https://www.dompsc.com



राष्ट्रीय उत्पन्न कसे काढतात-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes Marathi PDF

राष्ट्रीय उत्पन्न कसे काढतात-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes Marathi PDF


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025
➤भारताची अर्थव्यवस्था पहिल्यापासून कृषिधारित आहे
➤ १९५१ मध्ये सुमारे ७० टक्के जनता कृषि व संलग्न क्षेत्रात गुंतलेली होती.
➤ आज हे प्रमाण कमी झाले असले तरी बरेच उच्च आहे.
➤स्वातंत्र प्राप्ति नंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारुन नियोजनाच्या मार्गाने जाण्याचा विचार केला
➤ मात्र, १९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास नियोजित मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे.
➤ राष्ट्रीय उत्पन्न समजुन घेण्यासाठी राष्ट्रीय आणि उत्पन्न या गोष्टी समजने गरजेचे आहे.
उत्त्पन्नातील राष्ट्रीयत्व
➤ राष्टीयत्व या शब्दाला भौगोलिक सिमांचे पाठबळ असते पण उत्पन्न संबंधित राष्ट्रीयत्व असेल तर भौगोलिक मर्यादा शून्य ठरतात.
➤जेव्हा जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना येते तेव्हा तेव्हा सपूर्ण जगातील शक्य बाबींचा विचार होतो.
➤उत्पन्नातिल राष्ट्रीयत्व हे सपूर्ण जगभरातील भारतीय लोकानी केलेल्या उत्पन्नाची मोजमाप असते.

भारताचे आर्थिक प्रक्षेत्र =भारताचे भौगोलिक क्षेत्र + भारताची परदेशातील दुतावास(embassies)

'उत्पन्न' म्हणजे काय? (Meaning of Income)
➤ आपल्याला विविध स्त्रोतांमधून उत्पन्न मिळते. उदा. मजुरी/पगार, व्याज उत्पन्न, इतरांकडून मिळालेल्या देणग्या इत्यादी
➤ काही प्रकारचे उत्पन्न मिळविण्यासाठी आपल्याला काम करावे लागते (उदा.मजुरी/पगार), तर इतर काही प्रकारचे उत्पन्न काम न करताही मिळते (उदा. देणग्या).
➤ यावरून, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या दृष्टीने उत्पन्नाचे दोन प्रकार केले जातात: घटक उत्पन्न व गैर-घटक उत्पन्न.


घटक उत्पन्न (Factor incomes)
➤घटक' म्हणजे उत्पादनाचे घटक होय.
➤ भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता हे चार उत्पादनाचे घटक मानले जातात.
➤उत्पादन संस्था (production unit) या घटकांच्या साहाय्याने वस्तूव सेवांचे उत्पादन करतात व या घटकांच्या मालकांना त्याची किंमत अदा करतात
➤ ही किंमत उत्पादन संस्थांसाठी घटक खर्च (factor cost) असते, तर घटकांच्या मालकांसाठी घटक उत्पन्न (factor income) असते.
गैर-घटक उत्पन्न (Non-factor incomes)
➤ काही प्रकारचे उत्पन्न कोणत्याही प्रकारचे काम/त्याग न करता प्राप्त होते
➤ त्यास गैर-घटक उत्पन्न असे म्हणतात.
➤ उदा. देणग्या, डोनेशन, धर्मदायिक देणग्या, कर, दंड इत्यादी.
➤असे उत्पन्न मिळतांना कोणत्याही उत्पादनाच्या घटकाचा वापर झालेला नसतो.त्याला हस्तांतरित उत्पन्न' (transfer incomes)
➤गिनी गुणांक जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक असते.
➤भारतातील उत्पन्नाची विषमता अलिकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
➤भारताचा गिनी गुणांक २०१०-११ मध्ये ३६.८ होता, तो २०१४ मध्ये ३३.६ इतका कमी झाला आहे.
मूल्यवर्धित कीमती
➤मूल्यवर्धितची संकल्पना समजण्यासाठी आधीचे तांदुळ च्या पिठाच्या गिरणीचे उदाहरण ध्यानात घ्या. समजा, गिरणीने १०,००० रू.किंमतीचा तांदुळ विकत घेतला.
➤हा गिरणीचा मध्यमवती खर्च असेल.
➤ समजा तांदुळ हा गिरणीचा एकमेव खर्च आहे.
➤ जर गिरणीने तांदुळ दळून तयार केलेले पीठ १२,००० रूपयांना विकले तर १२,००० रू.
➤ हे गिरणीचे प्रदान मूल्य (value of output) असेल.
➤ यावरून, गिरणीचे मूल्यवर्धित रू. २,००० असेल.
➤ ते प्रदान मूल्यातून मध्यमवर्ती खर्च वजा करून काढले जाते यावरून,

मूल्यवर्धित = प्रदान मूल्य - मध्यमवर्ती खर्च

➤अशा रीतीने काढलेल्या मूल्यवर्धितला 'बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित' (Gross Value Added at Market Price: GVAmp) असे म्हटले जाते.

