भारतीय बँका आणि बँकिंग क्षेत्राची माहिती-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes Notes
✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪
Table Of Contain
पहिली भारतीय बैंक कोणती होती ?
By Shubham Vyawahare
2-January-2025
➤१)१७७०: अलेक्झांडर अँड कंपनीने कलकत्त्याला 'बँक ऑफ हिंदुस्तान' नावाची भारतातील पहिली बँक स्थापन केली. या बँकेने सुमारे वीस वर्ष काम केले, नंतर ती बंद पडली.
➤ २)१९ व्या शतकाच्या सुरवातीला ईस्ट इंडिया कंपनीला सुसंघटित अशा व्यापारी बँकांची गरज वाटू लागली. म्हणून कंपनीने प्रेसिडेन्सी बँकांच्या (इलाखा बँका) स्थापनेमध्ये पुढाकार घेतला.
➤ १८०६: पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेची बँक ऑफ कलकत्ता' म्हणून स्थापना करण्यात आली.१८०९ मध्ये तिला सनद मिळून तिचे रुपांतर प्रेसिडन्सी बँक ऑफ बंगालमध्ये करण्यात आले. ही भारतातील मर्यादित जबाबदारीच्या तत्त्वावरील पहिली संयुक्त भांडवली कंपनी होय. बँक ऑफ बंगालला १८२३ मध्ये नोटा छापण्याचा अधिकार देण्यात आला, तर १८३९ मध्ये शाखा उघडण्याची अनुमती देण्यात आली.
➤१८४० : दुसरी प्रेसिडन्सी बँक बँक ऑफ बॉम्बे' या नावाने स्थापन करण्यात आली.
➤ १८४३: तिसरी प्रेसिडन्सी बँक 'बँक ऑफ मद्रास' या नावाने स्थापना करण्यात आली.
➤ १८६५: अलाहाबाद बँक, अलायन्स बँक ऑफ सिमला स्थापना.
➤ १८८१: 'अवध कमर्शिअल बँक स्थापन झाली.
भारतीय वित्तीय व्यवस्थेचे प्रकार
१)वित्तीय बाजार (Financial Markets)
➤वित्तीय बाजार म्हणजे वित्ताच्या देवाणघेवाणीचा बाजार होय.
➤ वित्ताच्या कालावधीनुसार त्याचे दोन प्रमुख भाग पडतातः नाणे नाणे बाजार अल्पकालिन वित्ताची, तर भांडवल बाजारात मध्यम व दीर्घकालिन वित्ताची देवाणघेवाण चालते.
➤ या दोन्ही बाजारांचे विभाजन प्राथमिक व द्वितीय बाजार असे केले जाते.
➤ प्राथमिक बाजारात जुन्या/विद्यमान पतसाधनांची देवाणघेवाण चालते.
➤ भांडवल बाजाराचे पतसाधानांच्या दृष्टीने दोन भाग पडतातः इक्विटी विभाग (Equity segment) व डेट विभाग (Debt segment).
➤ इक्विटी विभागामध्ये विविध प्रकारच्या शेअर्सचा बाजारात प्रथमच निर्माण होणाऱ्या पतसाधनांची, तर द्विती बाजार व भांडवल बाजार.
२)वित्तीय संस्था (Financial institutions/intermediaries)
➤ वित्तीय बाजारांमध्ये विविध प्रकारच्या वित्तीय संस्था कार्य करतात.
➤ उदा. नाणे बाजारात व्यापारी बँका, सरकार, गैर-बँकिंग वित्तीय कंपन्या इत्यादींबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकही कार्य करते.
➤ भांडवल बाजारात व्यापारी बँका, विकास वित्तीय संस्था, गुंतवणूक बँका, विमा कंपन्या, म्युचुअल बँका, मर्चेट बँका अशा प्रकारच्या अनेक मध्यस्थसंस्था कार्य करतात.
3)वित्तीय सेवा (Financial services)
➤वित्तीय संस्था विविध प्रकारच्या वित्तीय सेवा उपलब्ध करून देतात.
➤ उदा. कर्ज पुरवठा, विमा, भागविमेकरी सेवा इत्यादी.
४)वित्तीय साधने (Financial instruments)
➤वित्तीय संस्था आपल्या सेवा विविध प्रकारच्या वित्तीय पतसाधनांच्या साहाय्याने निर्माण करून देतात.
➤नाणे बाजारातील पतसाधनांमध्ये कॉल/नोटिस कर्जे, ट्रेझरी बिले, मुदती कर्जे, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉडिट्स (CDs), कमर्शिअल पेपर्स (CPs) इत्यादींचा समावेश होतो.
अग्रणी बैंक योजना काय होती?
➤ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा'ने सुरवात: डिसेंबर १९६९ मध्ये RBI ने योजना स्विकारली व स्मि अंमलबजावणी देशातील तत्कालिन ३३८ जिल्ह्यांमध्ये आपल्या १९६९ मधील अहवालामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना क्षेत्रीय दृष्टीकोन' (Area Approach) लागू करण्याची शिफारस केली.
➤(अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांची वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)
➤ १९६९ मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री. एफ्.के. एफ्. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती” (Committee of Bankers)स्थापन करण्यात आली आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोन" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व “अग्रणी बँक योजना" तयार केली.
प्रादेशिक बँक आणि त्याचे व्यवस्थापण कसे चालते ?
➤ भारतात बेरोजगारीविषयक आकड्यांचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत
- दशवार्षिक जनगणनेचे अहवाल
- राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे (NSSO) रोजगार बेरोजगारा बाबतचे अहवाल
- रोजगार व प्रशिक्षण सरसंचलनालय (DGET)
➤ NSSO ने असा पहिले सर्वक्षण आपल्या २७ व्या सर्वेक्षण फेरीमध्ये ऑक्टोबर १९७२- सप्टेंबर १९७३ या कालावधीसाठी केले होते
➤ NSSO सध्या रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते
नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा (Usual Principal and Sub- sidiary Status: UPSS)
➤नित्य प्रमुख दर्जा हा व्यक्तीने सर्वेक्षणपूर्व ३६५ दिवसांमध्ये तुलनेने अधिक काळासाठी केलेल्या आर्थिक कृतीशी संबंधित असतो.
➤जे व्यक्ती या संदर्भ ३६५ दिवसांमध्ये मोठ्या कालावधीसाठी (१८३ दिवस किंवा अधिक) एखाद्या आर्थिक कामात गुंतलेले प्रा असतात ते नित्य प्रमुख दर्जावर रोजगारात असल्याचे मानले जाते.
चालू साप्ताहिकदर्जा (Current Weekly Status: CWS)
➤ व्यक्तीच्या सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांतीले आर्थिक कृतींचा समावेश होतो. या आधारावर सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांत कोणत्याही एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्याला व्यक्तीस. रोजगारी समजले जाते.
चालू दैनिक दर्जा (Current Daily Status: CDS)
➤ यक्तीच्या सर्वेक्षणपूर्व ७ दिवसांतील दररोजच्या आर्थिक कृतींचा समावेश होतो. या आधारावर रोजगारी समजण्यासाठी त्याने संदर्भ आठवड्यात दररोज किमान ४ तासे काम करणे आवश्यक असते..
Banking Reforms( बैंकिंग सुधारणा )
Others Blogs Related to MPSC Economics Notes In Marathi
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf