भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF
✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪
Table Of Contain-भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख-mpsc Economics(अर्थशास्त्र)
Intro of भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख
By Shubham Vyawahare
17-November-2024
➤ १९५१ मध्ये सुमारे ७० टक्के जनता कृषि व संलग्न क्षेत्रात गुंतलेली होती.
➤ आज हे प्रमाण कमी झाले असले तरी बरेच उच्च आहे.
➤स्वातंत्र प्राप्ति नंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारुन नियोजनाच्या मार्गाने जाण्याचा विचार केला
➤ त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विविधांगी बदल झाले
➤ मात्र, १९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास नियोजित मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे.
➤ दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर, वृद्धी दरातील चढउतार, लोकसंख्येचा उच्च वाढीचा दर, दारिद्याचे उच्च प्रमाण, बेरोजगारीचा उच्च दर, कृषिधारित अर्थव्यवस्था इत्यादी .भारतीय अर्थव्यवस्थेची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.
भारतीय अर्थव्यवस्था ची वैशिष्ट
१)दर डोई उत्पनाचा कमी स्तर (Low per capita income)
➤ देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्वाचे निर्देशक आहे.
➤दरडोई उत्पन्नात वेगाने वाढ घडवून आणणे हे भारतीय नियोजनाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे, मात्र त्याचा स्तर कमीच राहिला.
➤ २०१५-१६ मध्ये चालू किंमतींना मोजलेले दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (Per Capita Net National Income) ९३,२३१ रूपये प्रति वर्ष इतके होते. अर्थात हा साधा सरासरी असल्याने त्याचे लोकसंख्येतील वितरण अत्यंत असमान आहे.
2)उत्पन्नाच्या व दर डोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी
➤ भारताचे दर डोई उत्पन्न कमी आहेच, मात्र त्याबरोबच त्याच्या वाढीचा दरही कमीच आहे.
➤ १९९० पूर्वी तर हा दर खूपच कमी असे.
➤ १९५० च्या दशकापासून १९८० च्या दशकापर्यंत जी.डी.पी.च्या वाढीचा दर सरासरी ३.५ टक्क्यांच्या आसपास होता, तर दर डोई उत्पन्न वाढीचा दर केवळ १.३ इतका होता याला 'हिंदू वृद्धी दर' (Hindu Growth Rate) असे संबोधण्यात आले.
➤लोकसंख्येचा मोठा गट कृषि व संलग्न कार्यामध्ये गुंतलेला असणे, मात्र कृषि क्षेत्राचे जी.डी.पी.मधील योगदान कमी असणे, हे विकसनशील अर्थव्यवस्थेचे महत्वाचे लक्षण असते.
➤भारताची अर्थव्यवस्था पहिल्यापासून कृषिधारित आहे.
➤कृषि क्षेत्र ४६% वाटा कृषि क्षेत्राचा होता.
४)आर्थिक विषमता (Economic inequality)
➤ भारतात मोठी उत्पन्नाची व संपत्तीची विषमता आढळून येते.
➤ NSSO (National Samples Survey Organisation) च्या अलिकडील आकडे वारीनुसार देशातील ग्रामीण कुटुंबांपैकी ३९ टक्के कुटुंबे देशातील एकुण ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त ५ टक्के मालमत्तेचे मालक आहेत.
➤ तर त्यांच्यापैकी ८ टक्के उच्च कुटुंबे त्या मालमत्तेपैकी ४६ टक्के मालमत्तेची मालक आहेत.
➤उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेंझ वक्र व त्यावरून काढलेला गिनी गुणांक यांचा वापर केला जातो.
➤गिनी गुणांक जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक असते.
➤भारतातील उत्पन्नाची विषमता अलिकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
➤भारताचा गिनी गुणांक २०१०-११ मध्ये ३६.८ होता, तो २०१४ मध्ये ३३.६ इतका कमी झाला आहे.
४)लोकसंख्या विस्फोट (Overpopulation)
➤१९०१ साली असलेली २३.८४ कोटी एवढी लोकसंख्या २०११ मध्ये वाढून सुमारे १२१.०२ कोटी एवढी झाली.
➤ वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात लोकसंख्येचा विस्फोट घडून आला.
➤ मात्र १९८१ पासून लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आढळून येत आहे.
➤ १९९१-२००१ या दशकात लोकसंख्या २१.५४ टक्क्यांनी वाढली तर वार्षिक वाढीचा दर १.९५ टक्के एवढा होता.
➤ २००१-२०११ या दशकात लोकसंख्या १७.६४ टक्क्यांनी वाढली.
➤ २०११ च्या जनगणनुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या १७.५ टक्के एवढी आहे.
➤ भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ३५% लोकसंख्या १५ वर्षांखालील, ५०% हून अधिक लोकसंख्या 25 वर्षाखालील आहे.तर ६५% अधिक लोकसंख्या ही ३५ वर्षावरील आहे.
➤ तरुण लोकसंख्या हा भारता साठी मोठा लोकसंख्या लाभांश आहे.
५) गरीबी व बेरोजगारी (Poverty and Unemployment)
➤स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६५ वर्षांहून अधिक काळातही भारतातील गरीबी व बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले नाही.
➤ २०११-१२ मध्ये NSSO च्या ६८ व्या फेरीच्या आकड्यांवरून नियोजन मंडळाने मोजल्यानुसार (सुरेश तेंडूलकर पद्धतीनुसार) दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण संपूर्ण भारतात २१.९ टक्के, ग्रामीण भारतात २५.७ टक्के, तर शहरी भारतात १३.७ टक्के होते.
भांडवल निर्मितीचा दर
औद्योगीकरनाचा अभाव
➤ भारतात अत्याधुनिक अशा औद्योगिकीकरणाचा अभाव दिसतो.
➤ त्यामुळे अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी दर कमी राहतो.
➤ औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक सरासरी वृद्धि दर (साध्य)६ व्या योजनेत ३.५ टक्के,७ व्या योजनेत ८.५ टक्के, ८व्या योजनेत ८.१ टक्के तर ९ व्या योजनेत फक्त ४.५ टक्के एवढा होता.हा दर १० व्या योजनेत ८.७४ टक्के इतका ठरला होता.
➤ मात्र आर्थिक सुधारणांचा परिणाम होऊन भारतीय उद्योग क्षेत्र विकास पावत आहे.
➤ नियोजन काळात झालेल्या भांडवली गुंतवणुकीमुळे औद्योगिकीकरणाचा पाया बांधला जाऊन भारताकडे सुद्धा चीनप्रमाणे manufacturing hub of the world' बनण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
पायाभूत सुविधांची कमतरता
➤ रस्ते, रेल्वे, बंदरे, विमान वाहतूक, दूरसंचार, खत कारखाने,सिंचन सुविधा, बँकींग व विमा सेवा, या व इतर पायाभूत सुविधांची कमतरता हा भारताच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील महत्वाचा अडसर आहे.
मानवी साधानाचा निकृष्ट दर्जा
➤ मानवी संसाधन साक्षरता, अंगीकृत कौशल्ये, आरोग्य, स्वच्छता, आयुर्मान इ बाबींवर आधारित असते.
➤ मात्र या सर्व बाबतीत भारतात अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याने मानवी संसाधानाचा दर्जा निकृष्ट राहिला.
तंत्रज्ञानाचा अभाव
➤उपलब्ध तंत्रज्ञानाचा दर्जा कमी राहिल्याने कृषीची प्रति हेक्टरी उत्पादकता तसेच, उद्योग क्षेत्राची प्रति कामगार उत्पादकता कमी राहते .
Others Blogs Related to MPSC Economics Notes In Marathi
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf