https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील खनिज संपत्ती संपूर्ण माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती संपूर्ण माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील खानिजाबद्दल माहिती?

Author

By Shubham Vyawahare

17-November-2024

➤ महाराष्ट्रात कोकण भागात काही प्रमानात तर महाराष्ट्राच्या पूर्वेस चंद्रपूर भागात काही प्रमाणात खनिज आढळून येते.

➤महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते.

➤महाराष्ट्रात दगडी कोळसा, मँगनीज, लोह खनिज, बॉक्साईट इत्यादी खनिजे आढळतात.

➤महाराष्ट्रातील खनिज क्षेत्र विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यांत बहुतेक खनिज संपत्ती बेसाल्ट खडकाच्या व्यतिरिक्त असलेल्या स्फटिक व रूपांतरित खडक आढळते.
➤महाराष्ट्रात कोळसा, चुनखडी, मॅग्नीज, बॉक्साईड, लोखंड, डोलोमाईट, कायनाईट, क्रोमाइट, सिलिका इत्यादी खनिजांचे साठे आढळून येतात

खनिज म्हणजे काय आणि त्यांचे उपयोग कोणते?

➤खनिज म्हणजे जमिनीतून मिळणारे मुल धातू जे जमिनीतून बाहेर काढून त्याचा उपयोग करता येतो.जसे कि लोहखनिजा पासून लोखंड मिळत

कोणत्या खनिजा पासून काय मिळते?

खनिज मिळणारे धातू अधातू
Aluminium Bauxite
Iron Haematite Magnetite Siderite Iron pyrites
Copper Copper pyrites Malachite Cuprite Copper glance
Zinc Zinc blend/Sphalerite Calamine Zincite

महाराष्ट्रात कोठे कोणते खनिज मिळते

खनिज जिल्हे
मँगनीज भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग
लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग
बॉक्साइट कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली व सातारा
क्रोमाईट भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी
चुनखडी यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा
डोलोमाईट यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर व चंद्रपूर
कायनाईट भंडारा, गोंदिया
सिलिकामय वाळू सिंधुदुर्ग व रत्नागिरी
जांभा कोकण, पूर्व विदर्भ, कोल्हापूर व सातारा
अभ्रक पूर्व विदर्भ

Download महाराष्ट्रातील खनिज संपत्ती संपूर्ण माहिती In PDF






Download MPSC Books pdf