https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील हवामानाची(Climate)संपूर्ण माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील हवामानाची(Climate)संपूर्ण माहिती-MPSC Geography Notes
Author

By Shubham Vyawahare

3-January-2025

➤महाराष्ट्रातील हवामान(Climate) हा राज्यसेवा परीक्षेमधील महत्वाचा धडा आहे यातून परीक्षेला बरीच प्रश्न विचारेले गेलेले आढळतात.कोणत्या भागातील तापमान कसे आहे ,ऋतूच्या बदलामुळे हवामानात कसा बदल घडतो आहे,पिकांची परीस्थिती ला हवामान सर्वात जास्त कारणीभूत ठरते.

➤महाराष्ट्रातील हवामान(climate) साधारण उष्ण प्रकारचे आढळते.

महाराष्ट्रात हवामानाला कारणीभूत असणारे कोणते घटक आहेत ?

➤महाराष्ट्राची भौगोलिक परीस्थिती हि महाराष्ट्र चा हवामान बदलतील महत्वाचा घटक ठरतो,अरबी समुद्रामुळे मान्सून वारयापासून महाराष्ट्राला पाउस मिळतो तर सह्याद्री पर्वताने मान्सून अडवला जातो.महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना पश्चिमेला असणार्‍या अरबी समुद्र, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार नैऋत्य व ईशान्य मौसमी वारे व पूर्वेकडील पठारी प्रदेश या घटकांचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होत असतो

महाराष्ट्रातील ऋतूंची माहिती

➤महाराष्ट्रामध्ये तिन्ही ऋतू मध्ये अनाकलनीय परीस्थिती उद्भवते,याला कारणीभूत महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान आहे.

महाराष्ट्रातील ऋतू

ऋतू काळ
उन्हाळा मार्च ते मे
पावसाळा जून ते सप्टेंबर
हिवाळा ऑक्टोबर ते फेब्रुवारी

महाराष्ट्रातात उन्हाळ्यात काय परिस्थिती असते ?

➤महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे 16° उ. अ. ते 22° उ. अ. दरम्यान असल्याने उन्हाळ्यात तापमान वाढत जाते.
➤ कोकण किनारपट्टीस अरबी समुद्राच्या सान्निध्यामुळे खारे वारेमतलई वारे यांचा फायदा मिळतो.
➤महाराष्ट्राचे मराठवाडा व विदर्भ खंडांतर्गत प्रदेशात येत असल्याने त्यांना सागरी वाऱ्यांचा फायदा मिळत नाही.
➤एप्रिल मे मध्ये काही भागात पाउस पडतो त्यास आंबेसरी असे म्हणतात

महाराष्ट्रातील उन्हाळ्यातील तापमान

स्थान तापमान
कोकण 30° ते 33° से
पुणे-सोलपुर ३७ ते ४१ से
नागपूर, अमरावती ४२ च्या पुढे
खानदेश आणि विदर्भात ४८ च्या जवळपास

महाराष्ट्रातात पावसाळ्यात काय परिस्थिती असते ?

➤ महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस नैऋत्य वार्‍यापासून मिळतो.
➤ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस 85% नैऋत्य मान्सून मुळे भेटतो.
➤साधारणत: 7 जुन पासून सुरुवात होऊन 15 जुलैपर्यंत मान्सून वारे पूर्ण भारतात वाहू लागतात.
➤ महाराष्ट्रातील मान्सून मुळे पडणारा पाउस हा प्रतिरोध आणि अवरोध प्रकरचा असतो

महाराष्ट्रातात कमाल व किमान किती पावसाची नोंद होते ?

वार्षिक पाऊस स्थान
१००-२०० सेमी चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया
७५-१०० सेमी नाशिक,जळगाव,परभणी,हिंगोली,लातूर
६०-७५ सेमी पश्चिम महाराष्ट्र,खानदेश,मराठवाडा
५०-६० सेमी पुणे सातारा सांगली सोलापूर

महाराष्ट्रातात हिवाळ्यात काय परिस्थिती असते ?

स्थान तापमान
कोकण किनारपट्टी 10 °C
पश्चिम पठारी प्रदेशात 15 °C
पूर्व पठारी प्रदेश 15 °C

ऑक्टोबर हिट म्हणजे काय ?

➤भारतीय उपखंडात ऑक्टोबर महिन्यातील हवामानास 'ऑक्टोबर हीट' म्हणतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान सूर्याकडे दक्षिणेकडे जाणार्‍या हालचाली झाल्याने मान्सूनचा पट्टा किंवा उत्तर-मैदानावरील कमी दाबाचा पट्टा कमकुवत होतो.या काळात प्रचंड उखाडा जाणवतो.


Download महाराष्ट्रातील हवामानाची(Climate)संपूर्ण माहिती In PDF






Download MPSC Books pdf