दारिद्र्य(Poverty)म्हणजे काय आणि ते कसे मोजतात?-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes
✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪
Table Of Contain
दारिद्र्य(Poverty) म्हणजे काय आणि दारिद्र्याचे प्रकार कोणते?
By Shubham Vyawahare
17-January-2025
➤ दरिद्र्या च्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात.
➤ दारिद्रय हे आर्थिक ,सामाजिक ,वैचारिक प्रकारात असू शकते.
दारिद्र्य प्रकार
➤ दारिद्रयाची संकल्पना सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य अशा दोन पद्धतीने केली जाते.
सापेक्ष दारिद्र्य (Relative Poverty)
➤ देशातील उच्चतम ५ किंवा १० टक्के लोकसंख्येची संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम ५ किंवा १० टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात
निरपेक्ष दारिद्र्य (Absolute Poverty)
➤दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करुन त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो.➤ या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला गरीब समजले जाते
➤दारिद्र्य रेषा 'उपभोग खर्चा' च्या (consumption expenditure) आधारावर ठरविली जाते.
मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च (Monthly Per capita Consumption Expenditure:MPCE) काय असतो?
➤दारिद्र्य ठरवन्यासाठी एका व्यक्तिमाघे एका महिन्याचा उपभोग खर्चाचा एक न्यून स्तर निश्चित केला जातो.Below Poverty Line: BPL
➤MPCE न्यून स्तरापेक्षाही कमी उपभोग खर्च करणाऱ्या व्यक्तीला (Below Poverty Line: BPL) असे संबोधले जाते.
Above Poverty Line: APL
➤ MPCE पेक्षा अधिक खर्च करणाऱ्या व्यक्ती/कुटुंबांना 'दारिद्र्य रेषेवरील ध्ये (Above Poverty Line: APL) म्हणून संबोधले जाते.
Poverty Ratio Or Head-Count Ratio
➤ दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणाला 'दारिद्र्य प्रमाण म्हणजे Poverty Ratio Or Head-Count Ratio.
NSSO रिकॉल पीरियड्स म्हणजे काय?
युनिफोर्म रिकाल पीरियड (Uniform Recall Period):URP
➤ सर्व उपभोग्य वस्तुंच्या ३० दिवसांच्या रिकॉल/ रेफरन्स कालावधीतील उपभोगाच्या आकडेवारीचा समावेश होतो.मिक्स्ड रिकाल पीरियड (Mixed Recall Period):MRP
➤ ५ प्रकारच्या अधुनमधुन खरेदी करण्यात येणाऱ्या गैर-खाद्य वस्तुंसाठी.➤ उदा. कपड़े, चपला, टिकाऊ वस्तु, शिक्षण, आरोग्य खर्च ३६५ दिवसांच्या रिकॉल कालावधीच्या
➤ तर इतर सर्व वस्तुसाठी ३० दिवसांच्या रिकॉल पिरियडचा समावेश होतो.
➤ या पद्धतीचा वापर १९९९-२००० पासून सुरू करण्यात आला.
मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड (Modified Mixed Recall Period: MMRP)
➤ हा 3 प्रकारात काढला जातो- ३६५ दिवसांच्या संदर्भ कालावधीत कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तूंवरील उपभोग खर्च.
- ७ दिवसांच्या संदर्भ कालावधीत खाद्य तेल, अंडी व मांस, फळे व भाज्या इ.वरील उपभोग खर्च.
- ३O कालावधीत इंधन, भाडे, कर, गैर-संस्थात्मक आरोग्य सेवा, इतर अन्न पदार्थ इ. वरील उपभोग खर्च.
दारिद्र्य मोजमाप समित्या कोणत्या होत्या?
World Bank Poverty Definition: Per day 1.90 dollar
➤ नियोजन मंडल दारिद्र्य मोजमापन करण्याचे काम करीत असते1) कार्य गट १९६२
➤ राष्ट्रीय किमान खर्चाचा खर्च
- Rural – Rs 100/ month (Rs 20/ Person)
- Urban – Rs 125/ month (Rs 25/ Person)
- आरोग्य आणि शैक्षणिक खर्चाला वगळले कारण हे राज्य द्वारे पुरवले जाते असे गृहित धरल्या गेले .
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ‘संतुलित आहार’ विषयी वापरलेली शिफारस.
2) अलग कार्य गट १९७९
➤ कैलोरीज उपभोगाच्या संक्ल्पने वरून दारिद्र्य मोजमाप
➤ ग्रामीण भागासाठी - २४०० कैलोरीज प्रति दिन
➤ शहरी भागासाठी -२१०० कलोरिज प्रति दिन
3) लकडवाला कार्य गट १९९३
➤ या समितीने दरडोई वापराच्या खर्चाच्या आधारे दारिद्र्य रेषेची व्याख्या केली.
➤ अशा सर्वया समितीने दारिद्र्य रेषेच्या अंदाजापेक्षा CPI-IL (Consumer Price Index for Industrial Laborers) (औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक) आणि CPI- AL (Consumer Price Index for Agricultural Laborers)(कृषी कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक) वापरला.
4) सुरेश तेंदुलकर तज्ञ गट २००५
➤ मोजमाप करण्यासाठी कैलोरीज चा वापर सोडला.
➤ अन्न ,आरोग्य ,शिक्षण ,कपडे यांचा वापर
➤ MRP आधारित पद्धत स्वीकारली .
➤ २०११-२०१२ साठी ग्रामीण प्रतिव्यक्ति प्रतिमाह -८१६ तर शहरी साठी १००० ठरवली गेली.
५) रंगराजन पैनल २०१२
➤कॅलरी: शहरी भागात 2090 किलो कॅलरी आणि ग्रामीण भागात 2155 किलो कॅलरी.
➤ प्रथिने: ग्रामीण भागासाठी 48 ग्रॅम आणि शहरी भागात 50 ग्रॅम.
➤चरबी: शहरी भागांसाठी 28 ग्रॅम आणि ग्रामीण भागासाठी 26 ग्रॅम
➤MRP च्या जागी MMRP वापरण्याची तरतूद केलि
- ३६५ दिवसांच्या संदर्भ कालावधीत कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तूंवरील उपभोग खर्च.
- ७ दिवसांच्या संदर्भ कालावधीत खाद्य तेल, अंडी व मांस, फळे व भाज्या इ.वरील उपभोग खर्च.
- ३० कालावधीत इंधन, भाडे, कर, गैर-संस्थात्मक आरोग्य सेवा, इतर अन्न पदार्थ इ. वरील उपभोग खर्च.
6) पनगडिया कृति दल २०१५
➤ 2016 साली रिपोर्ट दिला असून कोणतेही शिफारस केलि नाही.
Others Blogs Related to MPSC Economics Notes In Marathi
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf