा व मुद्रा प्रकार In PDF






Download MPSC Books pdf