राष्टीय उत्पन्न कसे मोजतात


➤राष्ट्रीय उत्पन्ना बाबतीत काही संकल्पना.
स्थूल आणि निव्वळ उत्पन्न
➤ घसारा वजा न करता काढलेले उत्पन्न म्हणजे स्थूल उत्पन्न
➤ निव्वल मूल्यवर्धित = स्थूल मूल्यवर्धित - घसारा
बाजार भाव आणि घटक कीमत
➤ बाजार भाव हा अनुदाने आणि कर असल्याने बदलू शकतो.
➤घटक किंमत= बाजारभाव + अनुदान - कर

What is Domestic Product(देशांतर्गत उत्पाद) ?

1) What is Gross Domestic Product( स्थूल देशांतर्गत उत्पाद) At Market Price:GDPmp)

➤Gross Domestic Product( स्थूल देशांतर्गत उत्पाद)Market Price = आर्थिक देशातील सर्व संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धित ची बेरीज.

2) Net Domestic Product At Market Price:NDPmp(निव्वळ देशांतर्गत उत्पाद)

➤Net Domestic Product At Market Price=आर्थिक देशातील सर्व संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धित ची बेरीज - घसारा

3) What is Gross Domestic Product At Factor Price:GDPfp(स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किंमतीवर)?

➤ स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किंमतीवर = स्थूल देशांतर्गत उत्पाद (GDPmp) - अप्रत्यक्ष कर + अनुदान.

४) What is Net Domestic Product At Factor Price:NDPfp(निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किंमतीवर) ?

➤ निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किंमतीवर=निव्वळ देशांतर्गत उत्पाद (GDPfc) - अप्रत्यक्ष कर + अनुदान.

✷ देशांतर्गत उत्पाद मध्ये निवासी तसेच गैरनिवासी नागरिकांच्या उत्पन्नाचा विचार होतो. ✷

➤ पण जर का देशाचे उत्पन्न मोजायचे असल्यास गैरनिवासी नागरिकांचे उत्पन्न वजा करावे लागेल.
➤ म्हणून आता देशातील नागरिकांचे उत्पन्न मोजू (राष्ट्रीय उत्पन्न-National Income)

राष्ट्रीय उत्पन्न-National Income
1) स्थूल राष्ट्रीय उत्पाद ,बाजार भावाला (Gross National Product at Market Price GNPmp)
➤स्थूल राष्ट्रीय उत्पाद बा.भा= स्थूल देशांतर्गत उत्पाद(GDPmp) - परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न

2)निव्वळ राष्ट्रीय उत्पाद ,बाजार भावाला (Net National Product at Market Price NNPmp)
➤निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बा.भा= निव्वळ देशांतर्गत उत्पाद(GDPmp) - परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न

3 )स्थूल राष्ट्रीय उत्पाद ,घटक किंमतीवर (Gross National Product at Factor Price NNPfp)
➤स्थूल राष्ट्रीय उत्पाद घ.की= स्थूल देशांतर्गत उत्पाद(GDPfp) - परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न

3 )निव्वळ राष्ट्रीय उत्पाद ,घटक किंमतीवर (Gross National Product at Factor Price NNPfp)
➤निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घ.की= निव्वळ देशांतर्गत उत्पाद(GDPfp) - परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न

राष्ट्रीय उत्पन्न =स्थूल देशांतर्गत उत्पन्न बा.भा - घसारा - कर + अनुदाने



राष्ट्रीय उत्पन्न प्रकार मोजण्याचे किती प्रकार आहेत?


1) उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत
➤ उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित (value added) संकल्पनेवर आधारलेली आहे
➤ उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते.
➤ उदा. GDPmp, NDPmp, GNPmp,NNPmp.
2) उत्पन्न किंवा आय पद्धत
➤ या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते
➤ अशा सर्व घटक उत्पन्नांची बेरीज म्हणजे घटक किंमतींना काढलेले राष्ट्रीय उत्पन्न होय
➤ उदा. GDPfc, NDPfc, GNPfc,NNPfc.
3) खर्च पद्धत
➤ राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीनेही करता येते.
➤उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो.
➤ स्थूल देशांतर्गत उत्पाद = खाजगी अंतिम उपभोग खर्च+ सरकारी अंतिम उपभोग खर्च+ स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती+ निव्वळ निर्यात.


भारतात GDP कसा मोजतात?


➤ सद्या ४ पद्धति भारतात वापरल्या जातात.
उत्पादन पद्धति:वस्तु उत्पादक क्षेत्रासाठी
उत्पन्न पद्धति:सेवा क्षेत्र
खर्च व प्रवाह पद्धति:बांधकाम क्षेत्रासाठी

स्वंतंत्र पूर्वीचे जीडीपी मोजमाप
➤1) दादाभाई नौरोजी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला
➤ १८६७-६८ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रू.३४० कोटी तर दर डोई उत्पन्न रू. २० इतके होते

➤2) विल्यिम डिग्बी(१८९७-१८९८ ) नुसार - जीडीपी ३९० कोटी तर दरडोई उत्पन्न १७ रु.
➤3) फिंडले शिरास(१९११-१९१२ ) नुसार - जीडीपी १९४२ कोटी तर दरडोई उत्पन्न ८० रु.
➤४) डॉ. व्ही के आर व्ही राव(१९२५-१९२६ ) नुसार - जीडीपी २३०१ कोटी तर दरडोई उत्पन्न ७८ रु.
➤४) आर. सी. देसाई(१९३०-१९३१ ) नुसार - जीडीपी २८०९ कोटी तर दरडोई उत्पन्न ७२ रु.

स्वंतंत्र नंतरचे जीडीपी मोजमाप
➤ राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ४ ऑगस्ट, १९४९ रोजी प्रो.पी.सी.महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
➤ समितीने आपल्या अंतिम अहवालात १९४८-४९, १९४९- ५० आणि १९५०-५१ साली चालू व स्थिर किंमतींवर १९४८-४९ या आधारभूत वर्षावर) राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली.

मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी यातील फरक काय असतो?


मौद्रिक जीडीपी (Nominal GDP):
➤ बाजारभावाला मोजलेल्या जी.डी.पी.ला मौद्रिक जी.डी.पी
➤ मौद्रिक जी.डी.पी. = अंतिम वस्तू व सेवा x त्यांच्या किंमती(सध्य बाजार भावातील)
वास्तविक जीडीपी (Real GDP):
➤वस्तुच्या घटक कीमती(म्हणजे मूल कीमत )
➤ उदा . समजा एखादी वस्तु ची २०१९ साली किंमत २० रु. होती आणि २०२० साली तीच वस्तु ३० रु. ला विकली गेली तर सध्य किंमती नुसार मौद्रिक जीडीपी ३० असतो तर वास्तविक व्यवहार मात्र फ़क्त २० चा असतो.
➤ वास्तविक जीडीपी साठी आधारभूत वर्ष नावाची संकल्पना वापरली जाते.

Purchasing Power Parity (PPP) म्हणजे काय असते?


➤ हा निर्देशांक दोन चलनांच्या खरेदीशक्तीची/क्रयशक्तीची तुलना करण्यासाठी वापरला जातो
➤ त्यासाठी कोणत्याही देशाच्या चलनाच्या खरेदीशक्तीची तुलना अमेरिकन डॉलरच्या खरेदीशक्तीशी केली जाते
➤ क्रयशक्ती समानतेचा दर दोन चलनांचा वास्तविक विनिमय दर' (Real Exchange Rate) दर्शवितो.
➤ तो त्या चलनांच्या 'मौद्रिक विनिमय दरा' (Nominal Exchange Rate) पासून भिन्न असतो. br>

What is Green GDP (हरित जीडीपी)


➤ आर्थिक वृद्धीबरोबरच पर्यावरणाची हानीसुद्धा घडून येते.अशी हानी घडून येऊ न देता शक्य असलेले जी.डी.पी.म्हणजे हरित जी.डी.पी. होय असे म्हणता येईल
➤ हरित जी.डी.पी. = पारंपरिक जी.डी.पी पारंपरिक जी.डी.पी - (पर्यावरणीय हानीचे मूल्य.
➤ भारतात सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
➤ भारतात सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.






Download MPSC Books pdf