https://www.dompsc.com


MPSC Geography(भुगोल) Syllabus And Exam Pattern

MPSC Geography(भुगोल) Syllabus And Exam Pattern
Author

By Shubham Vyawahare

17-December-2024

➤MPSC राज्यसेवा परीक्षा मध्ये MPSC Geography(Bhugol) हा महत्वाचा भाग असून दरवर्षी MPSC राज्य्सेवेच्या पूर्व परीक्षे मध्ये यातून १०-१२ प्रश्न असतात.हे सर्व प्रश्न कोणत्याही Geography(Bhugol) Notes PDF न वापरता खालील दिलेल्या धड्यामधून वाचता येतील.

➤Geography(भुगोल) साठी तसे जास्तीत जास्त सराव करणे फायद्याचे ठरते.MPSC Geography(Bhugol) Notes मराठी मध्ये वाचून MPSC Combine च्या पूर्व परीक्षेतही फायदा होऊ शकतो.

➤खाली दिलेल्या मुद्यामध्ये त्या Geography(Bhugol) Points शी निगडीत सर्व काही परीक्षनिहाय उपलब्ध केले आहे.या Geography(Bhugol) च्या notes PDF मध्ये उपलब्ध आहेत.

➤MPSC Geography(Bhugol) चा syllabus नुसार तो वाचून काढावा आणि त्यावर MPSC Geography(भुगोल) चे जास्तीत जास्त प्रश्न सोडवावे.या विषयामध्ये महाराष्ट्राचा प्राकृतिक भुगोल,महाराष्ट्राची नदी प्रणाली,महारास्त्राचा आर्थिक,सामाजिक,आणि राजकीय भूगोलाचे प्रश्न असतात.

MPSC Pre Geography Syllabus And Exam Pattern

➤MPSC Pre परीक्षे मध्ये भूगोलाचा अभ्यासक्रम हा अद्यावत केलेला असून याचे तीन भागात विभाजन केलेलं आढळून येत जसे कि प्राकृतिक भुगोल ,सामाजिक भुगोल ,आर्थिक भुगोल.
➤साधारण 10-१२ प्रश्न भूगोलावर असतात , त्यात महाराष्ट्रातील भूगोलावर जास्त भर असतो.
Subject Topics
Geography Maharashtra,India,International Geography-Physical,Social,Economic Geography of Maharashtra,India and World

MPSC Mains Geography Syllabus And Exam Pattern

➤MPSC Mains मध्ये Geography हा विषय GS 1 मध्ये असून साधारणतः ६० प्रश्न या विभागावर विचारले जातात यात पर्यावरणाचा आणि कृषी भूगोलाचा पण भाग असतो.
Point Topics
भूगोल
२.१ भूरुपशास्त्र पृथ्वीचे अंतरंग, रचना आणि घटना- अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे, भूमीस्वरुपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक, भूरुप चक्र संकल्पना, नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमीस्वरुपे. भारतीय उपखंडाची उत्क्रांती आणि भूरुपशास्त्र. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग. महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरुपीकीय वैशिष्टये. महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये/भूमीस्वरुपे- टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता (रांजण खळगे), धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण (बीचेस).
२.२ हवामानशास्त्र वातावरण – संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे. सौरऊर्जा- पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन. तापमान - पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे उर्ध्व व क्षितीज समांतर वितरण. हवेचा दाब- वारे, ग्रहीय व स्थानिक वारे. महाराष्ट्रातील मोसमी वारे (मान्सुन), पर्जन्याचे वितरण, अवर्षण, महापूर व त्यांच्याशी निगडीत समस्या.
२.३मानवी भूगोल: मानवी भूगोलातील विचारधारा- संभववाद/शक्यतावाद, असंभववाद/अशक्यतावाद, थांबा व पुढे जा विचारधारा, विकास संकल्पना. मानवी वसाहत – ग्रामीण व नागरी वसाहत- स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे व त्यांची रचना. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील समस्या. ग्रामीण-नागरी झालर/किनार क्षेत्र. नागरीकरण – नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन.
२.४ आर्थिक भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) आर्थिक व्यवसाय- शेती - महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप. उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती (HYV) शेतीची आधुनिक तंत्रे,सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, कृषीविषयक शासकीय धोरण.
मासेमारी / मत्स्य व्यवसाय-भूप्रदेशाअंतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण.
खनिजे व उर्जा साधने - महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे व उर्जा साधने, खनिज साठे व त्यांचे उत्खनन, महाराष्ट्रातील खाणकाम व्यवसायाच्या समस्या.
• वाहतूक- वाहतूकीचे प्रकार व महाराष्ट्रातील वाहतूक प्रकारांचा विकास, आर्थिक विकास, आर्थिक विकासाची साधने, शाश्वत विकास, जागतिकीकरण.
•पर्यटन- पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा (लेणी, किल्ले व ऐतिहासिक शिल्प).
• ज्ञानाधिष्ठीत आर्थिक व्यवसाय- ऋणपरमाणू संबंधी (इलेक्ट्रॉनिक) व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र (आय.टी.पार्क), भारतातील सिलीकॉन व्हॅली/माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैवतंत्रज्ञान (CTBT) भारतातील संशोधन व विकास संस्थेची (R&D) भूमिका.
2.5 लोकसंख्या भूगोल लोकसंख्या विषयक सांख्यिकी साधने /माहिती सामग्री, महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता व वितरण, महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना व वैशिष्टये, लोकसंख्या बदलाचे घटक-जनन दर, मर्त्यता दर, लोकस्थलांतर, महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्यू दर आणि लोकस्थलांतराचा कल व पातळी, लोकसंख्या वाढ व आर्थिक विकास, लोकसंख्या विषयक धोरण
२.६ पर्यावरण भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) परिसंस्था- घटक: जैविक आणि अजैविक घटक, ऊर्जा प्रवाह. ऊर्जा मनोरा. पोषण/रासायनिक घटकद्रव्यांचे चक्रीकरण, अन्न साखळी/श्रृंखला, अन्न जाळे, पर्यावरणीय -हास व संधारण, जागतिक परिस्थितीकीय असंतुलन, जैव विविधतेमधील हास, जैव विविधतेच्या हासाची धोके, मानव-वन्य जीव संघर्ष, निर्वनीकरण, जागतिक तापमान वाढ, हरित गृह परिणाम, CO, CO2, CHA, CFC's, NO यांची वातावरणातील पातळी, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील उष्मावृध्दी केंद्र (हीट आयलँड), पर्यावरण विषयक कायदे, पर्यावरणावरील आघाताचे मुल्यमापन (EIA), क्वेट्टो संहिता व वातावरणातील कार्बन क्रेडीटस्
२.७ भूगोल आणि आकाश-अवकाशीय / अंतराळ तंत्रज्ञान आकाश व अवकाश संज्ञा, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), जागतिक स्थिती प्रणाली (GPS) आणि दूर संवेदन यंत्रणा. देशाचे संरक्षण, बँकींग आणि अंतरजाळ (इंटरनेट) च्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, दूरस्थसंपर्क प्रणाली (टेलीकम्यूनिकेशन). वाहतूक नियोजन- लोहमार्ग, रस्तेमार्ग, सागरी मार्ग व हवाई मार्ग वाहतूक व्यवस्था. आरोग्य आणि शिक्षण, भारतातील मिशन शक्ती, अँटीसॅटेलाइट मिशन, अवकाशीय उपग्रह संपत्ती, अवकाश (स्पेस) संशोधन व विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्त्रो (ISRO) व डी.आर.डी.ओ. यांची भूमिका, अंतराळातील / अवकाशीय(Space) कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा आणि त्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय, भारताची भूराजनितीक स्थिती
२.८ आ रिमोट सेन्सिंगची मुलभूत तत्वे
  • रिमोट सेन्सिंगची मुलभूत संकल्पना
  • डेटा आणि माहिती
  • रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन
  • रिमोट सेन्सिंग फायदे आणि मर्यादा
  • रिमोट सेन्सिंग प्रक्रिया
  • इलेक्ट्रो- चुंबकीय स्पेक्ट्रम
  • वातावरणासह उर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह उर्जा परस्पर क्रिया (माती, पाणी, वनस्पती)
  • भारतीय उपग्रह आणि सेंसर वैशिष्ट्ये
  • नकाशा रिझोल्यूशन
  • प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त
  • दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक
  • निष्क्रीय आणि सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग
  • मल्टी स्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग
ब] एरियल फोटोग्राफ
  • हवाई छायाचित्रांचे प्रकार आणि वापर
  • कॅमेराचे प्रकार आणि त्यांचे अनुप्रयोग
  • त्रटी निर्धारण आणि स्थानिक रिझोल्यूशन
  • एरियल फोटोग्राफी व्याख्या आणि नकाशा स्केल
  • आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी
क] जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग
  • भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय (जीआयएस)
  • जीआयएस चे घटक
  • भू-स्थानिक डेटा- स्थानिक आणि गुणधर्म डेटा
  • समन्वये प्रणाली
  • नकाशा अंदाज आणि प्रकार
  • रास्टर डेटा आणि मॉडेल
  • वेक्टर डेटा आणि मॉडेल
  • जीआयएस कार्ये - इनपुट कुशलता, व्यवस्थापन, क्वेरी विश्लेषण आणि व्हिज्यूअलायझेशन
  • जमीन वापर जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण
  • डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम)
  • त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल (टीआयएन)
  • नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएसचे अर्ज

MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre Geography Syllabus And Exam Pattern

➤ MPSC Combine (STI-PSI-ASO) Exam मध्ये Geography चे जे प्रश्न असतात त्यात जास्तीत जास्त भर महाराष्ट्रातील भूगोलाला दिलेला अधुलून येतो.
Subject Links
Geography (महाराष्ट्राच्या भूगालाच्या विशेष अभ्यासासह:)-पृथ्वी,जगातील विभाग ,हवामान ,अक्षांश ,रेखांश ,महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार ,पर्जन्यमान ,प्रमुख पिके ,शहरे ,नद्या ,उद्योगे

MPSC Combine(STI-PSI-ASO) Mains Geography Syllabus And Exam Pattern

➤MPSC Mains GS 1 Geography Syllabus हा भुगोल ,महाराष्ट्रातील भुगोल आणि पर्यावरण विषयाला अनुसारून आहे.
Subject Topics
भूगोल महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

Download MPSC Geography Syllabus And Exam Pattern In PDF

➤ माघील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अनुभव पाहता जे MPSC परीक्षा देऊन अधिकारी झालेली विद्यार्थी आहेत त्यांच्या अनुभवातून आपल्याला हे कळायला मदत होते कि कोणती पुस्तके हि संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करीत असून परीक्षाभिमुख तयार केलेली आहेत.






Download MPSC Books pdf